विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 24 March 2022

महाराष्ट्राची भूमी प्राचीन काळात 'दक्षिणापथ' मधील 'दंडकारण्य' या नावाने ओळखली जात होती. भाग ३

 

महाराष्ट्राची भूमी प्राचीन काळात 'दक्षिणापथ' मधील 'दंडकारण्य' या नावाने ओळखली जात होती.
पोस्त सांभार :सतीश राजगुरे

भाग ३
सध्याचा देशातील नक्षल प्रभावित 'दंडकारण्य प्रदेश' म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवरील घनदाट जंगल असून ते 'अबुझमाड' पर्वताचे क्षेत्र आहे. भारताच्या मध्यवर्ती भागांत विविध राज्यांना लागून असलेल्या दंडकारण्य प्रदेशाचे क्षेत्रफळ ६,३०,००० चौरस कि.मी. असून त्याची लांबी १८०० कि.मी. तर रुंदी ३५० कि.मी. इतकी आहे.
दंडकारण्य प्रदेशाचा मध्यभाग बहुतांश महाराष्ट्र, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंड या राज्यांच्या सीमाबद्ध षट्कोनामध्येच आहे. महाराष्ट्र ते झारखंड या सहा राज्यांच्या सीमारेषांच्या षट्कोनात जुळलेल्या अरण्याला नक्षलवादी 'दंडकारण्य प्रदेश' असे संबोधतात.
हा प्रदेश अतिशय घनदाट जंगल आणि नद्यांच्या मार्गाने असल्याने गनिमी काव्यासाठी व पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी त्यांना सोयीचे जाते. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हा आणि महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्हे दंडकारण्य या प्राचीन प्रदेशाचा भाग आहेत.
अति दुर्गम भाग, घनदाट अरण्य, वळणाच्या नद्या, पर्वतीय क्षेत्र आणि सुरक्षा दलांचा 'दंडकारण्याच्या भ्रमंतीच्या अभ्यासाचा अभाव' ही कारणे लक्षात घेऊन नक्षलवाद्यांनी आपली चळवळ वाढविण्यासाठी 'सुरक्षित ठिकाण' म्हणून दंडकारण्याची निवड केली असल्याचे दिसून येते.
ह्युएन-त्सांग हा चिनी प्रवासी भारतात असताना जेव्हा महाराष्ट्रात आला, तेव्हा त्याने त्याच्या लेखनात ‘ही भूमी दंडकारण्य नावाने ओळखली जात असे’ असा उल्लेख केला आहे.
त्याच्या प्रवासवर्णनात महाराष्ट्राबद्दल केलेल्या नोंदीत महाराष्ट्राबद्दल तो म्हणतो,
‘‘इथली जमीन अतिशय सुपीक आहे. लोक सधन आहेत, पण त्यांची राहणी अतिशय साधी आहे. स्वभावाने हे लोक अतिशय तापट असले तरी नाहक आक्रमक नाहीत. मात्र कुणी यांच्यावर आक्रमण केल्यास, हे लोक आपल्या शत्रूचा पाठलाग करून त्याला समूळ संपवतात!”[

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...