औरंगजेब मेल्यानंतर त्याच्या वारसांनी आपापसात वाद घातला आणि मराठयांचा विरोध टाळण्यासाठी मुद्धाम शाहू राजांना सोडून दिलं कारण शाहू सुटले तर ताराराणी आणि शाहू यांच्यात सत्ता संघर्ष वाढेल.झालंही तसच.
शाहु राजांची आणि आणि ताराराणी यांच्यात पहिली लढाई 1707 मध्ये खेड कडूस येथे झाली.पण हे खेड कडूस नक्की कुठलं?
आजवर आम्हाला सगळे सांगत आले की शाहू आणि ताराराणी यांची पहिली लढाई पुण्याजवळ खेड कडूस ला झाली.पण हे खेड कडूस नक्की कुठलं असेल.
शाहू राजांची सुटका झाली,ते अहमदनगर ला आहे तिथं त्यांनी पारद गावचा पाटील यांच्यावर विजय मिळवला.आता इथून पुढं शाहू राजांना पन्हाळगड ला जायचं होतं.आपलं मत ताराराणींना सांगून राज्य ग्यायचं होत.पण ताराराणी यांनी शाहूंच्या विरोधात सैन्य पाठवलं आणि त्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे शाहूनी पन्हाळगड ला न जाता साताऱ्याला जायचं.
खेड कडूस ची लढाई ही अहमदनगर जिल्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या खेड कडूस इथं झाली.अहमदनगर-कर्जत-श्रीगोंदा-दौंड-सुपे-बारामती हा प्रदेश पूर्णपणे भोसले घराण्यांकडे होता.मालोजी राजांच्या भावाची मुलं म्हणजेच विठोजी यांच्या मुलांकडे हा प्रदेश होता.या प्रदेशातून सातारा जवळ करणं शाहूंना सोपं होतं आणि परसोजी भोसले शाहूंना मिळाल्यामुळे कोणी प्रतिकार करू शकत न्हवता.शाहू राजे या मार्गे मोरगाव-जेजुरी-शिरवळ वरून पुढं चंदन वंदन किल्ल्याच्या पायथ्याने साताऱ्याला गेले.
इतिहास कार हे इतिहास लिहीत असताना संदर्भ लक्षात घेतात.त्यानुसार आपलं मत मांडतात.त्यामुळे खेड हा पुणे जिल्यात प्रसिद्ध सुभा होता त्यामुळे खेड नावाच्या दोन गावांमुळे लिहिणार्यांनी खेड कडूस हे खेड तालुक्यातलं सांगितलं.
परंतु एक विचार आपण करू शकतो.अहमदनगर मार्गे शाहू राजे सातारा ला निघाले होते ते अहमदनगर वरून पारद-नंतर ते पुण्याकडे आंबेगाव तालुक्यातून खेड पर्यंत आले असतील अस भौगोलिक दृष्ट्या कसचं मान्य करू शकत नाही कारण हा मार्ग लांबच्या पट्याचा आहे.शिवाय खेड च्या शेजारी कडूस नाहीच कडूस हे खेडच्या अलीकडे चास गावाच्या शेजारी आहे.चास आणि कडूस च्या मध्ये भीमा नदी आहे पण चास आणि कडूस दोन्ही खेड पासून 20 km लांब आहेत.
त्यामुळे शाहू राजे आणि ताराराणी यांच्यातील पहिली लढाई ही खेड कडूस गावात झाली पण हे खेड कडूस भीमा नदीतीरावर कर्जत तालुक्यातील आहे आणि विशेष म्हणजे हा प्रदेश पूर्ण मैदानी आहे त्यामुळे लढाई होण्यासाठी जागा सुद्धा मोक्याची होती.याउलट खेड तालुक्यातील खेड कडूस गावात डोंगरी प्रदेश येतो आणि खेड ला नदी आहे पण कडूस हे छोटं गाव आहे नदीपासून लांब आहे .खेड पासून कडूस गाव हे 15-20 किलोमीटर च्या आसपास आहे परंतु कर्जत तालुक्यातील खेड कडूस हे एकच गाव आहे.शिवाय खेड तालुक्यातील कडूस गावी धायबर मोकाशी यांची गढी होती.संदर्भ साधनांमध्ये धायबर यांचा या लढाईशी संबंध येत नाही.
सर्व संदर्भ,साधने,भौगोलिक स्थिती आणि रस्त्याचा विचार करता शाहू राजे आणि ताराराणी यांच्यातील पहिली लढाई ही कर्जत तालुक्यातील खेड कडूस इथं झाली अस माझं व संपूर्ण खेड कडूस गावकरी व भागातील इतिहास अभ्यासक आणि भोसले घराण्याच्या वारसदारांचं वैयक्तिक मत आहे.यात जर कोणाला काही आक्षेप असेल किंवा तशे पुरावे असतील तर आवश्य सांगावे.

No comments:
Post a Comment