विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 20 April 2021

क्रांतिवीर #अनंत_कान्हेरे, क्रांतिकारक कृष्णाजी गोपाळ कर्वे, क्रांतिकारक विनायक नारायण देशपांडे

 


क्रांतिवीर #अनंत_कान्हेरे, क्रांतिकारक कृष्णाजी गोपाळ कर्वे, क्रांतिकारक विनायक नारायण देशपांडे
क्रांतिवीर अनंत कान्हेरे, क्रांतिकारक कृष्णाजी गोपाळ कर्वे, क्रांतिकारक विनायक नारायण देशपांडे यांना नाशिकाचा कलेक्टर #जॅक्सन याच्या हत्येसंदर्भात फाशी दिली गेली.
अनंत कान्हेरे हा गणेश(बाबाराव) #दामोदर_सावरकर आणि
#स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर ह्यांच्या अभिनव भारत ह्या अंतराष्ट्रीय सशस्त्र क्रांतीकाराक संघटनेचा एक सदस्य होता. कलेक्टर जँक्सन बाबारावांच्या अटकेसाठी
जवाबदार होता. त्याची नाशिक मधून मुंबईत बदली होणार होती. त्याच्या निरोपासाठी नाशिकमधल्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा ह्या नाटकाचा प्रयोग ठेवला होता . जँक्सन मराठी नाटकाचा चाहता होता म्हणून तो नाटक पाहण्यासाठी येणार होताच. नाटक सुरु होण्याची वेळ
झाली असता सर्वजण आपापल्या जागेवर स्थानपन्न
होत असताना अनंताने जँक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जँक्सन जागीच ठार झाला. ती पिस्तुल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमधून गुप्तरीतीने पुस्तकामध्ये ठेऊन पाठवलेल्या २२ ब्राऊनी बनावटीतील
पिस्तुलांपैकी एक होती. अनंताला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे ह्या समवयस्कर साथीदारांची जोड मिळाली. जँक्सनचा वध केल्यानंतर अनंत आपल्या जागेवर शांतपणे उभा राहिला . त्याला अटक करण्यात आली . कान्हेरे , कर्वे , आणि देशपांडे ह्यांच्यावर खटला भरण्यात आला . २० मार्च १९१० रोजी त्यांना फाशी ठोठावण्यात आली . आणि १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली .
भारताच्या महान इतिहासाबद्दल व संस्कृती महिती , शिवदिनविशेष मिळेल सबस्क्राईब करा 👇👇🙏🙏🚩🚩
भारताच्या इतिहासाची माहिती मिळेल व ऐतिहासिक लेख, शिवदिनविशेष👇👇👇🙏🙏🚩🚩
जय शिवराय 🚩
जय जिजाऊ 🚩
जय श्रीराम 🚩
- अनिकेत शिंदे

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...