विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 1 January 2022

#श्रीमंत_तुकोजीराव_पवार_पवार_व्दितिय

 #श्रीमंत_तुकोजीराव_पवार_पवार_व्दितिय

postsaambhar :mahesh pawar 



"पांच कोट रूपये, तीस लाखांचा मुलुख, देवगिरीचा किल्ला, नागपूरकर भोसले यांचा जो मुलुख दाबला आहे व जो वसूल देणे आहे त्याचा फडशा करावा, दक्षिणेत बिलकुल गोवध न करावा, हिंदूंचे जाग्यास उपद्रव न देणे, हिंदूंच्या धर्मास खलष न करणे, आपाआपले चालीने धर्मावर कायम चालणे या अटीशर्ती मान्य करून "निजामाने" मराठ्यांसमोर गुडघे टेकले.."
या युध्दात दोन्ही बाजूंनी सर्व शस्त्रास्त्रे परजली गेली. मुत्सद्दी, दिग्गज रणवीर आमनेसामने लढले. निजामाच्या फौजेचा मोड करणार्या आघाडीवर एक कोवळा मराठा सुपुत्र लढला होता.. त्याचे वय होते अवघे अकरा वर्षे.. दौलतराव शिंदे यांच्या लष्करातील जिवबादादा बक्षी यांच्यासमवेत आघाडीस जाऊन त्या कोवळ्या पोराने अतुलनीय पराक्रम गाजवत तरवार परजत निजामाच्या अवलादींना दस्तुरखुद्द रणांगणावर प्रत्यक्षात अस्मान दाखवले.. त्या वीर अभिमन्यूचे नाव होते.. "सेनासप्तसहस्त्री", "श्रीमंत दुसरे तुकोजीराव महाराज पवार"
अकरा वर्षाच्या वीर मराठ्याने इसवी सन १७९५ सालात खर्ड्यातच निजामास दख्खनचे खडे चारून "कोण मोठे" हे बोलबच्चन न देता लखलखत परजणार्या मराठी मुठीतील तरवारीने दाखवून दिले आहे. तेव्हा निजामी असुर पिलावळीने "कौन बडा" आणि "कौन छोटा" च्या फुका बाता निदान मराठ्यांसमोर तरी मारू नयेत.
श्रीमंत तुकोजीराव पवार यांच्या गौरवार्थ त्याकाळी एक दोहा रचला गेला..
कृष्णराव के पुत्र थे, तकूराव बलवान |
छोटे थे पर वीर बहु, करने चले घमासान ॥
तीस लाख को परगनो, कब्जो कियो तमाम |
और लियो आसेर को, दौलत बाद ही नाम ॥

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...