विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 12 June 2021

शिलाहार राजवंश भाग ३

 शिलाहार राजवंश

भाग ३
दक्षिण कोकणचे शिलाहार :
उत्तर कोकणच्या शिलाहारांप्रमाणेच हे शिलाहार घराणेसुद्दा राष्ट्रकूटांचे मांडलिक होते. उत्तर कोकण काबीज केल्यावर राष्ट्रकूट सम्राट दंतिदुर्गाचा काका आणि वारसदार कृष्ण (पहिला) याने दक्षिण कोकणावर ताबा मिळवला आणि त्या प्रदेशावर आपला प्रांताधिकारी म्हणून शनफल्ल याची नेमणूक केली. (इ.स. ७६५). हा शनफल्ल दक्षिण कोकण शिलाहार घराण्याचा मूळपुरुष. याच्या साम्राज्यात रत्नागिरीतील आणि गोव्यातील काही भागाचा समावेश होता.
सुरुवातीला गोव्यातील चंद्रपूर (हल्लीचे दक्षिण गोव्यातील चंदोर हे गाव) आणि नंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण ही यांची राजधानी होती, असे खारेपाटण येथे मिळालेल्या रट्टराजा शिलाहाराच्या ताम्रपटावरून समजते.
धम्मिराया, ऐयप्पाराजा, अवसर (पहिला, दुसरा आणि तिसरा), आदित्यवर्मन, भीम आणि शेवटचा रट्टराजा हे यातले काही प्रमुख राजे. यातल्या अवसर (तिसरा) याच्या कार्यकाळात एका दानपत्रात दोन व्यापार्यांना १०० दिनारांची वृत्ती दिली होती, असे लिहिले आहे (इ.स. ९८८). अरब दिनारांचा महाराष्ट्रातील इतका प्राचीन उल्लेख आश्चर्यजनक आहे.
या तिसर्या अवसराच्या कार्यकाळात राष्ट्रकूटांचे साम्राज्य कमजोर होऊन बदामीच्या चालुक्यांनी दक्षिण कोकणावर ताबा मिळविला आणि शिलाहार शाखेला स्वतःच्या अंकित करून घेतले. सत्याश्रय ह्या चालुक्य राजाच्या मृत्यूनंतर चोलांबरोबर सतत चालणार्या लढायांमुळे चालुक्यांची केंद्रीय सत्ता उतरणीला लागली आणि याचा फायदा घेत रट्टराजाने आपले स्वातंत्र्य घोषित केले. सत्याश्रयाचा उत्तराधिकारी विक्रमादित्य (पाचवा) हा कमजोर असल्याने रट्टराजास शासित करू शकला नाही. विक्रमादित्याच्या पाठीमागे ही उणीव भरून काढत विक्रमादित्याचा धाकटा भाऊ आणि चालुक्यांचा राजा जयसिंह याने दक्षिण कोकण काबीज करून रट्टराजाची सत्ता संपुष्टात आणली (इस. १०२४) व दक्षिण कोकण शिलाहार घराण्याचा शेवट झाला.


No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...