विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 April 2023

#हिंदनृपती_कथा_शंभूपुत्राची #थोरले_शाहू_महाराज

 


#हिंदनृपती_कथा_शंभूपुत्राची
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज म्हणजे भारत भूमीवर सर्वात जास्त काळ राज्य करणारा हिंदू राजा.42 वर्ष शाहू राजांनी हिंदुस्थानभर आपली सत्ता प्रस्थापित केली.अतिबुद्धीमान पंतप्रधान आणि पराक्रमी सरदार याच्या साहाय्याने दिल्लीवर भगवा फडकवला.दोन वेळा मुघलांचा पराभव करून मुघलांच्या साम्राज्यातील 75% प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतला.
हिंदवी स्वराज्याचा मराठा साम्राज्यात रूपांतर केलं.परदेशी प्रवासी मनूची म्हणतो की, 'मुघलांच्या कैदेतून सुटका झाली तेव्हा शाहू राजांकडे एक छोटासा जमिनीचा तुकडा होता,पण आता शाहू राजे हिंदुस्थान ताब्यात घेतला आहे.ते हिंदनृपती (हिंदुस्तान चा राजा) झालेत'.
लाखोचं सैन्य,हजारो सरदार,करोडो रुपयांची मालमत्ता असून सुद्धा शाहू महाराजांची राहणी साधी होती.लहानपणापासून त्यांची प्रकृती चांगली होती.पोशाख साधा असायचा.महत्वाच्या सणा वाराला सोडता इतर दिवशी साधा पांढरा चोळणा आणि सदरा हाच त्यांचा पोशाख असायचा.ऑगस्ट 1749 पासून शाहू महाराजांची प्रकृति अधिक बिघडली.तेव्हापासून ते 15 डिसेंबर पर्यंत अंथरुणाला खिळून होते.मधून मधून त्यांचा थोडा भ्रम होत असायचा.शाहू महाराजांनी धाकटी राणी सगुणाबाई त्यांची आवडती राणी होती.
सगुणाबाईंच्या निधनानंतर तर शाहू राजे जास्तच उदास होऊ लागले.शाहू राजे बालपण ते तरुणपण ह्या अवस्थेत कैदेत होते तेथे त्यांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या शिवाय औरंगजेबाच्या छावणीतील शेवटच्या दिवसात खूप दारिद्रय पाहिल्याने राज्य,सत्ता याचा मोह त्यांना न्हवता परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे संकल्पित साम्राज्य त्यांनी निर्माण करण्यासाठी आपले हजारो सरदार कामी लावले आणि त्यांच्या मार्फत अखंड हिंदुस्थान ची सत्ता ते चालवू लागले.
शाहू राजे मनाचे साधे होते पण माणसांची पारख करण्यात ते कधीच चुकले नाहीत.अपवाद एकच बुद्धिमान आणि पराक्रमी आहेत म्हणून त्यांनी बाळाजी भट यांना वंशपरंपणे प्रधानकी दिली ही एक गोष्ट त्याच्या पश्चात मराठा साम्राज्यास हानी पोहचवणारी ठरली.
आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी साधु वृत्तीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला.दान आणि धर्माच्या बाबतीत त्यांनी कायम सकारात्मक भूमिका घेऊन पाहिजे त्याहुम अधिक धन दान केलं.
शाहू राजांच्या मृत्यू पूर्वी त्यांनी आपल्या प्रधानांना काही आज्ञा केल्या त्यात
'आम्ही विविध जाती च्या लोकांना चाकरी आणि पराक्रमाचा बदल्यात सरंजाम,जहागिरी,गावं, जमिनी,वैग्रेर इनाम दिले आहेत.ते आमच्या पाश्चात जसेच्या तशे चालवावे.कोणालाही अटकाव करायचा नाही.'ही खूप महत्त्वाची आज्ञा होती.
असा महान अजानबाहू,अजातशत्रू राजाने मार्गशीर्षवद्य तृतीया गुरुवार शके 1671 तथा दिनांक 15 डिसेंबर 1749 रोजी सकाळी चार घटकांनंतर सर्वांचा कायमचा निरोप घेतला.
शाहू राजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांनी आपले सर्व सरदार,मंत्री यांना एक उपदेश केला होता तो आजही सर्वांनी ध्यानात घेतला,विचारात घेतला आणि अवलंब केला तर आजची पिढी आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या नक्कीच प्रगती करेल यात शंका नाही.
"तुमच्या हातात पैसा नाहीआमच्याही नाही.मुलुख सगळा तुमचा आहे,फौज जमवा,सोईस येईल तिकडे संचार करा,ठाणी बसवा,वाडे बांधा, वसाहती करा,उद्योग व्यापार आणि सावकारी चालू करा.मंदिरे बांधा, अत्याचार करू नका,द्वेष करू नका म्हणजे देव तुम्हास पावेल.राज्याचे भाग्य उजळेल,पैसा नसेल तर कर्ज काढा आणि उद्योग वाढवून ते फेडा"
सर्वच मराठी बांधवांनी हा संदेश आजही आचरणात आणला तरी स्वतःच साम्राज्य उभं राहिल्या शिवाय राहणार नाही.
संदर्भ- पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज चरित्र.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...