औरंगजेब बादशहाने मिर्झा राजे जयशिंग याला शिवाजी राजांच्या बंदोबस्ताला पाठवलं तेव्हा त्याच्यासोबत लाखोंची सेना दिली.स्वराज्यावर आलेलं हे सर्वात मोठं संकट होते राजे काळजीत होते,राजांच्या मनाची घालमेल एका मावळ्याने ओळखली आणि मिर्झा राजाच्या तंबूत जाऊन त्याला मारायचा धाडसी डाव टाकला,पण त्यात त्यांना यश आलं नाही तो मावळा पकडला गेला त्याच नाव होतं #कुडतोजी_गुजर सातारा जवळच्या #भोसुरे गावचा हा धाडसी वीर योद्धा होता.मिर्झाराजे जयशिंग यांना शिवाजी राजांना गोड बोलून फसवून आग्र्याला न्यायचं होत त्यामुळे कुडतोजी ला जिवंत सोडून त्यांनी मराठ्यांशी वैर नसल्याचं दाखवुन दिलं. कुडतोजी यांच्या या धाडसाबद्धल राजांनी त्यांना #प्रतापराव हा किताब दिला होता.पुढं शिवाजी राजांनी त्यांना सरसेनापती पद दिल.नेसरीच्या खिंडीत झालेल्या युद्धात त्यांना वीरमरण आल्यावर शिवाजी राजांनी त्यांच्या जानकीबाई या मुलीच लग्न राजाराम राजे यांच्यासोबत लावून दिल.1689 ला ज्या वेळी रायगड पडला तेव्हा येसूराणी,शाहू राजे यांना कैद झाली सोबत काही दरबारी मंडळी होती.त्यात जानकीबाई सुद्धा होत्या आणि जानकीबाईंचे बंधू प्रतापराव गुजर यांचे पुत्र खंडोजी आणि जगजीवन हे सुद्धा कैदेत होते.
औरंगजेबाच्या छावणीत कैदेत असताना मराठा सरदार आणि शाहू राजे यांच्यातील संबंध अधिक जुळून आले होते.त्यातच राजाराम राजेंच्या मृत्यूनंतर ताराराणींनी मुघलांशी चांगली झुंज दिली. मराठ्यांना हरवण्यासाठी औरंगजेबाने खूप प्रयत्न केले पण यश न आल्याने शाहू राजांना बाटवण्याचा प्रयत्न त्याने चालू केला पण शाहू राजांनी धर्मांतर करायला विरोध केला.शाहू राजांना काहीही करून बाटवायच म्हणून औरंगजेब जबरदस्ती करू लागला तेव्हा येसूराणी यांनी पत्रव्यवहार करून शाहूंच धर्मांतर रद्द करण्यासाठी प्रयत्न चालू केले.शेवटी औरंगजेबाने एक अट घातली की शाहूंच्या राज परिवारातील नात्यातील कोणी धर्मांतर केलं तर शाहू राजांच धर्मांतर रद्द होईल.
सगळे मराठा सरदार चिंतेत पडले नक्की धर्मांतर कोणी करायच?,शाहू राजे सुद्धा काळजीत होते नक्की कोणाला तयार करायचा धर्मांतराला?
शाहूराजे धर्म संकटात सापडले असताना त्यांच्या साठी आपल्या धर्माच बलिदान देण्याचं धाडस #खंडोजी_गुजर आणि #जगजीवन_गुजर यांनी केलं.जानकीबाईंचं बंधू असल्याने खंडोजी आणि जगजीवन शाहू राजांचे मामा होते.इतिहासात दुसऱ्यांदा मामा भाच्याच्या मदतीला धावून आला होता.छत्रपती संभाजी राजांच्या पाठीमागे जसा हंबीरराव मामा खंबीर होता तसे शाहू राजांच्या सोबत रक्ताचे नसूनही गुजर मामा खंबीर पणे सोबत होते.औरंगजेबाने या दोघा बंधुचं धर्मांतर करून त्यांना अब्दुल रहीम आणि अब्दुल रहमान नाव दिलं.
शाहू राजांनी छत्रपती झाल्यावर खंडोजी आणि जगजीवन यांना परळी (सातारा जवळची परळी) ची जहागिरी देऊन त्यांचा योग्य तो सन्मान केला.त्यांना कधी अंतर दिलं नाही.स्वराज्य इतिहासात आपली ताकत आणि निष्ठा पणाला लावून गुजर मंडळींनी मराठा साम्राज्य घडवण्यात मोलाचा वाटा उचलला आणि प्रतापरावांच्या पराक्रमी, धाडसी रक्ताचा वारसा टिकवून ठेवला.अशा स्वराज्य वीरांना मानाचा मुजरा.
संदर्भ- छत्रपती थोरले शाहू राजे यांचे चरित्र,महाराणी ताराराणी,मराठ्यांच्या इतिहासाची साधने.

No comments:
Post a Comment