पोस्त सांभार ::रितेश ठाकूर
१७ जून १८५८ महाराणी लक्ष्मीबाई साहेब पंचतत्वात विलिन होत असताना मठाच्या बाहेरील धूर्त फिरंग्याशी ७४५ नागा सधू लढले व हुतात्मा झाले.
१८ जूनच्या सकाळी युध्द शमले. सगळीकडे शातंता पसरलेली. सर ह्यु रोज आपल्या सेनेसह मठात दाखल झाला. त्यावेळी त्याला ७४५ साधूंचे पवित्र पार्थिव दिसले तसचे पुढे गेल्यावर एक शमलेली चिता दिसली. ह्यु रोजला काही कळाले नाही त्याने पायाने त्या चितेतील राख बाजूला केली. मानवी शरीराचे दहन झालेले समजले. पण त्याला राणीची अस्थी मिळाली नाही. ती रात्री बाबा गंगादास घेऊन निघून गेलेले.
ह्या वेळीर ह्यु रोज सोबत मैकफारसन, डॉक्टर क्रिस्टिसन आणि शिंदे सरकारांचा सेवक माधोजी होते. माधोजीं नी इथे बाईसाहेबांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार केले गेले असे सांगितले. परंतू ह्युरोजला ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता. त्याने ही बातमी फोर्ट विलियम पर्यंत टेलिग्राफिक संदेशामार्फत पोहचवली. फोर्ट विलियमकडून त्याला पुढील आदेश प्राप्त झाला.
"जर राणी आल्या तर त्यांना पकडून फाशी द्यावी आणि नाही आल्या तर समस्त भारतात राणीला मृत घोषित करावे." फोर्ट विलियम व राणी व्हिक्टोरियाच्या ह्या आदेशाचे ह्यु रोजने पालन केले. युध्दभूमि मध्ये तो राणी लक्ष्मीबाईंची प्रतिक्षा करीत होता. तसेच सर्व सैनिकांना राणीचा शोध घेण्याचा आदेश दिला. काही हाती न लागल्याने ह्यु रोज ने ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी मार्फत राणी लक्ष्मीबाईंना १८ जूनला मृत घोषित केले.
आणि आज पर्यंत अखंड भारतात महाराणी लक्ष्मीबाईंची पुण्यतिथी १८ जूनला साजरी करण्यात येते.
महाराणी राणी लक्ष्मीबाई यांना त्रिवार नमन!!
No comments:
Post a Comment