विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 1 October 2022

महाराष्ट्रातील प्राचीन आणि ऐतिहासिक राजा ईल उर्फ श्रीपाल भाग १

 

महाराष्ट्रातील प्राचीन आणि ऐतिहासिक राजा ईल उर्फ श्रीपाल
पोस्तसांभार ::सतीश राजगुरे


भाग १
महाराष्ट्रातील प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे शहर म्हणून अचलपूरची ओळख आहे. येथे अकराव्या शतकात राजा ईल उर्फ श्रीपाल नावाचा जैनधर्मीय राजा होऊन गेला. अर्थात मोगल प्रथम दक्षिणेत आले, त्यापूर्वी अचलपूर येथे 'ईल' राजा राज्य करीत होता. कदाचित या राजाची माहिती अनेकांना नसावी.
ईल राजाने सातपुड्याच्या पायथ्याशी एक शहर वसवून, ती आपल्या राज्याची राजधानी केली व स्वतःच्या नावावरून त्याला 'ईलपूर' हे नाव दिले. पुढे त्याचे 'एलिचपूर' हे नाव पडले. आज आपण ह्याच शहराला 'अचलपूर' म्हणून ओळखतो.
एलिचपूर शहर इ.स. १०५८ मध्ये वसवले असावे, असे म्हटले जाते. ईल राजाच्या पूर्वजांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु एलिचपूर पासून ७ कि.मी. अंतरावर असलेल्या 'खानजमानगर' येथील रहिवासी होता, असे मानतात.
माळव्याच्या इतिहासाच्या आधारे राजा ईल हा धारनगरीच्या परमारांचा महामंडलेश्वर होता, असे म्हणावे लागेल. ईलच्या काळात विदर्भाच्या पूर्वेला राष्ट्रकूट शासक धाडीभंडक याचे राज्य होते, असे सीताबर्डी (नागपूर) येथील शिलालेखावरून दिसते. उत्तरेला दिवालपूर येथे बंकल नावाचा शासक ईल राजाचा शत्रू होता.
विदर्भात 'जैन' संस्कृतीचा प्रसार राजा ईलमुळेच झाला, याचे उल्लेख अनेक जैन ग्रंथात आढळतात. या राजाच्या काळात शिरपूर येथील प्रसिद्ध पार्श्वनाथ जैन मंदिर, मुक्तागिरी हे प्रेक्षणीय स्थळ, वेरूळ येथील लेण्या तसेच अनेक विहार आणि मंदिरांची निर्मिती/विकास झाल्याचा इतिहास सापडतो.
पूर्वीचे 'मेंढागिरी' आताचे 'मुक्तागिरी'- सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या मुक्तागिरीला ‘जैन धर्मीयांची काशी’ असेही म्हणतात. येथे जैन धर्मियांची पुरातन ५२ मंदिरे आहेत.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...