!! "अकलुजकर व किंजळेकर" घराण्याचा इतिहास !!
मुळपुरूष भिकुजी गोरकोजी चव्हाणहंबीररावमोहिते बागलाण प्रांत यांजपासुन अकलुज व किंजळेकर शाखा
विस्तृत व ससंदर्भ बघुया .
अकलुजकर व किंजळकर हे सरसेनापती हंसाजी उर्फ हंबीरराव यांचे वंशज नाहीत मग ते नावामागे हंबीरराव का लावतात असा प्रश्न अनेकांना होतो त्याचा खुलासा करणारी ही पोस्ट आहे . छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते यांचे थोरले चुलत बंधु मुळात राजा जगन्नाथसिंह चौहाण मोहिते अमीरराव असे संदर्भ अलाउद्दीन बहमनच्या कालखंडात सापडतात त्यावर एक ससंदर्भ पोस्ट करणार आहे त्यापूर्वी भिकुजी मोहीते यांच्याबद्दल जाणुन घेऊ .
बागलाण हा प्रांताचा कारभार हा भिकुजी चव्हाणहंबीररावमोहिते यांच्या आधी विठोजीराजे भोसले यांचे पुत्र मालोजीराजे भोसले (मुंगी- पैठणकर) यांच्या कडे होता तो 1637 इ.स पर्यंत व नंतर भिकुजी चव्हाण-मोहितेंकडे आला तो 1638 इ.स मध्ये यावरून एक गोष्ट स्पष्ट होते सदर घरे हि जरी शहाजान व औरंगजेब मनसबदार दिसतात परंतु शहाजीराजे मुघल निजाम मनबसदार असतांना भिकुजी मोहिते व मालोजीराजे भोसले (मुंगी पैठणकर) व परसोजीराजे भोसले (भांबोरकर) हे शहाजीराजांना सहायकच होते पुढे शिवाजी महाराजांनाही जरी ते स्वराज्यात डायरेक्टली इनव्हाल्व नसले तरीही. पुढे शाहुमहाराज यांच्या कारकिर्दीत या शाखांचे नाते संबंध सतत दिसतात . मुंगीपैठणकर राजेभोसले मालोजींची शाखेचे व भिकुजींच्या शाखेचे सबंध स्वातंत्रोत्तर कालखंडानंतरही कायम आहे . भिकुजींचा थोरला मुलगा येलोजी चव्हाण-मोहितें अकलुजला आला . भिकुजींचा धाकटा पुत्र रामोजी यांची वंशज शाखा ही किंजळेकर मोहिते असुन दोन्ही शाखांमध्ये हंबीरराव लावण्याची पद्धत ही परंपरागत आहे . मोहिते घराण्यात चव्हाणहंबीररावमोहिते का लावतात यावर स्वतंत्र पोस्ट करणार आहे त्याखेरीज इतिहास बारकाईने लक्षात येणार नाही .शिवाय संशोधनात ते मांडावेच लागते . छत्रपती शिवाजीमहाराज यांनी सरसेनापती हंसाजी उर्फ हंबीरराव यांच्या माध्यमातुन आलमगीर बादशाह कडून साल्हेर व मुल्हेरचा किल्ला स्वराज्यात गणीमी काव्याने आणला त्याचे कागदोपत्री पुरावे उपल्बध आहे . त्यात बागलाण प्रांतात 9 किल्ले येतात त्यात मजबुत व राजकिय दृष्टीने महत्वपूर्ण 2 किल्ले आहेत त्यात साल्हेर व मुल्हेर चा समावेश आहे .यात सरसेनापती हंबीरराव यांच्या सोबत ठाकुरजीराजे जाधवराव हेही सहभागी होते . आज ही जी माहीती दिली आहे यावरून काही गोष्टी स्पष्ट व्हाव्या यासाठी माहिती संदर्भ दिले आहे ते खालीलप्रमाणे क्रमशः
1) हंबीरराव हे उपपद नावामागे आहे कारण सदर भिकुजी हे शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव यांच्या घरातील असुन ते हंबीरराव यांचे चुलत बंधु आहेत . तसेच बागलाण प्रांतातील देशमुखी मिळण्या आधी ते मुघल मनसबदार होते.1638 साली तेथील जमीनदाराची हकालपट्टी करण्यासाठी त्यांना बागलाण ची मोहिम सोपवण्यात आली .
2) बागलाण प्रांत हा मोहित्यांन कडे 1638 इ.स मध्ये आला आधी तो भाग मालोजीराजे भोसले (मुंगीकरांकडे होता) मालोजीराजे हे शिवाजी महाराज यांचे सख्खे चुलत काका होते व ते स्वराज्य कार्यात अनुकूल भुमिकेत होते तसेच स्वतंत्र राज्य स्थापनेचे कार्य हे शिवाजीमहाराज यांचे मातुल आजोबा लखुजीराजे यांनी देखील केले होते तेव्हा सुद्धा ही सर्व मराठा घराणी त्यांनाही सहायक होती . काही घराण्यातील वंशज हे महाराजांना अनुकूल नव्हते हेही खरेच आहे पण ते फार कमी आहे .
3) भिकुजींना येलोजी व रामोजी अशी दोन मुले असुन त्या दोन्ही शाखांमध्ये हंबीरराव लावले जाते ते या संदर्भाहुन स्पष्ट होते .
4) अलाउद्दीन बहमन च्या कार्यकालात दख्खण मध्ये खटाव प्रांती आलले चव्हाणहंबीररावमोहिते घराण्याच्या वंशाजांनमध्येच हंबीरराव हे उपपद नावासमोर लावण्याची पद्धत आहे .
5) घराणे पराक्रमी असेल व तत्कालीन राजकिय घडामोडींत सक्रिय असेल तर ते स्थिर शाखा नसते ते राजकारणाच्या अवती भोवती कार्यरत असते .
टिप : सदर फेसबुक हे प्लॅटफॉर्म हे बेसिक माहिती देण्यापुरते आहे इतिहासाची संदर्भांची छेडछाड होऊ नये म्हणुन मी नेहमीच अल्प संदर्भ देतो जेव्हा मोहिते घराण्याचा कोर्टा तर्फे वंशज व वंशजशाखांचा निकाल लागेल तेव्हा सर्व संदर्भ सोशलाइज केले जातील व पुस्तक रूपात सुद्धा ते प्रकाशित झालेले असेल .
सदर माहिती 
धिरजसिंह मोहितेहंबीरराव
राहणार मंहमंदाबाद उर्फ हंबीररावांचेपिंपळगाव ता.जि.जालनापुर (मो .9067894001)














No comments:
Post a Comment