दे वास धाकट्या पातीचे आठवे महाराज
श्रीमंत सदाशिवराव पवार (दुसरे) उर्फ खासेसाहेब
postsaambhar :mahesh pawar
श्रीमंत सदाशिवराव पवार यांचा जन्म दि. 13 ऑगस्ट 1887 झाला. त्यांचे शिक्षण स्थानिक व्हिक्टोरिया हायस्कूल, डेली कॉलेज, इंदूर, मेयो कॉलेज, अजमेर आणि इम्पीरियल कॅडेट कॉर्प्स, देहरादून येथे झाले.मॅट्रिक पास झाल्यानंतर कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लिंकन इनमध्ये प्रवेश घेतला.
त्यांच्या पत्नी प.पू. महाराणी ए.एस. आंग्रेंच्या प्रसिद्ध घराण्यातील पार्वतीबाई साहेब, बडोद्याच्या महाराणी साहेबांच्या भाची होत्या. श्रीमंत सदाशिवराव पवारांना एक मुलगा आणि दोन मुली असा परीवार होता.श्रीमंत सदाशिवराव पवारांनी 1908, 1913, 1930, 1935 आणि 1938 मध्ये युरोपला भेट दिली. ते उत्कृष्ट टेनिसपटुही होते.
1917 मध्ये मराठा एज्युकेशन कॉन्फरन्स, 1919 आणि 1933 मध्ये कुर्मी क्षत्रिय कॉन्फरन्स आणि 1936 मध्ये आयुर्वेदिक कॉन्फरन्सचे श्रीमंत सदाशिवराव पवार अध्यक्ष होते.
श्रीमंत सदाशिवराव पवार पुणे ग्रामीण मतदारसंघातून 1925 मध्ये मुंबई विधान परिषदेचे सदस्य आणि 1936 मध्ये चेंबर ऑफ प्रिन्सेसच्या स्थायी समितीचे सदस्य म्हणून निवडून आले होते. मराठा एज्युकेशन सोसायटीच्या व पुण्याच्या छत्रपती शिवाजी स्मारक उभारण्यात श्रीमंत सदाशिवराव पवारांचा मोठा सहभाग होता.
श्रीमंत सदाशिवरावांनी देवासच्या विकासासाठी सर्वांगीन प्रयत्न केले.त्यांच्या काळात गाव आणि नगर पंचायतींचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे; एक प्रसूती गृह उघडले आहे;व्यावसायिक शिक्षण सुरू केले आहे; आणि ग्रामोन्नतीचा व्यापक कार्यक्रमाची पायाभरणी करण्यात आला.
युद्धात मृत झालेल्या सैनिकांच्या वारसदारांच्या देखरेखीखाली युद्ध समिती त्यांनी स्थापन करुन
अंतर्गत सुरक्षेचे उपाय करणे आणि नागरी रक्षकांची नोंदणी करणे इ. कामे त्यांना नेमुन दिली.
No comments:
Post a Comment