विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 June 2021

गागाभट्ट


 गागाभट्ट

गागाभट्ट हे राज्याभिषेकाबाबत आग्रही होते त्यामुळे सनातनी हे गागांचा व्देश करतात तर तथाकथित पाखंडी लोक गागाभट्ट याचा व्देश करतात परंतु गागाभट्ट हे शिवछत्रपती यांचे राज्याभिषेकाबाबत सर्वांना पुरून उरले होते.
सभासद बखरीतील ही नोंद महत्वाची ती खालीलप्रमाणे,
"वेदमुर्ति राजेश्री गागाभट्ट म्हणून वाराणशीहून राजियाची किर्ति ऐकून दर्शनास आले.भट गोसावी, थोर पंडित,चार वेद,सहा शास्त्रे योगाभ्याससंपन्न,ज्योतिषी,मांत्रिक,सर्व विद्येनें निपुण,कलियुगींचा ब्रम्हदेव, असे पंडित;यांस राजे व सरकारकून सामोरे जावून भेट घेवून सन्मानें आणिलें.त्यांची पुजा नानाप्रकारे रत्नखचित अलंकार,पालखी,घोडे,हत्ती देवून,द्रव्यहि उदंड घेवून पूजिलें.गागाभट्ट बहुत संतुष्ट जाहले.भट गोसावी यांचे मतें मुसलमान बादशहा तख्तीं बसून,छत्र धरून पातशाही करतात आणि शिवाजीराजे यांणींही चार पातशाही दबविल्या आणि पाऊण लाख घोडा,लष्कर,गड,कोट असें असता त्यांस तख्त नाही;याकरिता म-हाटा राजा छत्रपती व्हावा असे चित्तांत आणिले.अवघे मातबर लोक बोलावून आणून विचार करिता सर्वांचे मनास आलें तेव्हां भट गोसावी म्हणू लागले कि तक्तीं बसावें"
यावरून गागाभट्ट हे राज्याभिषेकास आग्रही होते व ते स्वतः आले होते त्यामुळे ते यायला तयार नव्हते त्यांनी पैसे मागितले असे विनाधार कोणतेही पुरावे नसलेले ऊत्तरकालिनआरोप निकालात निघतात.
याशिवाय गागाभट्ट यांचेबाबत इतर आरोप केले जातात त्यात गागाभट्ट यांनी भरपुर द्रव्य उकळले वगैरे परंतु शिवछत्रपती यांनी स्वःत दान केले व त्यांनी त्यांचे स्वेच्छेने धन द्रव्य अन्नदान व इतर चीजवस्तू दान त्यामुळे येथे शिवछत्रपती यांची पिळवणूक करण्याचा प्रश्नच उरत नाही.याशिवाय गागाने पायाचे अंगठ्याने तिलक केला अशी ऊत्तरकालिन भाकडकथा सांगीतली जाते परंतु त्यास कोणताही पुरावा नाही अथवा इतिहासात त्याला आधार नाही.
याशिवाय गागाभट्ट यांचे ग्रंथातील निवडक वाक्ये देवून शिवछत्रपती हे ब्राम्हणांचे राजे नाहीत असे सांगितले जाते परंतु श्रीशिवराज्याभिषेकांतल्या 'सोमो अस्माकं ब्राह्मणानां राजा' ह्या मंत्राच्या अर्थाचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे ..
उपरोक्त मंत्र हा यजुर्वेदाच्या ९व्या अध्यायांतला अंतिम असा ४० वा मंत्र असून त्याच्या चुकीच्या मराठी अनुवादाचे एक छायाचित्र प्रसृत करून गागाभट्ट यांचेबाबत ब्राम्हण म्हणून द्वेष रेटला जातो आहे. सर्वप्रथम तो निम्नलिखित मंत्र काय आहे ते पहावे.
ॐ इ॒मन्दे॑वा ऽअसुप॒त्नᳯ सु॑वध्वम्मह॒ते क्ष॒त्राय॑ मह॒ते ज्यै॑ष्ठ्याय मह॒ते जान॑राज्या॒येन्द्र॑य॑ । इ॒मम॒मुष्य॑ पु॒त्रम॒मुष्यै॑ पु॒त्रमस्यै वि॒शऽए॒ष वो॑मी॒ राजा॒ सोमो॒ स्माक॑म्ब्राह्म॒णाना॒ राजा॑ ॥
यजुर्वेद ९।४०
ह्या मंत्राचा जो अर्थ त्या चित्रामध्ये दिलेला आहे तो चुकीचा तर आहेच कारण तिथे 'सोमो अस्माकं ब्राह्मणांना राजा' असा एवढाच अर्धवट संदर्भ घेऊन 'सोम हाच आह्मां ब्राह्मणांचा राजा' असा चुकीचा काढलेला आहे. वास्तविक पूर्ण मंत्र किती मोठा आहे हे सर्वांस आता कळलंच असेल. आता त्या मंत्राचा शब्दशः अर्थ पाहुयांत
*महते क्षत्राय ज्यैष्ठ्याय महते जानराज्याय - महान क्षात्रबलासाठी, महान अशा राज्यपदासाठी, महान अशा जनसंख्येंवर राज्य करण्यासाठी*
इन्द्रस्य इन्द्रियाय, देवाः असपत्नम् इमम् सुवध्वम् - परम् ऐश्वर्यवान इंद्र अर्थात राजाच्या ऐश्वर्यप्राप्तीसाठी, देवगण शत्रुरहित ह्या योग्यपुरुषांस अभिषिक्त करोत
इमं अमुष्य पुत्रं अमुष्यै पुत्रं अस्यै विशे - ह्या पित्याचा हा पुत्र, ह्या अमुक मातेचा पुत्र, ह्या प्रजेसाठी (त्याचा) राज्याभिषेक केला जात आहे.
अमी - हे अमुक अमुक राजे लोकहो, प्रजे लोकहो
वः एषः राजाः सोमः - आमचा आह्मां सर्वांचा हा राजा सोमाच्या समान पवित्र आहे
(सः) अऽस्माकं ब्राह्मणानां राजा - तो आह्मां ब्राह्मणांचाही राजा आहे
आता हाच मंत्र श्रीगागाभट्टांच्या पोथीमध्ये आहे तसा दिला असून तिथे पुढे
*अत्र सर्वनामस्थाने राजनाम तत्पितृनाम् तन्मातृनाम् गृण्हीयात्*
म्हणजे उपरोक्त मंत्रामध्ये अमुक अमुकच्या ठिकाणी श्रीशिवाजी महाराजांचे, त्यांच्या पिताश्रींचे, त्यांच्या मातुःश्रींचे नाव उच्चारावं असे म्हटलंय.
त्यामुळे इथं सोम ही संज्ञा प्रत्यक्ष राजाला अर्थात श्रीशिवछत्रपतींना वापरली असून तेच आह्मां सर्व ब्राह्मणांचे राजे आहेत असं स्पष्ट विवेचन आहे. परंतु मराठी अनुवादकर्त्याने सोम हाच आमचा राजा आहे असे विकृत अर्थ केला आहे.
*आता काहींना हा आह्मीं दिलेला मंत्रार्थ खोटा वाटेल त्यांच्यासाठी स्वतः ज्येष्ठ इतिहासकार वा सी बेंद्रेंचा अनुवाद पाहुयांत*
पृथ्वीवरचे साक्षात् तत्कालीन कलियुगीचे ब्रह्मदेव असे वर्णन ज्यांचे केलं केलं, त्या वेदमूर्ती श्रीगागाभट्टांनी जी श्रीशिवराज्याभिषेकाची पोथी रचली, त्याचे प्रथम प्रकाशन आधुनिक काळामध्ये फेब्रुवारी १९६० मध्ये श्री वा सी बेंद्रेंनी संपादनरुपी केलं. त्याला ५९ पृष्ठांची त्यांची प्रस्तावना असून त्यातंच ह्या मंत्राचे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे ते पाहूयांत.
ज्येष्ठ इतिहासकार श्री वासुदेव सीताराम बेंद्रेंनी पृष्ठाङ्क ४९ व ५० वर ह्या मंत्राचा काय अर्थ केलाय ते पहा....
*Then they took him to the bathing hall saying..'महते क्षत्राय...' Thus making him the king of Brahmins*
म्हणजे *त्या पुरोहितांनी त्यांना (श्रीशिवछत्रपतींना अवभृत स्नानासाठी) स्नानगृहाकडे नेताना तो मंत्र म्हटला व सर्व ब्राह्मणांचा त्यांना राजा केला.*
पुढे हेच बेंद्रे म्हणतात की
*Thus by this special bath, they accepted Shivaji Maharaj as the king of all including the Brahmins.*
*"ह्या विशेष स्नानाने ते शिवाजी महाराज हे त्या सर्वांचेच ज्यांत ब्राह्मणसुद्धा आले, त्यांचे सुद्धा राजेच झाले.
म्हणजेच बेंद्रेंच्या इंग्रजी अनुवादानुसार महाराजांना ब्राह्मणांनीसुद्धा आपला राजाच आनंदाने स्वीकारलं आहे.
परंतु समाजमाध्यमांवर प्रसृत होत असलेल्या मराठी अनुवादाच्या पृष्ठांवर मात्र चुकीचा अर्थ दिला आहे. म्हणजेच मराठी अनुवाद चुकलेला असून वरील दिलेला अर्थ व श्री बेंद्रेंचा अर्थ दोन्ही एकंच आहेत.यामुळे निसंदेह शिवछत्रपती या राज्याभिषेकाने सर्वांचे राजे झाले ते ब्राम्हणांचेही वरील पुरावे यावरून राजे होतात.
गागाभट्ट यांचा राजर्षी शाहू महाराज यांचे काळातील व त्यानंतरचे कट्टर सनातणी ब्राम्हण हे सनातनी प्रवृत्तीमुळे व्देश करतात.गागा सौचकुपात मेला असे सांगतात परंतु जन्माला आलेला प्रत्येक जीव मरण पावतोच मग गागा त्याला अपवाद नाहीत. स्वतः ला पुरोगामी म्हणणारे व गागाभट्ट हे ब्राम्हण आहेत म्हणून अब्राम्हणी प्रवृत्तीने पछाडलेले लोकही गागाभट्ट याचा व्देश करतात परंतु गागाभट्ट हे वेदपारंगत होते ते थोर पंडित,चार वेद,सहा शास्त्रे योगाभ्याससंपन्न,ज्योतिषी,मांत्रिक,सर्व विद्येनें निपुण होते त्यांनी द्विवर्णवादाचा सिद्धांत खोडून काढला हे व्दिवर्णवादी समर्थक लोकांचे डोळ्यात सलते ती सल त्यांचे डोळ्यात लाल रक्ताळलेली दिसत आहे.
With thanks
Ad.Vinayak sarvale

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...