श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर...
(१६ मार्च १६९३-२० मे १७६६)
मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते. ते शिवाजीराजेंच्या मराठा साम्राज्याच्या मावळ प्रांताचे पहिले सुभेदार होते.. बाळाजी विश्वनाथ यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना इंदूर संस्थानाची जहागिरी दिली होळकर...
पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता.. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली...
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदी पर्यंत वाढविल्या...
――――――――――――
महाप्रतापी श्रीमंत सरदार अखंड लक्ष्मिअलंकृत थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांना विनम्र अभिवादन..


No comments:
Post a Comment