विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 6 March 2026

सिंहगड किल्ल्यावरील स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महारजांची समाधी”..

 २ मार्च १७०० “छत्रपती राजाराम महाराज यांचे स्मृतीदिन”.

“

सिंहगड किल्ल्यावरील स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महारजांची समाधी”...
🚩

छत्रपती राजाराम महाराज जिंजीत होऊन महाराष्ट्रात परतले. अजिंक्यतारा किल्ल्यातून त्यांनी कारभार पाहिला. स्वराज्याची ती चौथी राजधानी ठरली. अतिशय आणीबाणीच्या परिस्थितीत अत्यंत समंजस वृत्ती स्वभावातील मार्दव आणि माणसांना सलगी देण्याचा गुण यामुळे त्यांनी संपुर्ण दक्षिणेत एक झंझावात निर्माण केला. "महाराष्ट्र धर्म रक्षावा "यासाठी अनेक सरदारांना प्रोत्साहित केले त्यासाठी वतनलोभी माणसांनासुद्धा वश करुन हिंदवी स्वराज्याच्या रक्षणाच्या कामाला लावले...

एका स्वातंत्र्य समराचा प्रचंड उद्योग आरंभून औरंगजेबाच्या आक्रमाणातुन राज्य वाचविले नाना प्रकारच्या अडचणींतुन मार्ग काढून मराठा मंडळाने स्वार्थत्यागपुर्वक बादशहाशी जो अपुर्व झगडा केला त्यास इतिहासात ‘स्वातंत्र्याचे युद्ध’ असे नाव कायमचे मिळाले ज्यामुळे मराठ्यांचा इतिहास इतका उज्वल बनला त्याचे श्रेय मराठ्यांचा नायक छत्रपती या नात्याने राजाराम महाराजांना मिळणे प्राप्त आहे...

● स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे जुन्या बखरीत आलेले वर्णन,
"छत्रपती राजाराम महाराज हे विचारी व मनमिळावू स्वभावाचे होते मराठा साम्राज्यातील सर्व कर्ताबगार मावळ्यांना त्यांनी एकत्र केले त्यांच्यात चैतन्य निर्माण केले छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर ११ वर्षे त्यांनी औरंगजेब आणि मोगल सैन्याला मोठ्या धैर्याने आणि चिकाटीने टक्कर दिली. अत्यंत कठीन समयी स्वराज्याचे रक्षण हीच त्यांची सर्वात मोठी आणि सर्वोत्तम कामगिरी होती..."

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाने आणि युद्धकौशल्यातील व्यवहार चातुर्याने स्वराज्याची धुरा सलग ११ वर्षे सांभाळणारे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन....🙏🏻💐🚩

――――――――――――
#इतिहासकर्ते_महराट्टे #छत्रपतीराजाराममहाराज
#किल्ले_सिंहगड #गडकिल्ले_महाराष्ट्राचे
#गडवाटप्रवाससह्याद्रीचा #स्मृतीदिन 

No comments:

Post a Comment

तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!!

  तळेगावच्या लढाईत मराठ्यांचा इंग्रजांवर दणदणीत विजय..!! अठराव्या शतकात मराठे आणि इंग्रज यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला होता. मुंबईतील ...