विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 August 2026

सदाशिवराव भाऊंचा तोतया: महादजी शिंदेंची कामगिरी

 


सदाशिवराव भाऊंचा तोतया: महादजी शिंदेंची कामगिरी

​सदाशिवराव भाऊंचा तोतया रत्नागिरीच्या किल्ल्यात कैदेत होता. तेथील किल्लेदार रामचंद्र नाईक परांजपे यांनी फेब्रुवारी १७७६ मध्ये तोतयाची सुटका केली होती. तोतयाच्या संकटाचे निराकरण करण्याची जबाबदारी महादजींवर आली. महादजी शिंदे आणि भीमराव पानसे हे दोघे तोतयाला पकडण्यासाठी निघाले.
त्या वेळी तोतयाचा उपद्रव वाढत चालला होता. तोतयाचे काही अनुयायी सिंहगडापर्यंत येऊन पोहोचले होते. हरिपंत फडक्यांच्या दक्षतेमुळे त्यांचा तेथे पराभव झाला. परंतु खुद्द तोतया कुलाबा-पेण मार्गे मुंबईच्या दिशेने निघाला. कारण मुंबईकर इंग्रजांची तोतयाला मदत होती. मुंबईला पोहोचण्याच्या आतच नोव्हेंबर १७७६ मध्ये रघूजी आंग्रे यांनी तोतयाला पकडून कुलाबापर्यंत आलेल्या महादजींच्या स्वाधीन केले.
तोतया आणि त्याचे समर्थक यांना मोठ्या बंदोबस्ताने महादजींनी पुण्याला आणले. तोतया असल्याचे उघड चौकशीत सिद्ध झाल्यावर आणि तोतयाने तशी उघड कबुली दिल्यावर त्याला १७ डिसेंबर १७७६ रोजी देहदंडाची शिक्षा देण्यात आली. तोतयाच्या संकटाचे निवारण करण्याचे श्रेय प्रामुख्याने महादजींकडेच जाते.
संदर्भ-द ग्रेट मराठा महादजी शिंदे,एन जी राठोड

No comments:

Post a Comment

मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप

  मराठा साम्राज्याचा उत्तर भारतातील विस्तार – सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत मराठा सामर्थ्याची झेप छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभर...