विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 2 August 2023

!!! घनसावंगी येथील जाधवराव घराण्याचा नवीन शिलालेख !!!

 

!!! घनसावंगी येथील जाधवराव घराण्याचा नवीन शिलालेख !!!
लेखन अनिल दुधाने





घनसावंगी जि जालना येथे तुकाई देवी मंदिराच्या आवारात अशुद्ध बाळबोध देवनागरी लिपीतील तुळई रुपात राजे जाधवराव घराण्याचा नवीन शिलालेख प्राप्त झाला असून तो अर्धवट आहे. परंतु त्यातील तीन ओळीचे वाचन इतिहास तज्ञ श्री अनिल दुधाने सर व विक्रांत मंडपे यांनी केलेले आहे, ते पुढीलप्रमाणे:-
१. नीळ } कंठ राजे जाधवराव
२. रतळ नाम तुकाई वतन जागीर पुडरे x
३. जपदान वाक न न क जान
सदरील शिलालेखात निळकंठराव राजे जाधवराव यानी तुकाई देवीस वतनी जमीन दिल्याची नोंद मिळते. यातील निळकंठराव राजे जाधवराव हे छत्रपती थोरले शाहु महाराजांचे निकटवर्ती सरदार असल्याची नोंद शाहु व पेशवे दप्तरातील सहा पत्रामधून मिळते. यात इ सन १७२५ मधील पत्रात निळकंठराव जाधवराव याना निजामाने कैद केल्यानंतर त्यांची सुटका करण्यासाठी खुद्द छत्रपती थोरले शाहू महाराजांनी सुभेदार पिलाजीराव जाधवराव व थोरले बाजीराव प्रधान याना आदेश दिलेले आहेत. इ सन १७३३ च्या पत्रात निळकंठराव व त्यांचे पाठभाऊ यांच्यात कलह माजवु नये यासंबंधीचे पत्र असुन त्यानंतरचे निळकंठराव व त्यांचे बंधु यांच्यातील वादाचे पत्र मिळालेले आहे, तसेच अंबडची पाटीलकी असलेले सुलतानजी निंबाळकर याना निळकंठराव यांच्या घनसावंगी येथील देशमुखी वतनास हानी पोहचवु नये यासंदर्भातील आहे.
निष्कर्ष :- सदरील निळकंठराव जाधवराव हे राजे जाधवराव घराण्यांपैकी एक असुन त्यांची घनसावंगी सह सात गावात त्यांचे वंशज राजेकवराजी जाधवराव यांच्याकडे स्वतंत्रकाळापर्यंत वतन होते तसेच महसुली नोंदी आढळतात व त्यांनी तुकाई देवीस व कुलदेवी रेणुका देवीस वतनी जमीन दिली. या नवीन वंशज शाखेचा शोध यातुन पुढे आला आहे.
घनसावंगी ही राजे जाधवराव घराण्यातील नेमकी कोणत्या वंशजशाखेतून आहे याचे पुढील संशोधन चालू आहे. या कार्यात डॉ नरेशराजे जाधवराव (उमरद), राज जाधवराव देशमुख (घनसावंगी) व रामभाऊ लांडे धीरजसिंह हंबीरराव मोहिते यांची मदत झाली. सदरील शिलालेखाचे वाचन राजे लखुजीराव जाधवराव यांच्या ३९४ व्या स्मृतिदिनी डॉ नरेशराजे जाधवराव यानी केले. यावेळी सर्व वंश शाखेतील वंशज उपस्थित होते

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...