#सेनासप्तसहस्री_श्रीमंत_कृष्णाजीराव_पवार_महाराज (पहीले) देवास थोरली पाती
पोस्त्साम्भर :महेश पवार
देवासचे पहिले राजे श्रीमंत तुकोजीराव पवार यांच्या मृत्यूनंतर श्रीमंत कृष्णाजी पवार हे देवास थोरल्या पातीची राजे झाले.
कृष्णाजीरावांनी मराठेशाहीच्या विस्तारासाठी अपार मेहनत घेतली होती . महादजी शिंदे यांचे विश्वासू साथीदार म्हणून कृष्णाजीराव पवार यांचे नाव घेतले जात असे, महादजी शिंदे यांनी केलेल्या बहुतेक लढायांमध्ये कृष्णाजीराव सामील होते.
इसवी सन 1768 मध्ये पेशव्यांनी रघुनाथरावावर केलेली स्वारी , महादजी शिंदे यांनी 1779 पासून उत्तर हिंदुस्थानावर केलेल्या स्वार्यांमध्ये कृष्णाजीरावांचा सहभाग होता, 1780-81 मध्ये इंग्रजांशी झालेला युद्धातही कृष्णाजीरावांनी मोठा पराक्रम गाजवला होता. इसवी सन 1782 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांशी तह केला त्यात मराठ्यांच्या वतीने महादजी शिंदे यांनी बोलणी केली तेव्हा कृष्णाजी पवार त्यांच्यासोबत होते.
महादजी शिंदे यांच्या बरोबर कृष्णाजीराव पवार दिल्लीच्या बादशहाला शहाआलम यास भेटावयास गेले असता ,बादशहाने कृष्णाजीरावांचा मानाचा पोशाख व तलवार देऊन सत्कार केला होता. तसेच बादशहाचे प्रांत रोहील्यांच्या ताब्यातून सोडवण्याची जबाबदारी बादशहाने कृष्णाजीरावांना दिली होती. दिल्लीवर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ज्या लढाया झाल्या त्यात कृष्णाजीराव प्रामुख्याने हजर होते.
या सर्व लढाया , तह , राजकारणात कृष्णाजीरावांच्या अंगी असलेले शौर्य , पराक्रम , बुद्धिचातुर्य , राजकारणकौशल्य , स्वदेशप्रीती व स्वामिनिष्ठा इत्यादी अनेक गुण प्रकर्षाने जाणवतात.
देवास थोरलीपाती मधील जुना राजवाडा कृष्णाजीरावांनी बांधला असून तेथील गंगाबावडी व गंगाबावडी शेजारी राम मंदिर ही त्यांनीच बांधले आहे.
कृष्णाजीरावांना तीन बायका होत्या त्यापैकी पहिल्या गंगाबाईसाहेब या कोडीलकरांच्या कन्या , दुसऱ्या आनंदीबाईसाहेब या वाघोलीकर जाधव यांच्या कन्या , त्यांच्या तिसऱ्या पत्नी लक्ष्मीबाई साहेब ह्या होत्या. कृष्णाजी रावांना भागीरथाबाई नावाच्या एक कन्या होत्या.
कृष्णाजीरावांना पुत्र नसल्याने त्यांनी राणोजीराव पवार विश्वासराव यांचे पुत्र दत्तक घेऊन त्यांचे नाव तुकोजीराव ठेवले होते. कृष्णाजीरावांचा मृत्यू 24 मार्च 1789 रोजी बरहाणपुर येथे तापी नदीच्या किनारी झाला होता.
आपले बरेचसे आयुष्य रणांगणावर व्यतीत करणाऱ्या पराक्रमी श्रीमंत कृष्णाजीराव पवारांना जयंती निमित्त मानाचा मुजरा
लेखन
महेश पवार
7350288953
No comments:
Post a Comment