विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 April 2023

#शाहू_राजांचे_शेतकरीविषयी_धोरण #शेती_कर_वसुली_गैरवर्तन

 


#शाहू_राजांचे_शेतकरीविषयी_धोरण
छत्रपती थोरले शाहू महाराज शून्यातून आपलं अस्तित्व निर्माण करणारा महान राजा.42 वर्ष पूर्ण हिंदुस्थान चा गाडा सातारा या आपल्या राजधानीत बसुन हाकणारे प्रशासनातील चाणक्य.थोरले शाहू महाराज हे काळाच्या ओघात लोकांच्या आठवणीतून गेले किंवा त्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकावा अस कोणाला वाटलं नसाव.
17-18 वर्ष औरंगजेबाची कैद भोगून शंभुपुत्र शाहू यांची सुटका झाली.पुढं एका वर्षातच त्यांनी आपल्या गुण वैशिष्ट्येच्या आधारावर राज्य निर्माण केलं.सातारा ही राजधानी सजली.पुढं 42 वर्ष त्यांनी त्यांच्या सरंजामदार सरदारांच्या जोरावर आणि आपल्या विशेष प्रशासकीय कार्याने अखंड हिंदुस्थान भर मराठा राज्याचा विस्तार केला.स्वराज्य ते साम्राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वप्न त्यांच्या नातवानं पूर्ण केलं.शंभुपुत्र थोरले शाहू हे अखंड हिंदुस्थानचे राजे असल्याचे पोर्तुगीज व्हाइसरॉय त्याच्या पत्रात लिहितो.
छत्रपती थोरले शाहू यांना शिवरायांची सावली असे म्हणत कारण त्यांचं प्रशासन,शासन आणि रयते बद्धल च प्रेम.
'कुणब्याला त्रास दिला अगर त्याच्या शेताचा,भाताचा,लाकूडफाट्याचा नाश केला तर स्वामी मुलाहिजा ठेवणार नाही.' असा आदेश शाहू राजांनी दिला होता.(संदर्भ-थोरले शाहू महाराज चरित्र चिटणीसाची बखर)
शाहू राजांच्या दैनंदिन कामकाजात अनेक शेतकरी व इतर लोकांचे खटले यायचे त्यात शाहू राजे नेहमी कोणावर अन्याय होणार नाही असा न्याय द्यायचा प्रयत्न करायचे.शेतकरी व रयत या दोन गोष्टी शाहू राजांची चांगल्या प्रकारे जतन केल्या होत्या.
मौजे मापूर (आत्ताचे नाव माहीत नाही) इतला नागोजीराव नावाचा एक देशमुख रयतेला जमीन कसायला द्यायला.जमीन कसायला देताना तो वेगळी बोली लावायचा आणि पीक तयार होऊन घरी आल्यावर मात्र तो मनमानी करायचा याची तक्रार शाहू राजांकडे गेली.शाहू राजांनी त्याला चांगलंच बोल लावले त्याच पत्र इतिहास साधनात उपलब्द आहे.
रहिमतपूर गावाला काही सरकारी कामामुळे उपद्रव झाला.त्यामुळे गावाची नासधूस झाली तेव्हा शाहू राजांनी या गावाला कर वसुली चे अभय देऊन स्वारी पट्टी माफ केली होती.
शाहू राजांचा न्याय हा सर्वत्र प्रसिद्ध होता.अगदी निजामाने न्याय दिलेली एक महिला शाहू राजांकडे न्याय मागायला आली होती.किल्ले चंदन गडावर 28 ब्राह्मण होते ते इनाम खायचे पण चाकरी करत नसत तेव्हा शाहू राजांनी त्यांची इनामे बाद केली होती.
रामाजी रंगनाथ हा निरथडी चा देशमुख याने एका सुताराला कर्ज दिल आणि त्याच्यावर कर्जाचा अतिरिक्त बोजारा दाखवून त्याच्या घरावर जप्ती गेली तेव्हा शाहू राजांनी त्याला चांगली जरब बसवली होती.
शाहू राजांनी रयतेला लुटणाऱ्या त्यांच्या सेवकांना सुद्धा चांगलं खडे बोल सूनवल्याच दिसून येत.सदाशिव गडाचे हवालदार आणि कारकून जवळच्या एका गावात बाजार आणायला गेले.तिथं त्यांनी करोडी नावाच्या एका गावातील लोकांकडून 3 घोंगड्या हिसकावून घेतल्या आणि आपल्या पदाचा गैरवापर करत अर्धी किंमत दिली. हे शाहू राजांना समजल्यावर त्यांनी लगेच पत्र लिहून हवालदार आणि कारकून यांना हे प्रकरण मिटवून टाकायला सांगितलं.आणि परत कोणाकडून अशी खरेदी न करण्याची ताकीद दिली.
(संदर्भ-छञपती थोरले शाहू यांची रोजकिर्द)
अशे कितीतरी प्रसंग इतिहासात दिसून येतात.छत्रपती थोरले शाहू राजे हे उत्कृष्ट प्रशासक होते,न्यायमूर्ती होते,रयतेला जपणारे होते.शाहू राजांच्या संपूर्ण 42 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांच्या चरित्रावर सुद्धा कसलाच डाग सापडणार नाही.अतिशय शांत डोक्याने आपल्या पूर्ण साधनांचा व्यवस्थित वापर करून थोरले शाहू राजांनी विचारांच्या पलीकडचं राज्य निर्माण केलं होतं.कित्येक सरदारांना राज्यकर्ते बनण्याचं सामर्थ्य दिलं संधी सुद्धा दिली.त्याच सरदारांनी पुढं मराठा साम्राज्य रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढवलं. दिल्लीला संरक्षण देत असताना लाखो मावळे पानिपत च्या भूमीत धारातीर्थी पडले.त्या मावळ्यांच्या कर्तृत्वाच्या आणि नेतृत्वाच्या घोड्यांच्या टापा महाराष्ट्र ते दिल्ली पर्यंत पोहचल्या त्या फक्त थोरले शाहू राजांच्या राजकीय खेळी मुळे.पहिल्यांदा 1719 मध्ये आपल्या आईच्या सुटकेसाठी शाहू राजांनी दिल्ली झुकवली.
अशा महान प्रजादक्ष राजाला विनम्र अभिवादन.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...