#लोणंद हे पुणे पंढरपूर रस्त्यावरील बाजारपेठेचे गाव.या गावाशेजारी #निंबोडी नावाच एक छोटंसं गाव आहे.या दोन्ही गावचे वतनदार असलेल्या #शेळके घराण्यातील पराक्रमी पुरुषांनी पराक्रमाची शर्थ करत आपल्या गावाचा डंका शिवस्वराज्यात चांगलाच गाजवला होता.लोणंदकर शेळक्यांना #झुंझारराव_शेळके तर निंबोडी च्या शेळक्यांना #राउतराव_शेळके 'किताब होता.#हिरोजी_शेळके नावाचा एक सरदार शिवकाळात मोठा पराक्रम गाजवत होता.कृष्णाजी अनंत सभासद यांनी दिलेल्या शिवकाळातील मुख्य शिलेदार आणि मूलखी वतनदार यात हिरोजी चा नामउल्लेख आढळतो.
#पदाजी_झुंझारराव_शेळके याच्या पराक्रमाचा गौरव करत त्यांना 1703 मध्ये कृष्णाजी मल्हारराव यांच्या हस्ते 10 बिघे जमीन मौजे खारसी, कुडाळ परगणे येथे इनाम दिली होती.
सण 1720 च्या अखेरीला बाजीरावाने मुघलांवर आक्रमण केल होत.बारामती च्या परिसरात या वेळी मोठी लढाई झाली होती.या लढाईत बाजीराव च्या बरोबर लोणंदकर शेळके घराण्यातील पराक्रमी माणसांनी पराक्रम गाजवला होता शेळक्यांच्या पथकातील जावजी,खनडोजी,गोरखोजी या शेळक्यांची घोडी या युद्धात कामी आली होती.या लढाईनंतर बरीच धामधूम माग लागल्याने सरकारी दरबारातून शेळक्यांना घोडी द्यायची राहिली होती.ती 1729 मध्ये बाजीरावाने त्याच्या भावाला चिमाजी ला आज्ञा देऊन द्यायला लावल्याचे नोंद आढळते.
(संदर्भ- मराठी रियासत,पेशवे दप्तर खंड स्रोत-सरंजामी मरहट्टे)
1722 साली कुलाबा किल्ल्यावर इंग्रजांसोबत सरखेल कान्होजी आंग्रे यांचं तुफान युद्ध झालं होतं.या लढाईत कान्होजींच्या हाताखाली असलेल्या निंबोडिकर शेळक्यांच्या घरातील #खंडोजी_शेळके_राऊतराव हा धारातीर्थी पडला.त्याच्या ह्या पराक्रमामुळे थोरल्या शाहू राजांनी त्याच्या मुलाला म्हणजे सुल्तानजी शेळके राऊतराव याला 17 एप्रिल 1722 ला निंबोडी गावात एक चाहुर जमीन वंशपरंपरागत इनाम करून दिली.शिवाय निरनिराळ्या लढायांमध्ये आपल्या मनगटाच्या जोरावर पराक्रम गाजवणाऱ्या शेळकेंच्या घराण्यातील काही पराक्रमी वीरांना वेगवेगळ्या गावात जमिनी इनाम देण्यात आल्या होत्या.#भानजी_शेळके याला पिंपरे गावात,#धुळोजी_शेळके ला निंब गावात तर #फिरंगोजी_शेळके याला निंबोडी गावातच सरकारातून शेत जमिनी इनाम दिल्या होत्या.(संदर्भ-शाहू दप्तर, स्रोत-सरंजामी मरहट्टे)
1727-28 च्या माळव्याच्या स्वारीत सरदार #फिरंगोजी_शेळके बाजीराव सोबत होता.मोहिमेवरून परत आल्यावर त्याला त्याच्या इनामाचा हिस्सा दिला होता.
बालाजी विश्वनाथ आणि खंडोजी दाभाडे यांच्या सोबत दिल्लीला जाऊन येसूराणी ना सोडवण्यासाठी फिरंगोजी शेळके सुद्धा गेले होते.त्यावेळी त्यांना प्रत्येक दिवसाला चाळीस रुपये रोजचा पगार व फिरंगोजी शेळक्यांच्या सैन्याला प्रत्येक दिवसाला आठ रुपये रोजचा पगार देण्यात यायचा.दिल्लीत झालेल्या संघर्षात शेळके घराण्यातील 15 वीर जखमी झाले होते तर 4 जण ठार झाले होते.
नाईकजी, निंबाजी आणि सुल्तानजी शेळके हे देवजी शेळक्यांचे पुत्र एका युद्धात गोळ्या लागून ठार झाले त्या बदल्यात त्यांच्या आईला संताई हिला 20 बिघे (1बिघा -2एकर) जमीन शाहू राजांनी पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने इनाम दिल्याचे पत्र शाहू दप्तर मध्ये उपलब्द आहे.
.(संदर्भ-पेशवे दप्तर खंड 30,स्रोत-सरंजामी मरहट्टे)

No comments:
Post a Comment