१) त्यांचे बंधु राजेभुतजी / जगदेवराव, तसेच पुत्र बहादुरजीराजे, नातु ठाकुरजीराजे दत्ताजी राजे जाधवराव, नातु विठोजीराजे अचलोजीराजे जाधवराव,पणतु रतनोजीराजे यशवंतराव राजे जाधवराव, नातु दत्ताजीराजे जाधवराव यानी बांधकामाची सुरुवात केली . इ सन १६३३ साली राजे भुतजी यांचा मृत्यू झाला व त्यानंतरचे बांधकाम राजे लखुजीराव जाधवराव यांचे पुत्र राजे बहादुरजी , त्यांचे नातु विठोजीराजे (अचलोजीराजे पुत्र ), ठाकुरजीराजे (दत्ताजीराजे पुत्र) ,देवरावराजे( अचलोजीराजे पुत्र) व पणतु रतनोजीराजे (यशवंतराजे पुत्र) यांनी पुर्ण केले. पुर्ण समाधी मंदिर स्वरुपाची आहे.समाधी बांधकाम इ सन १६३० साली सुरु केले व इ स १६४० साली पुर्ण झाली ,,
२)ही वास्तु चिरेबंदी असुन चौरसाकार आहे, ती लांबी व रुंदीने प्रत्येकी १६.४० मीटर आहे , भिँतीची उंची १४.५० मीटर आहे , समाधीचे बांधकाम कमानी घाटाचे असुन एकुण २४ कमानीवर समाधी उभारलेली आहे ,
३) मुख्य द्वार पुर्वाभिमुखी असुन दक्षिण व उत्तर दिशेला 2 उपद्वार आहेत, समाधिच्या मध्यभागी चौरस चौक असुन त्याचे क्षेत्रफळ ३.५५ × ३.५५ मीटर आहे, या चौकात राजे लखुजीराव यांची समाधी करुन त्यावर एक उत्तराभिमुख १.६० मीटर लांबिचे शिवलिंग आहे ,
४) घुमटाच्या पश्चिम भिंतीत २.५० × १.५० मीटर क्षेञफळाची खोली असुन त्यात १ मीटर उंचीचा सिंहासनारुढ राजे लखुजीराव यांचा पुतळा होता ,तो आज अस्तित्वात नाही कारण कुणी समाजकंटकानी तो फोडला ,,
५) गाभार्याच्या ४ कोपर्यात ४ खोल्या असुन प्रवेशद्वारातुन आत गेल्यास डाव्या हातास असलेल्या खोलित राजे लखुजीराव यांचे ज्येष्ठपुत्र राजे दत्ताजी यांची शिवलिंग स्वरुपात समाधी आहे ...उर्वरित 3 समाध्या अनुक्रमे राजेलखुजीराव यांचे पुत्र राजेअचलोजी, राजेराघोजी & राजेदत्ताजीपुत्र राजेयशवंतराव यांची समाधी आहे ...या सर्व समाधी वर शिवपिंड आहे ....
६) समाधी मंदिराच्या पुर्व दरवाजाच्या बाजुस व उत्तर द्वाराच्या वरती एक-एक शिलालेख कोरलेला असुन त्यात राजे जाधवराव कुटुंबाविषयी माहिती उपलब्ध आहे.
७) सर्वात महत्त्वाचे, राजे लखुजीराव जाधवराव यांच्या समाधीच्या पुर्वाभिमुख भिंतीवर गंडभेरुंडाचे शिल्प आहे.. तसेच याच भिंतीवर मयुरशिल्प, तसेच यांचे देखील शिल्प कोरलेले आहेत. .. हे मध्ययुगीन काळातील बलशाली व लष्करी दृष्ट्या ताकदवान असल्याचे प्रतिक आहे..
तसेच राजे लखुजीराव जाधवराव यांच्या समाधी खोलीच्या मागच्या /पश्चिम भिंतीवर आतल्या बाजूला श्रीकृष्ण शिल्प कोरलेले असून हे यदुवंशी क्षत्रिय श्रीकृष्ण वंशज असल्याचे प्रतिक आहे..
८) राजे लखुजीराव जाधवराव यांची संपुर्ण समाधी ही शिवमंदिर स्वरुपातील आहे....
जय लखुजीराजे जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय महाराज जय शंभुराय महाराज
No comments:
Post a Comment