विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 13 June 2021

#मल्हारगौतमेश्वर छत्री.

 भटकंती

वेध इतिहासाचा.























#मल्हारगौतमेश्वर
छत्री.
जेजुरी ,ता पुरंदर.
मल्हारगौतमेश्वर छत्री हे मंदिर म्हणूनही ओळखले जाते.
ही छत्री/मंदिर मराठेशाहीतील निर्माण वास्तूकलेचे उत्कृष्ठ उदा.आहे.
हे सरदार मल्हारराव होळकर यांचे स्मारक आहे.
पुण्यातिल वाफगाव येथील खंडूजी होळकर येथे स्थाईक झाले.त्याचा मुलगा मल्हारराव यांचा जन्म१६९३ मध्ये झाला.
वडीलांच्या मृत्यू नंतर त्यांचे बालपण खानदेशात त्यांचे मामा भोजराज बारगळ यांच्या कडे झाले.
याच मामांची मुलगी गौतमीबाई हिच्याशी त्यांचा विवाह झाला.
पहिल्या बाजीराव बरोबर उत्तरेकडील मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यात महत्वाचा वाटा होता.
मल्हाररावांनी आपल्या मुत्सूदीगिरी व युध्द कौशल्याच्या जोरावर माळवा व बुंदेलखंड मध्ये पराक्रम करून माळव्याची सुभेदारी मिळाली.
बादशाहाचे अमलदार,स्थानिक संस्थानीक ,राजपूत यांच्यावर धाक बसवत त्यांनी इंदौर येथे आपले स्थान मजबूत केले.
हे आपले सर्व यश जेजुरीच्या खंडोबाच्या अार्शिवादाने आहे अशी त्यांची श्रध्दा होती.त्यांनी जेजुरीच्या मंदिराचे बांधकम केले.
गौतमीबाई ,बनाबाई,द्वारकाबाई
याथील पहिली पत्नी गौतमीबाई हिचा मृत्यू १७६१ मध्ये झाला.
मुलगा खंडेराय होळकर याचा मृत्यू,पानिपत वरील मराठ्यांचा पराभव असे आनेक आघात त्यांनी पचवले.
पानिपतच्या पराभवा नंतर पाचच वर्षात जबरदस्त तडाखे देत उत्तरे कडील या वादळाने मराठा साम्राज्य स्थापन केले.
मोहिमेवर असताना २०मे १७६६ रोजी उत्तरे कडील हे वादळ शांत झाले.
त्यांच्या मृत्यू नंतर मल्हारराव व गौतमीबाईचे हे स्मारकाचे काम तुकोजी होळकर यांनी चालू केले.
द्वारकाबाईचे स्मारक घुमटीचे काम १७७२ तर बानाबाई स्मारक घुमटीचे काम १७७३ मध्ये झाले.
१७९० मध्ये मल्हारगौतमी स्मारका चे काम पुर्ण झाले.
खंडोबाच्या मंदिराच्या पायथ्याला हे स्मारक आहे.
स्मारक भव्यदिव्य आहे.
मंदिर/स्मारका समोर नंदी बसलेला आहे.
सभामंडप भव्य आहे .यातील दगडात कोरलेला कासव पाहण्या सारख आहे.
मुख्य प्रवेशद्वाराच्या वर शिलालेख स्पष्ट आहे.
गाभा-यात शिवलिंग आहे. त्याच्या मागे चौथ-यावर मल्हारराव व गौतमीबाई ची मुर्ति आहे.
दोन्ही स्मारक घुमटीवर शिलालेख आहे.
येवढे भव्य दिव्य स्मारक जेजुरी मंदिराच्या जवळ शाळे जवळ आसून आनेकांना माहीत नसल्याने त्या कडे पाठ फिरवली जाते.
खंडोबाच्या दर्शना सोबत हे ही स्मारक / छत्री / मंदिर तेवढेच महत्वाचे आहे. खुप सुंदर छत्री आहे ही. आवश्य पाहावे.
काही स्थान अशी असतात की स्व:ताहा पाहिल्या शिवाय त्याची भव्यता, कारागिरांची कलाकौशल्य, इतिहास समजत नाही. त्यातील ही एक वास्तू.
संतोष चंदने,चिंचवड,पुणे.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...