हिंदवी स्वराज्याचे मास्टर माइंड शहाजीराजे
भातवडीच्या लढाईमुळे मालोजीराजे व शहाजीराजे या पितापुत्रांच्या पराक्र‘माचे दर्शन घडले. शहाजीराजांची प्रतिष्ठा, पराक्रम व मुत्सद्दीपणा या गोष्टी सिद्ध झाल्या. गनिमी काव्याची लढाई ही किती उपयुक्त आहे हे भातवडीच्या लढाईने सिद्ध केले. कदाचित हाच गनिमी काव्याचा श्रीगणेशा ठरला व पुढे मराठेशाहीत उपयोगी ठरला. पुढे मलिक अंबरास शहाजीराजांचा द्वेष वाटू लागला. त्यामुळे शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते आदिलशाहीत दाखल झाले. शहाजीराजांनी चार वर्षें शहाजहानशी जो सामना दिला तो फार महत्त्वाचा आहे. गनिमी काव्याने मोगलांशी लढल्यामुळे महाराष्ट्राचा डोंगराळ प्रदेश त्यांना माहीत झाला. शहाजीराजांनी त्यांच्या पाठीशी मावळ्यांची सेना उभी केली. निजामशाही बुडाल्यावर ते आपल्या साधनसंपत्तीसह परत आदिलशाहीत गेले. त्यांच्याएवढा मातब्बर सरदार दक्षिणेत नव्हता म्हणून आदिलशाहीत त्यांना त्याच सन्मानाने घेतले.
अर्थात भातवडीच्या या युद्दात मराठी राज्याचा थेट संबधच नाही पण ह्या लढाईचा परीणाम काही वेगळाच आहे,निजमाशाहीच्या मलिक अंबरने आदिलशाही आणी मुघलं या सत्तेला शह दिला. अहमदनगर येथुन पाच कोसावर इ.स. ३१ ऑक्टोबर १६२४ साली झालेल्या या युद्धाने मलिकंबरच नाव भारतीय राजकारणात खुप पक्क झालं,पण या युद्धात शरीफ भोसले मारले पण शहाजी भोसले नावाचा एक तडफ़दार सरदार खर्या अर्थाने नावारुपाला आला. पाहायला गेलं तर मराठेतर कोणत्याही लेखात शहाजीराजेंच नाव या लढाईत नाही,पण शिवभारतकार शहाजींच या लढाईत पराक्रम गाजवला म्हणुन वर्णन करतो जे योग्यच आहे, पुढे या युद्धामुळे शहाजीराजेंच राजकीय वजन नक्कीच वाढलं, त्यातूनच शहाजीराजें निजामशाही सोडुन आदिलशाहीत गेले,यातून शहाजींचा बोलाबाला व्हायला सुरुवात झाली, पुढे शहाजींनी मुर्तिजा निजामशाही स्थापुन, समर्थपणे चालवली, यातच मराठे राज्य चालवू शकतात हे सिद्ध झालं,थोडक्यात या युद्धाने शहाजींचा भारतीय राजकारणात उगम झाला,शहाजीराजे हे मातबर सरदार म्हणुन उदयाला आले,याचा परीणाम शिवाजी महाराजांच्या बालपणावर नक्कीच झाला असेल कदाचित स्वराज्याच्या देखण्या स्वप्नाचा हा श्रीगणेशा असावा.
लेखन व माहिती संकलन
विजयश भोसले
No comments:
Post a Comment