विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 18 June 2021

#हंबीरराव_मोहिते आणि #संताजी_घोरपडे

 १८ जून १६९७ सेनापती संताजी घोरपडे पुण्यतिथी.


#हंबीरराव_मोहिते
आणि #संताजी_घोरपडे
राज्यभिषेकाच्या समयी सर्व वीर रायगडावर जमले होते त्या अगोदर सशास्त्र ची स्पर्धा भरवली गेली होती आणि त्यामधून शूर योद्धा म्हणून ज्याने सर्व स्पर्धेवर आपलं नाव कोरल होत ते म्हणजे संताजी घोरपडे याना सोन्याचं कड हे बक्षीस म्हणून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या हातून दिल गेलं..
हंबीररावानी शिवराययांसमोर संताजी च खूप कौतुक केलं कि हा मला माझ्या सैन्यात पाहिजे त्याची शुरता हि आता रणांगणामध्येच जी काही तलवार चालवायची आहे ती शत्रूवर...त्यानंतर महाराज ,म्हाळोजी घोरपडे यांच्या चर्चेतून संताजी हे हंबिररावां सोबत जी मोहीम हाती घेतल्या त्यात त्यांनी मागे वळून बघितलच नाही..
संताजी घोरपडे यांचे नक्की जन्म साल माहीत नसले, पण जयसिंह पवारांच्या अंदाजानुसार साधारण १६४५ असू शकते. चिटणीस बखर सांगते की हंबीररावांच्या हाताखाली जे अनेक वीर होते त्यात एक संताजी घोरपडे होते. अहमदाबाद, बुरहानपूर, जालना, सिंदखेड हे मुलूख लुटत हंबीरराव स्वराज्यात आले. हंबीररावांच्या विनंतीवरून संताजीस जुमलेदारी मिळाली. दक्षिण दिग्विजय मोहिमेत कोप्पल प्रांत जिंकणे ही एक महत्त्वाची योजना होती. कोपल हे आदिलशाहीचे सरदार हुसैनखान आणि कासीम खान यांचे ठाणे होते. या मोहिमेत हंबीरराव यांनी या पठाण बंधूंचा पाडाव केला आणि कोपल स्वराज्यात सामील केले. ९१ कलमी बखर सांगते की या युद्धात संताजी आणि बहिर्जी घोरपडे यांनी मोठे रण माजवले. पण जालन्याच्या स्वारीत संताजीच्या हातून काही तरी चूक झाली म्हणूनच शिवाजीमहाराजांनी त्यास मुजऱ्यास न येण्याची शिक्षा ठोठावली असे ९१ कलमी बखर सांगते. जालन्याची मोहीम ही शिवाजीमहाराजांच्या जीवनातील शेवटची मोहीम. जालना शहर मराठयांनी ४ दिवस लुटले पण लूट परत आणताना रणमस्तखान या मोगल सरदाराने हल्ला केला आणि तो बरीच लूट परत घेऊन गेला, या युद्धात सिधोजी निंबाळकर कामी आले.
संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोघलांनी कोकणात मुसंडी मारली. खुद्द रायगडाला विळखा पडला. जुल्फिकारखान याने रायगड आणि आसपासचा परिसर जिंकण्यासाठी पराकाष्ट केले. याच दरम्यान संताजी खऱ्या अर्थाने एक नेता म्हणून उदयास आले. त्यांनी राजाराम, ताराराणी, राजसबाई यांस धनाजी बरोबर विळख्यातून सुखरूप बाहेर काढले. राजाराम राजे प्रतापगड मार्गे वासोटा, पन्हाळा करत बेदनूरच्या राणीच्या साह्याने जिंजीस सुखरूप निघून गेले. येथे महाराष्ट्रात, संभाजीच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य संपणार या धुंदीत मोघल गाफील झाले होते. नेमक्या याच गोष्टीचा फायदा संताजीने घेत खुद्द औरंगजेबाच्या तंबूवरील कळस कापून नेले. संताजीने आपल्या बंधू आणि विठोजी चव्हाण यांच्या साह्याने व अवघ्या २००० सैन्यानिशी तुळापूर येथील मोघल छावणीवर हल्ला करुन त्यांची बहुत हानी करून सिंहगडावर पसार झाले. (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध) नंतर संताजींनी जुल्फिकार खानावर हल्ला केला. जुल्फिकार त्या वेळेस रायगडाला वेढा घालून बसला होता. या छाप्यात त्यांना बरीच लूट मिळाली, ती घेऊउन ते थेट पन्हाळ्यास असलेल्या राजाराम राजांस भेटले.(संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध)साधारण १६८९ (नोव्हें- डिसें) या कालात शेख निजाम कोल्हापुरास होता. ह्यास संताजीने युद्धात हरवले, मुकर्रब खान याच युद्धात जबर जखमी झाला (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध). बहुधा तो युद्धातील जखमांमुळे मेला असावा.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...