विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 29 October 2026

#सरदार_बापूजीराव_शिंदे पिंगोरीकर

 #अपरिचित





#सरदार_बापूजीराव_शिंदे
पिंगोरीकर
महादजी शिंदेंच्या पदरी असलेले फिरंगोजी शिंदे हे पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावचे पाटील,शिंदेशाहीच्या सोबत ते उत्तर हिंदुस्थानात आले,मराठा साम्राज्य विस्तारासाठी अमूल्य कामगिरी वाजविली पण इतिहासाने जी दाद दयायला हवी होती ती दिली गेली नाही,फिरंगोजी शिंदे व त्यांच्या वरसदारांचा इतिहास हा अज्ञातच राहिला,
फिरंगोजीरावांना खंडेराव आणि विठोजीराव हे दोन पुत्र होते,खंडेराव आणि फिरंगोजी एका लढाई मध्ये मारले गेले,पुढे विठोजीरावांना सरदारकी मिळाली,सीतामहू येथे ते शिंदेशाहीच्या वतीने कर वसूल करत,याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला,त्या ठिकाणी त्यांची छत्री समाधी उभारण्यात आली,
विठोजीरावांना बापूजीराव,गमाजीराव,आणि खंडेराव असे तीन पुत्र होते पुढे बापूजीराव आणि गमाजीरावांना सरदारकी मिळाली,दौलतरावांची मर्जी संपादन करून नावा रुपास आले ते बापूजीराव,बापूजीराव ही खासी असामी यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर जबरदस्त राजस्थानाव वचक निर्माण केली,
मेवाड या ठिकाणी दौलतराव शिंदे यांनी अबूजी इंगळे आणि बापूजी यांना सुभेदार नेमले,लागलीज मेवाड ची 16 लक्षांची कर वसुली केली,१८०६ ते १८१७ पर्यंत ते राजस्थानातच होते,
राजस्थान मधील मेवाड,अजमेर जयपूर जोधापुर ही ठान्यांची कर वसुली प्रामुख्याने बापूजी करत,जयपूरकरच्या शासक जगतसिंह याने इंग्रज सेनापती लॉर्ड लेक यांच्याकडे दौलतरावांच्या विरोधात मदत मागितली होती याला वठणीवर आणण्यासाठी दौलतरावांनी कंबर कसली, १८०८ ते १८१० या तीन वर्षाचा काळात दौलतरावांनी जयपूरचा मुलुख जाळून पोळून उध्वस्त केला,
ही मोहीम आटपून दौलतराव ग्वाल्हेरला आले,बापूजीराव ही अजमेर येथेच तळ ठोकून होते,१८०८ ते१८१७ पर्यंत जयपूरवर स्वाऱ्या आणि खंडणी वसूल करण्यात कोणतीच कसूर ठेवली नाही,दौलतराव राजस्थान मधून निघून गेल्या नंतर जयपूरराजाकडून कर सुरूळीत भेटेल म्हणून दोन वर्षे वाट पाहिली,आणि नंतर सतत जयपूरवर आक्रमण केले,जयपूरकरांचा कालाकांकर आणि टोडारी या दोन ठिकाणी राजपूत सैन्याचा बापूजीरावांनी निर्णायक पराभव केला,
जयपुरकरांनी फूस जोधापुरच्या राणाल्या लावून दिली त्याने शिंदेशाहीचे वर्चस्व झुगारून देण्याचा प्रयत्न केला,या वेळी दौलतराव स्वकीयांचा बंड मोडण्यात व्यस्त होते याचा फायदा जोधापुरकर राणा घेऊ पहात होत पण तो सफशेल फेल गेला, जयपूरकर आणि जोधापुरकर सैन्याने संयुक्त आक्रमण केले पण त्याचा बिमोड बापूजीराव,लखबादादा लाड यांनी केला,व राजस्थानावर पुन्हा मराठयांचे वर्चस्व निर्माण झाले,
मध्य भारतातील रतलाम, सीतामऊ सैलाणा,भोपाल ही संस्थाने देखील१८१८पर्यंत शिंदे शाहीच्या पंजाखालीच होती,याची सुभेदारी बापूजीरावांना होती,यांनी आपल्या गावी असलेल्या पिंगलाई देवीचा जीर्णोद्धार केला असून प्रवेश द्वारा वर दरवाजा अर्पण केल्याचा शिलालेख असून ग्वाल्हेर दरबारातून पिंगोरीकर शिंदे साहेब यांना पालखी,छडी,घोडा आदी लवाजमा,खिलत देवून मान सन्मान करण्यात आला..!

No comments:

Post a Comment

सवाई माधवराव पेशवा

  सवाई माधवराव पेशवा (१८ एप्रिल १७७४–२७ ऑक्टोबर १७९५). मराठेशाहीच्या पडत्या काळातील बाल पेशवा, बाळाजी बाजीरावच्या खून झालेल्या नारायणराव या ...