विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 21 April 2023

#शाहूराजांचे_इमानी_सरदार #बाळाजी_महादेव_भानू_फडणीस

 


#शाहूराजांचे_इमानी_सरदार
1719 साली शाहू राजांनी दिल्ली मोहीम काढली.सय्यद बंधू हाताशी घेऊन शाहू राजांनी काहीही करून दिल्लीचा तख्त आपल्या माणसांच्या हातात ग्यायचा बेत केला.तयारी केली आणि महत्वाच्या महत्वकांक्षी लोकांच्या मदतीने मराठे दिल्लीत पोहचले.तिथं मुघलांच्या बादशहाच्या म्हणजे फारूकशियार याच्या डोळ्यात लोखंडी सळ्या घालून त्याला ठार केले.शाहूंच्या मर्जी प्रमाणे सगळं कार्य व्यवस्थित पार पडलं.शाहूंच्या आई येसूराणी आणि इतर कुटंब कबिला मुक्त झाला.मराठ्यांनी मुघली साम्राज्याचे चौथाई प्रदेश आपल्या ताब्यात घेतला.दिल्लीचा बादशहा शाहू राजांनी आपल्या मर्जीचा बसवला असला तरी इतर मुघल सरदार मात्र फारूकशियार चे होते.मराठ्यांना चार चौथाई प्रदेश दिल्याच त्यांना मान्य न्हवत.म्हणून काही मुघल सरदारांनी एक बेत आखला.जेव्हा मराठ्यांचे प्रधान बाळाजी विश्वनाथ कराराचे कागद घेऊन दिल्लीतून निघतील तेव्हा रस्त्यात अडवून त्यांच्याकडून कराराचे कागद हिसकावून ग्यायचं.
नेमकी ही गोष्ट फितुरी मुळे बाळाजी विश्वनाथ याला समजली.काहीही करून दिल्ली कराराची सनद शाहू राजांकडे पोहचवायची होती.बाळाजी चिंतेत होते यातून काय मार्ग काढायचा त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या बाळाजी महादेव भानू हे फडणीस यांनी शिवा काशीदांची आठवण कडून देत एक योजना आखली.योजना अशी होती बाळाजी विश्वनाथ आणि सरसेनापती दाभाडे यांनी शाहू राजांचा कुटुंब कबिला घेऊन मधल्या मार्गाने महाराष्ट्रात निघायचं.बाळाजी विश्वनाथ यांची पालखी मात्र मुख्य रस्त्याने दिल्लीबाहेर काढायची.त्या पालखीत बाळाजी महादेव भानू हे बसतील.बाळाजी विश्वनाथ ची पालखी असल्यासारखा तिचा रुबाब राहील.त्यामुळे सनदा सुरक्षित राहतील.
नेमकं त्या वेळी घडलं सुद्धा तसंच नेमकी पालखी घेऊन लोक दिल्ली सोडू लागले आणि अचानक एका ठिकाणी गर्दी वाढली आणि मुघलांनी पालखी ला वेढा दिला.एकच हल्लाबोल झाला.मोठी लढाई झाली.मुघलांनी बाळाजी विश्वनाथ समजून बाळाजी महादेव भानू याची हत्या केली.या लढाईत परसोजी भोसले याचा दाशीपुत्र संताजी भोसले यांनी खूप पराक्रम केला पण त्यात त्यांना वीरमरण आलं.मराठ्यांनी दिल्ली जिंकून आपल्या सनदा व्यवस्थित महाराष्ट्रात आणल्या,पण त्यासाठी सुद्धा खूप संघर्ष करावा लागला.
सातारा दरबारात घडलेला प्रसंग समजला.तेव्हा शाहू राजांनी त्या वीरांच्या पराक्रमाचा सन्मान करत बाळाजी महादेव भानू याच्या मुलाला जनार्धन भानू आणि भावाला रामाजी महादेव भानू यांना नाणेमावळ मधील बसलाई गाव इनाम दिला.हा बाळाजी भानू म्हणजेच नाना फडणीस याचा आजोबा.
शाहू राजांचा कुटुंब कबिला सुरक्षित आणला म्हणून बाळाजी विश्वनाथ यांना करडे-रांजणगाव इनाम दिला.संताजी भोसले यांच्या पराक्रमाबद्धल त्यांच्या मुलाला राणोजी भोसले यांनी सवाई संताजीराव किताब देऊन सन्मानित केले.
(संदर्भ-मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड 2)
उपाध्यक्ष पुणे जिल्हा मराठा महासंघ इतिहास परिषद

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...