विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 21 April 2023

बाजीराव पेशवा यांची स्वामीनिष्ठा -

 



बाजीराव पेशवा यांची स्वामीनिष्ठा -
एखाद्या व्यक्तीला सामर्थ्य प्राप्त होते ते त्याचे चारित्र्य , त्याग आणि आपल्यातील प्रखर आत्मविश्वासाने.
बाजीराव पेशव्यांची शाहू महाराजांच्या बद्दलची निष्ठा अशीच होती.
जगेन तर महाराजांच्या साठी मरेन तर महाराजांच्या साठी अशा भावनेतुन बाजीरावांनी शाहू महाराजांच्या वर प्रेम केले.
शुद्ध प्रेमात भावना असते ती निरपेक्ष व उदात्त आत्मसमर्पणाची.
ही निष्ठा त्यांच्या असंख्य पत्रात दिसते . पत्रांच्या शेवटी बाजीरावांनी शाहू महाराजांच्या विषयी दाखवलेला आदर अनेक भावनिक शब्द प्रयोगातुन दिसुन येतो .
- 1) सेवकाचे साह्य करावे.
सेवकावर कायम कृपादृष्टी ठेवावी .
2) सदैव आशिर्वादपत्र पाठवावयाविशी आद्न्यापिले पाहिजे .
3) जालें वर्तमान सेवेसी निवेदिले आहे.
निवारण करणार स्वामी धणी समर्थ आहेत .
4) स्वामींच्या पायाखेरीज दुसरा अवलंब सेवक जाणत नाही. कूर्मदृष्टी करून सेवकाचा सांभाळ करीत असले पाहिजे .
5) आता पदरी पडलो.धनी स्वामी आहेत.
मी सेवक जास्त काय विनवू ! आमचे सर्व संकट स्वामीसच आहेत.
जैसे स्वामी आद्न्या करतील तैसे सेवक वर्तणूक करील . येविसी विस्तारे काय लिहिणे .
6) कृपा वर्धमान केली पाहिजे.उत्तर पाठवावयाविशी आद्न्या करणार स्वामी समर्थ आहेत.
7) साहेबांचा अन्नाचा प्रताप आहे तेथे चिता नलगे.
😎 कळेल त्या रितीने सांभाळ करुन इजतीस चढविणार स्वामी समर्थ आहेत .
9) वडील मायबाप सर्व स्वामी.आमची शरम , लज्जा साहेबास आहे. विशेष लिहावे तरी सुद्न्य असा .
10) आपण पदरीचे ठेवणाईत पूर्वी पासून आहो.उर्जित करणार स्वामी समर्थ आहेत .
11) आपणास स्वामीवाचून कोणाचा आसरा नाही . एकनिष्ठपणे चाकरी करतो.
स्वामी सर्वजाण आहेत .
12) स्वामी सर्वद्न्य आहेत .
आपण सेवक आद्न्या धारक आहो .
कृपेस अंतर केले न पाहिजे .
13) आपले समाधानपुर्वक आशिर्वादपत्र आले .
म्हणजे चित्तातील हळहळ दूर होईल .
14) स्वामींनी बरा विचार चित्तात आणून आद्न्या करणे ते करविली पाहिजे .
15) सदैव पत्रार्थी स्नेहभिवृद्धि केली पाहिजे .
16) आमचे लाड आणि लिहिणे चालविता म्हणोन इतके लिहिणे.
वरकड वर्तमान स्वामींच्या कृपेने यथास्थित आहे .
17) पायाशी चाकरी करुन आल्यावर सेवकास सर्फराज करणार स्वामी समर्थ आहे .
18) निरंतर याच अन्वये वडीलपणे परमार्श करावा .
19) सदैव पत्री साकल्यार्थ लेखन करुन परामर्श घ्यावया अंतर न किजे .
20) हरघडी स्वकीय कुशलार्थ लेखन करुन संतोषवीत असावे .
21) जिवंत आहों तो यत्नास चुकत नाही.
पोटास देणार स्वामी समर्थ आहेत.
यश स्वामींचे आहे .
22) आपणाखेरीज दुसरे आम्हास कोण आहे ? वडीलपणे जे आमचे बरे ते करावे .
23) चरणरजाची विनवावया प्रार्थना की आम्ही स्वामींचे पदरचे स्थापित आहोत .
24) सेवक पुरातन पदरीचे आहो.
आमचे हाते सेवा घेऊन उर्जित करणार स्वामी वाचून दुसरा कोण आहे ? सुटले केश पाठीस शरण.
25) सेवकाची विनंती उदास न करावी.
साहेबांचे आद्न्ये पेक्षा येथील कार्य विशेष नाही .
संदर्भ - छत्रपती थोरले शाहू महाराज - आसाराम सैंदणे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...