जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या विचाराने अन पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र, आई जिजाउंनी वसवलेल्या पुण्यात अन पुण्याच्या आसपासच्या प्रदेशात इतिहासाच्या पाउलखुणा लपल्यात ज्या आजही दुर्लक्षित आणि जीर्ण होउन नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.आज आपण अशाच एका नामशेष होण्याच्या मार्गावर असणा-या ऐतिहासिक वास्तुविषयी माहिती घेऊ.
छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताच्या अभिषेकाने पावन झालेल्या भिमा इंद्रायणीच्या काठावर वसलेल्या प्रसिध्द गावांचा इतिहास जगासमोर यावा यासाठीचा एक प्रयत्न,छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळापासुन (तुळापुर) हाकेच्या अंतरावर भिमानदिच्या कडेला वसलेल छोटस गाव’फुलगाव’. या छोट्याशा गावात ऐतिहासिक वास्तुंचा खजिना लपलाय ,तो शोधण्याचा प्रयत्न करत असताना माझ्या ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत भर पडलेली एक वास्तु म्हणजे ‘#फुलगाव येथिल भिमा नदिवरील #ऐतिहासिक_कमानी_घाट’.
पुणे नगर रोड च्या कडेला लोणिकंद आणि कोरेगाव भिमा गावाच्या मधे आळंदिफाटा लागतो,या फाट्यातुन आत गेल कि ४-५किलोमीटर लांब #फुलगाव नावाच गाव लागत,याच गावाच्या १-२किलोमीटर पुढ छत्रपती संभाजी महाराजांची समाधी व सोळाव्या शतकात बांधलेल इतिहास प्रसिध्द संगमेश्वर मंदिर असलेल तुळापुर गाव आहे.फुलगाव भिमा-इंद्रायणीच्या संगमापासुन अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल छोटस गाव, या गावात फिरायला गेलो असता नदिच्या काठावर एक वास्तु दिसली लांबुन एखाद्या वाड्यासारखी दिसणारी वास्त पण ,तिथ गेल्यावर समजल हा घाट आहे.पुर्वी नदिच्या काठावर गावातील लोक घाट बांधत,ज्यामुळे नदिवर पाणी भरायला किंवा आंघोळीला गेलेल्या लोकांची गैरसोय होउ नये, पाळीव प्राणी बैल,घोड़ा,यांना नदिवर सहज पाणी पिता याव,धुता याव ,प्राण्यांचा पाय नदिच्या चिखलात रुतु नये म्हणुन नदिच्या पात्रात जवळजवळ अर्ध्या अंतरापर्यत दगडानी घाट बांधला जायचा.असाच घाट या फुलगावामधे आहे पण तो फक्त फुलगाव ग्रामस्त सोडता सहसा कोणालाच माहित नाही,काहि लोक त्याला कमानी घाट अस म्हणतात तर काहिंच्या मते तो हत्ती घाट असावा पण त्या संबधी पुरावा किंवा नोंद अजुन उघडकिस आली नसल्याने व असाच एक घाट आम्ही सातारा शहराजवळ लिंब गावात पाहिला ज्याला हत्ती घाट अस म्हणतात.
फुलगावातुन नदिकडे जाताना नदिच्या कडेला श्री शनेश्वर मंदिर आहे याच मंदिराच्या मागे दगडी भिंतीने जोडलेली कमान दिसते तिच कमान घाटाचे प्रवेशद्वार ,कमानीतुन आतप्रवेश केल्यावर समोर भिमा नदिच विशाल पात्र व कमानीच्या तिन्हि बाजुंनी दगडांच्या विशाल भिंती,भिंतीच्या टोकावर अभेद्य बुरुंज,बुरुंजावर चढण्यासाठी दगडी जिना एखाद्या किल्ल्यावर गेल्यासारख वाटत.कमानीच्या प्रवेशदाराच्या भिंतींवर चढण्यासाठी पण दगडाचा जिना आहे,आतमधे ज्या भिंती आहेत त्यांच्यामधे देवड्या आहे, भिंतीच्या टोकावर सुंदर बुरुंज असल्याने घाटाच सौदर्य पहाण्यासारख आहे,
नदिच्या पात्रात लांबवर दगडाने बांघकाम करुन चिखलमुक्त करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय,नदिपात्रात एक गोलाकार अस वर्तुळ बनवलेल आहे,घाटाच्या भिंतींवर जे दगडि काम केलय ते पहात असताना त्या वेळच्या बांधकाम बध्दल एक गोष्ट उघडकिस आली ती म्हणजे दोन दगड एक मेकांना जोडण्यासाठी लोखंडाचा वापर त्या काळात केला जायचा,दोन दगडांना बिळ पाडुन त्याला लोखड़ीपट्टीने एकत्र जोड जायच.त्या पट्ट्यांना कळसूत्री पद्धत अस म्हणतात.शिवाय घाटाच्या शेजारी एका शेताच्या बांधाला वाड्याच्या संरक्षण भिंतीचे अवशेष पहायला मिळाले या घाटाचा इतिहास जेव्हा तेथिल राहिवाशांना विचारला तेव्हा समजल कि सदर वास्तु हि पेशव्यांनी बांधली आहे.
दुसरे बाजीराव पेशवे यांनी सुमारे १८०० व्या शतकात या गावचा पुणे शहराजवळ एक विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून विकास केला. भीमा नदीचा मोठा पाण्याचा डोह, तर दुसºया बाजूला डोंगर असल्याने मध्य नैसर्गिक सुंदर वनश्री होती. पूर्व-पश्चिम बाजारपेठ वसवली. फुलशहर असे नाव दिले. सुमारे १०० सरदारांना वाडे बांधून दिले. त्यांच्या सोईसाठी बारा बलुतेदारांना गावात आश्रय दिला. येथील बाजारपेठ प्रसिद्ध होती. बाजीराव पेशवे यांनी मुख्य सरदार त्रिंबक डेंगळे पाटील यांची येथे नेमणूक केली होती. त्यांना ब्रिटिशांनी पकडले. ठाणे तुरुंगात ठेवले, नंतर बापू गोखले यांनी जबाबदारी स्वीकारली. येथील जमिनीचे हत्तीखाना, बाग, पागा अशी नावे इतिहासाची जाणीव करून देताना, श्री छत्रपती संभाजीमहाराजांच्या अंत्यविधीस फुले उधळली म्हणून फुलगाव असेही काही लोक सांगतात.
शिवाय सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा निजामाचा वजीर मलिक अंबर या भागात आला तेव्हा त्याला आपल्या आवडत्या हत्तीच्या वजनाएवढ सोन लोकांना दान करायच होत,पण हत्तीची तुळा कशी करायची हा प्रश्न त्यााच्या समोर उभा राहिला तेव्हा शहाजी राजे भोसले यांनी हत्तीच्या तुळेवर मार्ग काढला व तुळा झाली म्हणुन त्या गावाला नांगरगाव नाव बदलुन तुळापुर म्हणु लागले,वरील प्रसंगावरुन या भागात हत्ती होते तर मग हा घाट नक्किच हत्ती धुण्यासाठी बांधला असावा असा तर्क लावु शकतो,शिवाय संभाजी महाराज यांना तुळापुर येथे डांबले असता औंरगजेब तिथ तळ ठोकुन होता त्याच्या कडेपण
हत्ती होते.आपल्या आसपासच्या गावात अशा भरपुर दुर्लक्षित वास्तु आहेत ज्या ऐतिहासिक आहेत त्यांच्या नोंदि पुरातत्व खात्याला नाहियेत अशा वास्तुंच्या संवर्धन करण हि आपली जबाबदारी आहे व त्या वास्तु प्रकाशात आणणं हे हे तितकच महत्वाचं।।






No comments:
Post a Comment