विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 15 June 2021

कराडचा भुईकोट कराड जि. सातारा

 कृष्णा-कोयनेच्या संगमावर कराड येथे बहामनी राजवटीत एक प्रचंड भुईकोट बांधला गेला. हा एकेकाळी कराडचा किल्ला म्हणून ओळखला जात होता. आता भुईकोटाचे अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढे हा किल्ला थोरल्या शाहूमहाराजांच्या राजवटीत प्रतिनिधींच्या ताब्यात आला.

आता हे अवशेष काहिसे अस्तित्व दाखवत आहेत. किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा पूर्णपणे नष्ट झाला आहे. या कोटाचे सातारा जिल्हा गॕझेटिअरमध्ये वर्णन लिहिलेले आहे. किल्ल्याला अठरा बुरुज होते. दगडमातीच्या प्रचंड तटबंदीला जंग्या होत्या. भोवती सुमारे २ मीटर खोलीचा खंदक होता. कोयना नदीपात्रापासून १४ ते ३० मीटर उंचीवर हा किल्ला एकेकाळच्या चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार यांच्या वैभवाचे दर्शन घडवीत होता.
-

कराडचा भुईकोट
कराड जि. सातारा
Team- पुढची मोहीम

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...