विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 13 June 2021

#_खंडोबा_व_खंडेश्वरी_मंदिर_बीड

 








#_खंडोबा_व_खंडेश्वरी_मंदिर_बीड

बीड शहराच्या पूर्व सीमेवर छोट्याशा टेकडीवर गर्द लिंबाच्या वनराईत पूर्वभिमुख खंडोबाचे मंदिर आहे. या मंदिरास चोहोबाजूंनी दगडी व्हरांडा असून मंदिराचे छत ३२ खांबावर विसावले असल्याचे दिसून येते. मंदिरात चार खांबी सभामंडप असून पूर्वाभिमुख प्रमुख प्रवेशद्वार व दक्षिण व उत्तर बाजूस दोन प्रवेशद्वार आहेत. गर्भगृहातील मागील भिंतीवर हातात तलवार असलेली घोड्यावर आरुढ खंडोबा व म्हाळसा यांची दगडी मूर्ती आहे. गर्भगृहावरील शिखर सुंदर सजवले असून त्यावर देवदेवता व प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहेत. हे मंदिर त्याची स्थापत्य रचना व शिल्प कौशल्य या साठी प्रसिध्द आहे.
मंदिराचे बांधकाम मराठा शैली मधील असून मंदिरासमोर विटा च्या बांधकामातील सहा मजली ७० फूट उंचीच्या अष्टकोनी दोन दीपमाळा आहेत. या दीपमाळावर मानवी व प्राण्यांच्या आकृत्या चून्यामध्ये बनवण्यात आलेल्या आहेत. काहींच्या मते हे मंदिर बीडचे जहांगीरदार सुलतानजी निंबाळकर यांनी बांधलेले आहे. तर काहींच्या मते हे मंदिर महादजी शिंदे यांनी बांधलेले असल्याचे सांगितले जाते. निसर्ग रम्य अशा टेकडीवर असलेले खंडोबाचे मंदिर आपण सर्वांनी एकदा तरी अवश्य पहावे. याच टेकडीवरून संपूर्ण बीड शहराचे खूपच मनमोहक दृश्य दिसते.
मंदिराच्या टेकडीच्या बाजूला दक्षिणाभिमुख खंडेश्वरी देवीचे प्राचीन मंदिर आहे. गर्भगृहात एका चौथऱ्यावर खंडेश्वरीची सुंदर अशी मूर्ती आहे. हे मंदिर काळोजी नामक धनगराने बांधलेले असल्याचे येथील स्थानिक सांगतात. मंदिरासमोर या काळोजी विर धनगराची समाधी आहे.
रा. निपाणी ता. भूम
मो. 9421445159

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...