विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 15 June 2021

शिक्केकरी देशमुख वाडा- वरंध महाड जि.रायगड

 













शिक्केकरी देशमुख वाडा-

वरंध महाड जि.रायगड
Team- पुढची मोहीम

रायगड जिल्ह्यातील वरंध ता.महाड येथील छत्रपती घराण्याशी सदैव स्वामीनिष्ठ असणारे श्री संभाजी नरसोजी गायकवाड अधिकारी शिक्केकरी देशमुख , तपे बिरवाडी यांचा ४०० वर्षापुर्वीचा एेतिहासीक वाडा आजही सुस्थितीत आपल्या कार्यकतृत्त्वाची साक्ष देतो. वाड्यात प्रवेश करण्यापूर्वी मोठे गणेशशिल्प दारावर पाहावयास मिळते. आजही ह्या घराण्यातील त्यांचे थेट वंशज श्री सुरेशराव बापु व विलासराव काका शिक्केकरी देशमुख वाड्यावर आलेल्या प्रत्येक व्यक्तीची मायेने प्रेमाने विचारपुस करून आदरातिथ्य करतात .ज्या आसनावर बसून न्याय निवाडे केले जायचे ते एेतिहासिक लाकडी आसन आजही आपल्याला या वाड्यात पहायला मिळते. सोबत देवघरातील तलवारी त्यांनी रणांगण गाजवल्याची ग्वाही देतात.
या घराण्याचा वंशविस्तार वरंध , देशमुख कांबळे , बिरवाडी , आसनपोई जि. रायगड , जुन्या पुणे मुंबई रस्त्यावरील कर्जत फाट्यावरील चौक गाव, खर्डी कसारा जि. ठाणे इ. ठिकाणी झाला आहे
शिवतिर्थ रायगडावर भोरमार्गे (वरंधा घाट) जाताना वरंध घाट उतरल्यावर लगेचच लागणाऱ्या वरंध गावातील या एेतिहासिक वाड्याला इतिहासाची आवड असणाऱ्या सर्व शिवभक्तांनी जरूर भेट द्यावी .

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...