विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 2 August 2023

#गोमाजी नाईक आणि बंकी गोमाजी नाईक पानसंबळ जामदार

 



#गोमाजी
नाईक आणि
बंकी गोमाजी नाईक पानसंबळ जामदार
बंकी = द्वारपाल
जामदार= कपडे, दागिने सांभाळणारा (राजा शिवछत्रपती भाग १- ग.भा.मेहंदळे पृष्ठ क्र.६०१,६०२ तळटीप३४.
१)गोमाजी नाईक :- स्वराज्य स्थापनेचे शाहजी महाराज आणि जिजाऊ यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा श्रीगणेशा राजकारण आणि समाजकारणातील मुरब्बी शाहजी महाराजांनी खेडे बारे मावळ मधील कोंडे देशमुखांचे मुख्य कचेरीचे गाव कसबा खेड येथे जिजाऊ आणि बाळ शिवबा यांना पाठवून केला.
त्या वेळचे कसबा खेड आणि कोंडाणा हे आदिलशाही राजव्यवस्थेचा महसूल गोळा करण्याचे मुख्य केंद्र होते आणि आदिलशाही च्या वतीने खुद्द शाहजी महाराज, रनदुल्ला खान,कान्होजी जेधे बेंगळूर प्रांतामधे कारभार पहात होते अगदी तसेच १२मावळचा सगळा प्रांत आदिलशाही मधे समाविष्ट होता.खेडे बारे मावळचे नाईक कोंडे देशमुख आदिलशाहीच्या वतीने १२ मावळ आणि ५ परगण्याच्या महजरांना शिक्याचे अधिकारी(कलेक्टर),आणि गोत(न्यायाधीश) म्हणून हजर राहिल्याचे मुळ अस्सल ऐतिहासिक कागदपत्र तपासताना आढळते. ई.स.१६३६ मधील माहुली तहामध्ये शाहजी महाराजांनी अहमद नगरच्या निजामशाही मधुन जुन्नरचा शिवनेरी किल्ला(जिथे शिवरायांचा जिजाऊ पोटी जन्म झाला होता.) मोगलांच्या ताब्यात देऊन आदिलशाहीत नोकरी पत्करली त्यामुळे जिजाऊ आणि शिवबा यांना आपल्या इतबारी,विश्वासु जीवाला जीव देणाऱ्या खेडेबारे मावळातील कसबा खेड येथील मातब्बर घराण्यातील नाईक कोंडे देशमुखांकडे जिजाऊ आणि शिवरायांना सुपूर्द केले आणि स्वतः बेगळुर प्रांती आपला उरलेला कुटुंब कबिला घेऊन रवाना झाले.बाळ शिवाजी राजांना इथल्याच मावळी मातीमधून, कसबा खेड येथुन कोंडे देशमुखांच्या कचेरीतून चालणारे न्यायदान, राजकारण, समाजकारण,शेती व्यवस्थापन ई.चे बाळकडू मिळायला सुरुवात झाली.
त्या नाईक कोंडे देशमुख यांच्या वंशावळी (जरुरी पुरत्या) मधे शिवकाळा मधे गोमाजी नाईक यांचे नाव येते.
कानजी
१)बापूजी+सामावा (शिळीमकर ,शिंदे) २)जाखोजीं बापूजी आणि सामावां यांना १)हरजी२)तुळाजी(ई.स.१६००)
या हरजी ला ५ मुले झाली त्यातील चौथा मुलगा ""गोमाजी नाईक "" हा शिवकाळात जाणत्या वयाचा दिसतो.
संदर्भ - शिळीमकर वाटनीचा महजर(म. ई.सा. खंड १७)
""शिळीमकर (शिंदे) कोंडे पारंपारिक सोयरे""
१)गुंजन मावळ तरफेचा देशमुख विठोजी शिळीमकर(शिंदे) याला १५मार्च १६६९ रोजी जिजाबाईंनी पाठवलेल्या पत्रात "गोमाजी नाईकाचा" उल्लेख आहे...." तुम्ही(विठोजी शिळीमकर) व राजश्री गोमाजी नाईक (इथे कुठेही बंकी,जामदार उल्लेख नाही)सोयरे झालात.तुमची कन्या(शिळीमकरांची) उपर्यूक्ताच्या (गोमाजी नायकाच्या) लेकास दिली.म्हणून लग्न सिद्धी करण्याकरिता तुम्हाला व तुमच्या आईला आमच्याकडे बोलविले.(वरील पत्रातील जरुरी पुरता आशय दिला आहे) राजा शिवछत्रपती भाग १ पान. नं.६०१ तळटीप ३४. कोंडे आणि शिळीमकर पारंपरिक सोयरे आहेत, त्या प्रमाणे शिळीमकर पानसंबळ सोयरिक झाल्याचे माझ्या पाहण्यात नाही .
याच तळटिपेमधे खेडेबारेचे देशकुळकर्ण आणि कसबा खेडचे व पेठ शिवापुरचे कुलकर्ण ही वतणे एकाच घराण्याकडे होती, सखो भिकाजी याच्या ' खेडे बाऱ्याच्या देशपांड्यांचा करीना '
वरील पत्रातील राजश्री गोमाजी नाईक आणि बंकी गोमाजी नाईक जामदार वेगवेगळे असावेत हे सिद्ध होते,कारण आदरणीय मेहंदळे सर सुद्धा त्या तळटीपे मधे ""पत्रात आडनाव दिलेले नाही.पण तो गोमाजी नाईक पानसंबळ असला पाहिजे"" असे म्हणतात म्हणजे मेहंदळे सर ठाम पणे तो कोण होता हे सांगू शकत नाहीत.कारण मेहंदळे सरांनी कोंडे देशमुखांची वंशावळ पहिली नाही असे ते 'राजा शिवछत्रपती भाग २ पान नं१२४५ तळटिप क्र १४ मधे म्हणतात.त्यासाठीच मी वरील खेडे बारे येथील कोंडे देशमुखांची जरुरीपुरती वंशावळ वर दिली आहे.
कर्यात मावळ येथील घेरा कोंडाणा मधील मौजे पासिने (आताचे पाषाण) जिजापुर पेठ येथील राजेश्री जिजाबाई यांच्या अजरख्तखान्या(कचेरी) मधून २जाने.१६५७ मिरासपणा विषयी देशमुख देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रात त्या "" सुभानजी नाईक तालिक असा उल्लेख करतात ,दुसरी परवानगी गोमाजी नाईक तुम्ही वसाहतीच्या कामास ज्यास जे मामुल द्याल तेनेप्रमाने साहेब चालवतील "" असे लिहितात त्यामध्ये गोमाजी नाईक यांच्या नावासमोर कुठेही पानसंबळ बंकी,जामदार उल्लेख करत नाहीत.
म ई सा खंड १७ ले १४ मधे शिवरायांच्या कौलनाम्या मधे शिवराय विठोजी शिळीमकर देशमुख यास म्हणतात" गोमाजी नायक येही मालुम केले जे विठोजी शिलंबकर साहेबांचे कौलाचे उमेदवार आहेती; साहेबी कौल मरहमत केलीया गावावरी येऊन असतील म्हणून मालुम केले तरी बिना बरा मालुमात मनात आनुन तुम्हास कौल मरहमत केला आहे, व तुमचेविसी गोमाजी नाईकाचे डोईवरी हात ठेवीला इ.
यातही गोमाजी नायक/नाईक म्हणले आहे...पानसंबळ, बंकि,जामदार नाही.
ग्रंथमाला महाराष्ट्राचा इतिहास :- लेखक - लक्ष्मणकृष्ण चिपळूणकर =""राज्यातील सर्व न्याय मनसुबे करण्याचे काम निराजी रावजी व गोमाजी नाईक यांच्याकडे असे.
२) बंकी गोमाजी नाईक पानसंबळ जामदार :-
प्रकरण - शिवराज्य व शिवकाळ (शिवकालीन महाराष्ट्र या पुस्तकात) लेखक - वासुदेव कृष्ण भावे शिवाजीचे प्रधान मंडळ - पान नं १५६ वर लिहितात - गोमाजी नाईक पानसंबळ यास कापडाचे जामदारखाण्याचा हवाला दिला.
म्हणजेच न्याय मनसुबे करणारा गोमाजी नाईक आणि कापडाच्या जामदारखाण्याचा हवाला ज्याला दिला तो गोमाजी नाईक पानसंबळ वेगळा.
पेशवे दफ्तरातील निवडलेले कागद खंड३१- जमाव विभागातील कागद - संपादक - गो स सरदेसाई पान नं३७ पत्र क्र४१ दि.५/७/१६७९ कर्यात मावळ (किल्ले कोंडाणा घेऱ्यातील) मौजे पासीने/पाषाण/पेठ जिजापुर येथील पाटीलकी वरून शितोळे देशमुख यांच्याशी कथला निर्माण करणारा कुणबी रणपिसे आणि त्याची बाजु घेणारा मावळचा देशाधिकरी कोन्हेर रूद्र यास खुद्द शिवाजी महाराजांचे ताकिदपत्रात शिवराय "पूर्वी मातुश्री आऊसाहेबांनी मजरा करण्याविषयी सांगितले होते.त्यावेलीआम्ही ते मान्य केले नाही.त्या नंतर गोमाजी नाईक पानसंबळ यांनी त्यांच्याशी तंटा केला.ते वर्तमान आम्हाला समजल्यावर त्यांस (पानसंबळ यास) ताकीद केली." इथे खुद्द शिवराय जिजाऊंचा खाजगी बंकी द्वारपाल,जामदार म्हणजे कपडे सांभाळणारा या व्यक्तीला ताकीद देतात,ती जिजाऊंच्या माहेरहून आलेल्या माणसाची किंमत ठेवत नाहीत.आणि त्याचा उल्लेख पानसंबळ करतात,फक्त "गोमाजी नाईक" म्हणत नाहीत.
स्वराज्याचा कारभार आणि सुरुवात खेडेबारे मधेच झालेली असताना ,जिजाबाई यांची शेरी = खेडेबारे तरफेतील (कोंडे यांच्या देशमुखी मधील ४२गावांपैकी) कामथडी,नसरापूर/नरसापुर,आणि केळावडे या गावांमधून मिळणारे करांचे उत्पन्न जिजाबाईच्या खाजगी खर्चा करिता लावून दिलेले होते(राजा शिवछत्रपतीं खंड१ पान नं६०२ ),
""कोंडे देशमुखांच्या देशमुखी मधील महसुली कामकाजाचे केंद्र कसबा खेड """ शेजारी शहाबाग ही आंब्याची बाग शाहजी राजे यांच्या नावाने लावली असताना,शिवापूर हे शिवाजी राजांच्या नावाने वसवले असताना ,संभापुर हे थोरले संभाजी यांच्या नावाने नवीन गावे वसवली जातात आणि कर्यात मावळ येथील घेरा कोंडाणा मधील मौजे पासिने (आताचे पाषाण) पेठ जिजापुर येथील राजेश्री जिजाबाई यांच्या नावाने वसवली असताना नाईक कोंडे देशमुख इतिहासामधुन उपेक्षित कसे ठेवले जातात हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

1 comment:

  1. सदर पोस्ट माझ्या फेस बुक वॉल वरून कॉपी पेस्ट केलेली आहे.

    ReplyDelete

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...