विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 1 January 2022

नागपुरचे महाराज श्रीमंत राजे रघूजी महाराज भोसले (तृतिय)

 नागपुरचे महाराज

श्रीमंत राजे रघूजी महाराज भोसले (तृतिय)
postsaambhar :mahesh pawar
राजे रघूजी भोसले यांचा जन्म १६/८/ १८०७ मध्ये झाला. २६/६/ १८१८ मध्ये वयाच्या १० व्या वर्षी तिसरे रघूजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. ते उत्तम राज्यकर्ते होते. राज्यात दर पाच वर्षांनी जणगणणा होत असे. जन्म मृत्युची नोंद केली जाई. नागपूर बहु भाषी राज्य होते. विविध राज्यातील पण लोक येऊन स्थायिक झाले होते. झाडी कुणबी, मारवाडी, अग्रवाल, मुसलमान वगैरे मराठी, हींदी, गोंडी प्रमुख भाषा होत्या. कानडी, तेलगु, उडीया बोलली जात असे. राज्य कारभार मराठीत चालत असे. हिंदू मुस्लीम सलोखा होता.
राज्याच्या मुलकी व लष्करी विभागात मुस्लीम होते. राज्याचे सल्लागार व वैद्य मुस्लीम होते. महाराजांनी शिक्षण व्यवस्था उत्तम केली होती, प्रत्येक जिल्ह्यात १ शिक्षकी शाळा होती. लिहीणे वाचणे व गणिताचे शिक्षण दिले जात होते. पंडित संस्कृतच तर मौलवी फासींचे शिक्षण देत असत. राज परिवार सुशिक्षीत व्हावा म्हणून शिक्षकांची नेमणूक केली होती. साहित्य क्षेत्रातही बरीच प्रगती झाली होती. संस्कृत, उर्दू व फार्सी मध्ये दर्जेदार ग्रंथ निर्माण झाले होते. त्यांनी ३६ वर्ष उत्तम कारभार केला. ११/ १ २/ १८५३ ला वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...