प्रसिद्ध मराठा आरमारचे कान्होजी आंग्रे यांचे ज्येष्ठ पुत्र वडिलांप्रमाणेच इंग्रजपोर्तुगीज आणि सिद्दी यांच्याविरुद्ध पश्चिम किनारपट्टीवर मराठ्यांचे वर्चस्व टिकवून ठेवले आणि शूर पराक्रम गाजवला असे
"सरखेल सेखोजी आंग्रे"...
● सेखोजीचे पराक्रम तसेच मोहिमेतील यश :
या मोहिमेतील सरखेल सेखोजी आंग्रे व त्यांचे कार्य महत्त्वाचे होते. मोहिमेच्या नियोजनातील सूचनाबरोबर अल्प काळात त्यांनी काही विजय मिळवत सिद्दीची ठाणी, किल्ले ही जिंकले होते. पण युद्ध वृत्तांत देताना यासोबतच अन्य सरदारांनी मिळविलेले विजय देखील सांगितले जातील. ८ जून, १७३३ च्या पत्रानुसार बाजीराव व फत्तेसिंग यांनी सिद्दीच्या प्रदेशातील राजपुरी, खोकरी, राजकोट, अरमाट, खुष्कीचे बारा-तेरा किल्ले जिंकल्याचे कळविल्यावर सदर पत्राने पिलाजींनी त्यांचे अभिनंदन केले आहे...
३१ मे रोजी सेखोजीने सविस्तर पत्रामध्ये मोहिमेच्या हालचालींचा सविस्तर वृत्तांत दिलेला असून "मंडणगड काबीज केला आहे. गोवळकोट व विजयगड, उरलेत पण आम्हाला त्याची पर्वा नाही. चार-आठ दिवसांत ती ठिकाणे काबीज करू. नंतर उंदेरीस वेढा दिला पाहिजे. तोही आपण जिंकू असा विश्वास आहे.." १० जुलै रोजी मराठ्यांनी थळचा किल्ला जिंकला. १ मार्च १७३४ च्या पत्रानुसार गोवळकोटच्या लढ्यात १७ जण ठार तर १४ जण जखमी झाले होते. त्यांची नावेही या पत्रात मिळतात...
● १५ मार्च १७३४ कोंडाजी शिंदे लिहितात,
''बाणकोट, रायगड, महाड काबीज केले आहेत. शिंदे पेशव्यास विनंती करतात, चार वर्षे झाली घरी गेलो नाही जाण्यास परवानगी असावी..' गोवळकोट मोहिमेत आज्ञा करूनही चूक केल्याबद्दल छत्रपती शाहू महाराज कृष्णाजी पवार यास ताकीद देतात. 'आज्ञा करून एकही राउत पाठवला नाही. मसलतीचे दिवस गेल्यावर फौज येऊन काय कामाची..? ५०० स्वार गोवळकोटास मानाजी पवार याजकडे रवाना करावे.' अशीच चूक केल्याबद्दल उदाजी पवार यालाही महाराजांनी समज दिली होती व दारकोजी पवारसोबत १०० स्वार पाठवून देण्यास सांगितले. केवळ अशा सरदारासच नव्हे तर महाराजांनी बाजीराव पेशव्यासही कर्तव्यात कसूर केल्याबद्दल खडसावले आहे...
● १७ ऑक्टोबर १७४५ च्या पत्रात शाहूमहाराज लिहितात, 'गोवळकोटच्या मोर्चात शिथिलता का आली आहे..? यश का येत नाही..? आंग्रे कडील लोक उठून गेले. हे लौकिकास योग्य नाही..? तेव्हा आता स्वतः स्वामीस जावे लागेल. पिलाजीस सत्वर पाठवणे'. १५ डिसेंबर १७३५च्या पत्रानुसार शाहू महाराज विचारतात की, 'चिमाजीजवळ फौज किती आहे..? प्रत्यक्ष युद्धावर कधी जातात..?' दादोबांना खडसावून विचारतात, 'स्पष्ट सांगा, मिळमिळीत बोलू नका..' शाहू महाराजांच्या आज्ञेने १५ नोव्हेंबर १७३५ रोजी महादोबा पुरंदरे यांनी लिहिलेल्या पत्रानुसार, ‘करवीरचे छत्रपती संभाजी हे छुपेपणाने सिद्दीस मदत करतात..' त्याबद्दल शाहूमहाराजांनी त्यांना समज दिली. हे पत्र मोठे, सविस्तर असून जंजिरा मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी किती ध्यास घेतला होता ते कळते...!
―――――――――――――
#इतिहासकर्ते_महराट्टे #आंग्रे_घराणे
#छत्रपतीथोरलेशाहूमहाराज #सरखेल
#गडवाटप्रवाससह्याद्रीचा #रणमार्तंड_महराट्टे
#मराठा_आरमार #गडकिल्ले_महाराष्ट्राचे

No comments:
Post a Comment