दिल्लीची पातशाही पालथी घालणारे मराठे
एक काळ असा होता की दिल्ली मराठ्यांचे राज्य संपवण्याचे स्वप्न पाहत होती, पण आता त्याच दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार, हे मराठे ठरवत होते..
१७५४ मध्ये मुघल बादशहाने मराठ्यांशी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. पण मराठ्यांनी मुघलांचा हा डाव उधळून लावला. मराठ्यांच्या भीतीने बादशहा आणि वजीर आपली संपत्ती आणि बेगमांना सोडून पळून गेले.
मराठ्यांनी दिल्लीवर ताबा मिळवला आणि बादशहा अहमदशहा याला कैद केले. त्याच्या जागी त्यांनी आजुजिदीन नावाच्या शाहजाद्याला गादीवर बसवले. विशेष म्हणजे, मराठ्यांनीच त्याचे #आलमगीर असे नामकरण करून त्याला दिल्लीच्या तख्तावर बसवले. दिल्लीचा बादशहा कोण असावा आणि त्याचे नाव काय असावे, हे ठरवण्याइतकी मोठी ताकद मराठ्यांनी निर्माण केली होती.
पेशवे दप्तरातील नोंद-
"अहमदशाह कैंद करून आजुजिदीन नामे शाहजादा होता त्यास तख्तावर बसविले. आलमगीर नाव ठेविले... साडेब्यायंशी लक्ष रुपये वजिरानी यांसी करार केले आहेत."
दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांनी बसवलेला आणि स्वतः नाव दिलेला बादशहा ही मराठा राज्याच्या वाढत्या वचकाची सर्वात मोठी साक्ष आहे.
संदर्भ-
१. पेशवे दप्तर भाग २१, पत्र क्रमांक ६०, पृष्ठ क्रमांक ६९ (१७ जुलै १७५४).




No comments:
Post a Comment