विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 June 2021

अलिजाह बहाद्दर H. H. श्रीमंत महाराजा माधवराव शिंदे (माधो महाराज)

 अलिजाह बहाद्दर H. H. श्रीमंत महाराजा माधवराव शिंदे (माधो महाराज)

(d. at पॅरिस, फ्रान्स ५ जून १९२५).


श्रीमंत महाराज जयाजीराव शिंदे यांच्यानंतर १८८६ ते १९२५ या काळात श्रीमंत माधवराव ग्वाल्हेर राज्याचे राज्यकर्ते होते.

श्रीमंत माधवराव महाराज हे प्रगतिशील असे राज्यकर्ते होते त्यांनी राज्यामध्ये शिक्षणाच्या सोयीसुविधा सुरु केल्या, सर्वत्र दवाखाने सुरु करून आरोग्य सेवा देखील सुरु केल्या, त्यांचबरोबर रेल्वे सुरु केली, दुर्गम प्रदेशातही रस्ते बांधणी केली, राज्यात ठिकठिकाणी धरणे, तलाव बांधले, राज्यामध्ये औद्योगिकीकरणाची सुरुवात केली, उद्योगधंदे सुरु केले. नव्या शहरांचे महत्व त्यांनी ओळखले होते त्यांनी त्या काळात आधुनिक, सर्वसोयींनीयुक्त असे शिवपुरी नगर वसवले, त्याचबरोबर राज्यातील अनेक नगरांच्या पायाभूत सेवा दिल्या, ज्या आजही पाहायला मिळतात.
महाराजांनी तत्कालीन अनेक इतिहासकारांना, मराठ्यांच्या इतिहास लेखनाला राजाश्रय दिला, विद्वान सरदार आनंदराव फाळके यांनी लिहिलेले शिंदेशाही इतिहासाचे खंड देखील महाराजांच्या प्रेरणा आणि पाठिंब्यातूनच, एवढाच नाहीतर देशातील छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात पहिला पुतळा पुण्यामध्ये बसवण्यात आला त्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्याबरोबर श्रीमंत महाराज माधवराव शिंदे यांनी पुढाकार घेतला होता, छत्रपतींनी स्थापिलेल्या स्वराज्याबद्दल अतीव प्रेम, निष्टा महाराजांच्या मनात होती.
श्रीमंत माधवराव शिंदे हे अतिशय उमदे व्यक्तिमत्व होते, ब्रिटिशांनी त्यांच्या Asiatic Review Series मध्ये महाराजांचे व्यक्तिमत्व आणि राज्यकार्यपद्धती यांची तुलना जगप्रसिद्ध फ्रेंच राजा Louis XIV (also known as Louis the Great or the Sun King) याच्याबरोबर करतात -
"Madhavrao Scindia was invested with full powers over a state as large as Scotland. In no short time, his subjects were surprised and gratified to find that their new ruler had energy and capacity not inferior to that displayed by the youthful Louis XIV of France. Day after day the young chief sat at his office table, plodded through his files, and minuted on them himself without the aid of clerk or secretary. Another way in which Madhavrao resembled the great French king was in the constant tours that he made through his dominions."
अतिशय तडफदार, उमद्या, प्रगतिशील, प्रजाहितदक्ष अशा श्रीमंत माधवराव महाराजांच्या पवित्र स्मुर्तीस विनम्र अभिवादन 💐 मानाचा त्रिवार मुजरा 🙏
~ अंबरीश शिंदे फाकडे, कण्हेरखेड

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...