विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 March 2021

श्रींच्या राज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे

 

।।

श्रींच्या राज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यासी
मानाचा मुजरा... ।।
।। जय श्री राम ।।
नदीला महापूर यावा तसं मराठयांच वीस हजाराच घोडदळ टापांचा कडकडाट करत शिंगणापूरच्या डोंगरातून बाहेर पडल.सोबतीला पाच हजार कर्नाटकी करोल( बंदूक धारी) होते.अर्थातच सेनापती होते संताजी घोरपडे.आता हे वादळ कूट जाऊन थडकणार यांची चिंता आसपासचे मोगल ठाणेदार करू लागले.
नीरा-भीमा या नद्या पार करून दौड,श्रीगोंदा,पारणेरचा
मुलुख फन्ना करून अहमदनगरला धडक दिली.अब्दुल गफूर हा तिथला किल्लेदार होता.किल्ल्याची कवडाची कडी काढून तो नुसता बाहेर डोकावलासुध्दा नाही. मराठयांनी सुभा ताराज केला.नगर नागवं करून सेनापती
मुगल पातशाहीचं नाक असलेल्या खुजिस्ता बुनियाद औरंगाबादेकडे वळले.तिथला सुभेदार इनायतखान.
सगळा मुलुख मराठयांनी साफ केला,पण बिचारा इनायतखान किल्ला सोडून काय बाहेर पडला नाही.
कारण त्याला हे माहीत होतं की संताजी बरोबर लढणं म्हणजे एकतर मरण की शरण एवढे दोनच पर्याय उपलब्ध आहेत.त्यांन पातशाह कडे मदत मागण्या पलीकडे काही केलं नाही.मदत येईपर्यंत मराठ्यांनी
चाळीसगाव,भडगाव,एरंडोल असा मुलुख मारत धारणगावच्या समृद्ध पेठेवर हात मारला.
आता सेनापती संताजींच्या तलवारीच टोक बुऱ्हाणपूरच्या दिशेनं रोखलं गेलं.मोगली साम्राज्याचं दक्षिणेतील एक प्रमुख समृद्ध शहरावर सेनापतींनी आपली भक्कम मूठ उगारली.संताजी नावाचं वादळ आता बुऱ्हाणपूरवर घोगावात होतं.मराठे लांबच्या मजला मारून थेट बुऱ्हाणपूरवर येऊन धडकले.मरहतखान हा तिथला सुभेदार होता.त्याच्या हाताशी मोठी फौज होती
कोटाचा आश्रय घेऊन दीर्घकाळ भांडता आलं असतं.पण
पातशाही सरदारांना संताजींच्या नावाची दहशत इतकी जाणवायची,की लढाई टाळून काही तडजोड होते का हे
ते आधी चाचपायचे. खंडणी देऊन ही आफत परस्पर आपल्या इलख्यातून निघून जावो हे त्यांचं धोरण असायचं.
बुऱ्हाणपूरवर यकायक मराठे चालून आल्यामुळे शहरात
प्रचंड घबराट माजली होती. मरहमतखान कोटात कोंडून
बसल्यामुळे शहरातल्या व्यापारी पेठा,पुरे उघडे पडले.
व्यापारी,सावकार आणि इतर धनिक लोक आपला जीव वाचीण्यासाठी गढीत जाऊ लागले.पण इतकी माणस भरलेली की जागाच शिल्लक नव्हती.मरहतखान मोठ्या
कात्रीत सापडला.मराठयांनी जर गढी वेढली तर फौजेसाठी राखून ठेवलेल्या धान्यसाठ्यावर या अंगतुकांचा ताण पडून सारे उपाशी मरणार.आणि शहर उघड्यावर टाकून आत बसावं तर पातशहा भित्रेपणाचा
आरोप करून आपली चामडी सोलणार.काय करावं ते त्याला कळेनासं झालं होतं.मराठे मागतात ते द्या आणि या संकटातून सगळ्यांना सोडवा असा सल्ला त्याच्या इतर सरदारांनी दिला.
अखेर मरहतखाननं आपला वकिल सेनापतींनकडे पाठवला .मराठयांनी जो खंडणीची व चौथाइची जी रक्कम सांगितली ती मरहतखानाला काही पटली नाही त्यानं सरळ मराठयांन बरोबर युद्धात घोषणाच केली
बुऱ्हाणपूरच्या गढीत गर्जनांचा घोष घुमू लागला. पाठोपाठ दहा-बारा हजाराच घोडदळ आणि पायदळ
गढीतून बाहेर पडल.
सरसेनापती संताजी सज्जच होते.त्यांनी आधीच आपल्या सैन्याचे तीन भाग केले होते.त्यातल्या दोन निरोपाच्या अंतरावर लपून होत्या.आणि पाच हजार फौजेसह ते स्वतः खानाला सामोरे गेले.तापीच्या तीरी रण पेटलं.खान मोठा अनुभवी गडी.पण त्याला मराठ्यांची युद्ध पद्धत माहीत नव्हती.खान सफेजंगीने लढू लागला.भारी कापाकापी माजली.बंदुकींच्या कडकडाटनं तापीकाठ दणाणून उठला.प्रहरभराची हातघाई झाली,तोच गढीच्या
बाजूनं गलका उठला.दबा धरून बसलेल्या मराठयांच्या
एक तुकडीने थेट गढीवर हल्ला चढवला.खान डोळे फाडून पाहू लागला.तेवढ्यात दुसऱ्या तुकडी येऊन त्याच्या पिछाडीवर आदळली.शिस्तीनं लढणारे मोगल
मराठयांच्या या चालीने हादरले.
मराठयांच्या कात्रीत सापडून आपण मरणार आणि हातची गधीही घालवणार हे लक्षात येताच लढाईतून माघार घेत,मराठयांचे वार झेलत खानानं कशीबशी माघार घेत पुन्हा गढीत शिरला आणि दरवाजे बंद करून बसला.आपण जिवंत सुटलो याचंच त्याला केवढं तरी समाधान वाटलं.
आता अख्खं शहर आणि आसपासचे पुरे हे मराठयांच्या अपसूक्त ताब्यात आले होते.चार दिवस मराठयांनी सगळा
परिसर स्वच्छकेला मनसोक्त लुटला बडेव्यापारी,सौदागर सावकार, आणि श्रीमंत लोक यांच्या घराला खणत्या लावून लुट बाहेर काढण्या आली.हिरे,माणकं,मोती
सोन्याचे दिनार,चांदीचे सुरती रुपये भकळ लुट जमा झाली.सर्व लुट पडश्या व गोण्यात भरून ती शंभराच्या वर खेचरावर आणि बैलांच्या पाठीवर लादण्यात आली.
ती चकाकती माया बघून धारकऱ्यांचे डोळे दिपले.
बुऱ्हाणपूरचा पुरता नक्षा उतरवून सेनापतींनी माघारीचा हुकूम दिला.बुऱ्हाणपूरा कडे बघत सेनापतींच्या मनामध्ये सहज एक विचार चमकून गेला...।। बरोबर बारा वर्षांपूर्वी
छत्रपती संभाजी महाराज आणि सरसेनापती हंबीरराव मामांनी अशीच काहीशी बुऱ्हाणपूर लुट केली असेल
सरसेनापती संताजी बाबांचा चेहरा या विचारानेच आत्मविश्वासनं फुलून आला होता....!!
।। या थोर सेनापतीस विनम्र अभिवादन ।।

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...