विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 August 2026

कनौज मोहीम आणि गनिमीकावा..!!

 


कनौज मोहीम आणि गनिमीकावा..!!


छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठ्यांच्या युद्धनीतीत गनिमी कावा आणि भेदनीती (शत्रूच्या गोटात फूट पाडणे) यांचे मोठे महत्त्व होते. याच युद्धनीतीचे एक उदाहरण कनौजच्या मोहिमेत मिळते.

डिसेंबर १७९० मध्ये महादजी शिंदे यांच्या आदेशाने त्यांचे सरदार खंडेराव हरी यांनी कनौजच्या किल्ल्याला वेढा घातला होता. किल्ला सहजासहजी हाती येत नाही हे पाहिल्यावर त्यांनी शत्रूच्या गोटातील अधिकाऱ्यांना (जमातदारांना) फोडले. त्यांना पैशांचे आणि सोन्याचे आमिष दाखवून त्यांच्याच करवी किल्ल्यातील दारूगोळ्याची २६ कोठारे उडवून दिली. या स्फोटामुळे किल्ल्यात हाहाकार उडाला, शत्रूचे मोठे नुकसान झाले आणि त्यांनी घाबरून मराठ्यांसमोर शरणागती पत्करली.

"किल्यांतील जमातदारांसी साजीश करून, दोन हजार रुपये नख्त व सोन्याचीं कडी देणें कबुल करून, किल्यांतील बारूचे कोठे सुमारे सव्वीस, जमादाराकडून अग्नी देऊन उडविले."

संदर्भ:- दिल्ली येथील मराठ्यांचीं राजकारणें (भाग २ रा) संपादक : दत्तात्रय बळवंत पारसनीस (लेखांक ४८, डिसेंबर १७९०)

No comments:

Post a Comment

ग्वाल्हेर दरबारचे सरदार जहागिरदार

  ग्वाल्हेर दरबारचे सरदार जहागिरदार ग्वाल्हेरचे जहागीरदार आणि सरदारांचा इतिहास खूप मोठा आहे. श्रीमंत महादजी शिंदे यांना ग्वाल्हेर आणि राजस्थ...