मराठा साम्राज्याचा दबदबा संपूर्ण उत्तरेत निर्माण करणाऱ्या महादजी शिंदे म्हणजेच आपल्या पाटील बाबांनी राजपुतान्यावर ऐतिहासिक विजय मिळवला होता. राजपुताना जिंकल्यानंतर महादजी बाबांनी जो भव्य 'विजय दरबार' भरवला होता, त्याच ऐतिहासिक प्रसंगाचे हे चित्र आहे. रॉबर्ट मॉबोन या ब्रिटिश चित्रकाराने १७९० च्या सुमारास आपल्या कुंचल्यातून हा प्रसंग कागदावर जिवंत केला होता. विशेष म्हणजे, आपण रॉबर्ट मॉबोनच्या त्याच मूळ रेखाचित्रावरून हे नवीन आणि अधिक स्पष्ट चित्र तयार केले आहे.
रॉबर्ट मॉबोन हा एक ब्रिटिश चित्रकार होता ज्याने भारतात येऊन मराठा दरबारातील व्यक्तींची, त्यांच्या दागिन्यांची, पेहरावाची आणि शस्त्रास्त्रांची अत्यंत बारकाईने निरीक्षणे नोंदवली होती. युरोपियन राजांसारखे मोठ्या सिंहासनावर न बसता जमिनीवर केवळ एका गादीवर बसणारे साधे मराठा राजे आणि सरदार पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले होते. १७९८ मध्ये मृत्यू पावलेल्या या ब्रिटिश चित्रकाराने काढलेली चित्रे आज मराठा इतिहासाचा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहेत.
या ऐतिहासिक चित्रात महादजी बाबांच्या दरबारतील अनेक बारकावे अत्यंत स्पष्टपणे पाहायला मिळतात. बाबांच्या डाव्या बाजूला त्यांचे शूर सेनापती गोपालराव भाऊ आहेत, तर उजव्या हाताला त्यांची ती प्रसिद्ध आणि लांबच लांब 'धोप' ठेवलेली दिसत आहे. त्यांच्या अगदी बाजूला त्यांचे अत्यंत विश्वासू आणि पराक्रमी सेनापती अंबुजीराव इंगळे हे देखील उपस्थित आहेत. छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दिल्लीच्या तख्तापर्यंत नेणाऱ्या या महानायकाचा हा विजय दरबार, खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची आणि पराक्रमाची साक्ष देतो.
#अटक_ते_कटक मराठा_साम्राज्य #इतिहासकर्ते_मरहट्टे
मूळ चित्र कमेंट मध्ये-


No comments:
Post a Comment