बडोद्याच्या शाही श्रीमंत गायकवाड राजघराण्याचे हे खाजगी निवासस्थान याचे बांधकाम श्रीमंत महाराजा सर सयाजीराव गायकवाड(तिसरे )यांच्या कार्यकाळात झाले. त्याचवळेचा इतिहास पुढील प्रमाणे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न ,श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड (तिसरे)यांचा पहिला विवाह 6जानेवारी 1880 या दिवशी तंजावरच्या राजघराण्यातील हैबतराव नारायणराव मोहिते यांच्या धाकट्या कन्या लक्ष्मीबाई यांच्या शी झाला. लक्ष्मीबाई उर्फ महाराणी चिमणाबाईसाहेब(पहिल्या)या तंजावरच्या राणीसाहेबांच्या भाची होत्या.आणि या विवाहानंतर अवघ्या सहा दिवसांनी 12 जानेवारी 1880 रोजी बडोद्याच्या लक्ष्मी विलास राजवाड्याचा पायाभरणी समारंभ आयोजित केला होता.त्या प्रसंगी मुंबईचे गव्हर्नर उपस्थित होते मेजर मॅट या कुशल कारागिराच्या हातून या राजवाड्याचा नकाशा व रचना करविण्यात आली होती.या समारंभात भाषण करतांना बडोद्याचे दिवाण सर टी माधवराव यांनी राजवाड्याबद्दल केलेले वर्णन
या राजवाड्याची शिल्प रचना पध्दती हिंदूस्थानी अथवा इंडो-सारसेनिक शैलीत ती आपल्या परंपरांना आणि मनोभावनांना अनुसरून अशीच केलेली आहे.हिंदू व मुस्लिम या दोन्ही शिल्प पध्दतीचा मिलाफ तिच्यामध्ये पाहायला मिळतो.इकडच्या हवामानानुसार व हिंदू रिवाजाप्रमाणे सुखसोयींची तजवीज करून याची रचना करण्यात आली आहे.या वाड्यासाठी लागणारा दगड हा बडोदा राज्यातील च असून तो सोनगडाच्या खाणीतून काढण्यात आला आहे.हा दगड पोरबंदर च्या दगडापेक्षा चांगला आहे.राजवाड्यातील मुख्य दरबार चा दिवानखाना फार भव्य व प्रशस्त आहे.त्याची लांबी 93 फुट व रूंदी 54 फुट असून यामध्ये एकही खांब नाही.यांत दरबाराच्या बसण्याच्या पध्दतीमध्ये एक हजार माणसांचा सामावेश होईल. असे तत्कालीन बडोद्याचे दिवाण सर टी .माधवराव यांनी वर्णन केले होते.
बडोद्याच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक राजनैतिक वैभवात भर घालणारा हा बडोद्याचे महाराजा सर सयाजीराव गायकवाड(तिसरे)यांनी बांधलेला राजवाडा.जगातील सर्वात मोठ्या राजमहालांपैकी एक बकिंगहॅम पॅलेस पेक्षा 4पट मोठे हे आजही बडोद्याच्या गायकवाड राजघराण्याचे खाजगी निवासस्थान आहे.आजही दिमाखात उभा राहून बडोद्याच्या शाही श्रीमंत गायकवाड राजघराण्याच्या कर्तृत्वाची ,वैभवाची,श्रीमंतीची,लोकहितवादी कार्याची साक्ष आजही लक्ष्मी विलास राजवाडा देत आहे.आणि बडोदा नगरी हि गायकवाड राजघराणाच्या आणि लोकराजा महाराजा सर सयाजीराव गायकवाड(तिसरे)यांच्या लोकहितवादी कार्याची साक्ष देत आहे.अशा अनेक वास्तू बडोदा नगरीत मराठा गायकवाड राजघराणाच्या कार्याची महती सांगत दिमाखात उभ्या आहेत. अवश्य एकवेळ भेट द्या एवढेच सांगेन हा शिवभक्त शुभम गायकवाड पाटील .#आम्हीशिवछत्रपतींचेमावळे समुहाकडून लोकराजा महाराजा सयाजीराव गायकवाड (तिसरे)यांना मानाचा मुजराजय शिवराय जय सयाजी
शब्दांकन शुभम गायकवाड पाटील(लेख अधिकृत)©9696kuli©
No comments:
Post a Comment