विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 July 2020

## सरदार पानसे ##







## सरदार पानसे ##

saambhar :Udaykumar Jagtap


सरदार पानसे यांचे मूळ आडनाव पानसी ,देशस्थ, ऋग्वेदी ,ब्राम्हण . मौजे सोनोरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे .माणकोजी विश्वनाथ पानसे एक दिवस शिवाजी महाराज सासवड मध्ये असताना त्यांचे समोर उभे राहिले.
महाराजांनी विचारले " उद्देशाने येणे केले ? पानसे म्हणाले "राजदरबारात माझी सेवा घडावी या उद्देशाने आलो आहे ". महाराज म्हणाले "मुले काय कामे करतील ?"पानसे बोलले "सरकार जी आज्ञा देतील" असे बोलुंन त्यानी त्याची मुले शिवाजी,लक्ष्मण,संभाजी महाराजांच्या पायावर घातले

. महाराज शिवाजी आणि लक्ष्मण यांची राहती पाहून खुश झाले . शिवाजीस व लक्ष्मणास त्यांनी आपल्याकडे ठेवले व संभाजीस आपला सावत्र भाऊ व्यंकोजीकडे पाठवले . पानसे खूप वाकबगार व विश्वासू. त्यामुळे शिवाजी महाराजांनी खाजगीकडील सर्व कारभार शिवाजी पानसेंस सांगितलेला दिसतो. शिवाजी महाराज मरण पावल्यावर संभाजी महाराजांनीही आपल्या बायकामुलांचं बंदोबस्त ठेवण्यास शिवाजी पानसे याना सांगितल्याचे आढळून येते.
१६८९ मध्ये औरंगजेबाने संभाजी राज्यांना ठार मारून शाहूंना दिल्लीस नेताना शिवाजी पानसे व यांची मुले खंडोजी व माधवराव त्यांच्या बरोबर गेले होते . १७०७ मध्ये औरंगजेब मरण पावला. शाहू महाराजांबरोबर खंडोजीपुन्हा स्वराज्यात आले.
माधवराव शूर असल्याने शाहू महाराजांनी त्यांना बाजीराव पेशव्यांच्या कडे राहण्यास सांगितले . बाजीराववणे माधवराव पानसे याना स्वारांची सरदारी दिली . बाजीराव बल्लाळ बरोबर १७३८ ते १७५३ मध्ये अनेक स्वाऱ्या करून यश मिळवले.
१७५३ मध्ये पेशव्यांनी तोफखाना तयार करून माधवराव पानसेना सरदारी दिली. १७५५ ला माधवराव लढाईत गोळी लागून मरण पावले. कृष्णाजी व त्यांचे चुलत बंधू भिवराव व केशवराव यांनी कर्नाटकात स्वाऱ्या करून यश मिळवले .
१७६३ मध्ये सोनोरी येथे कृष्णाजी आणि भिवराव पानसे यांनी किल्ला बांधण्यास सुरवात सुरवात केली. सुमारे दोनवर्षानी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले त्यास" मल्हारगड "असे नाव देण्यात आले . कृष्णाजी नवलगुंद च्या लढाईत मारले गेले सन १७७७ . .. भिवराव पानसे १७७९ साली सोनोरी येथे मरण पावले त्यांच्या बरोबर उमाबाई सती गेल्या .
बदामीच्या किल्ला घेताना जयवंतराव पानसेंनी २० दिवस स्वतः तोफा डागल्या. आणि विजयश्री खेचून आणली नाना फडणवीसांचा परत मागे फिरण्याचा इरादा खोटा ठरवला . पानसे घराण्यातील डझनावारी सरदार मराठी रयतेसाठी रणांगणावर धारातीर्थी पडले .
एक दिवस पेशव्याना तोफखान्यावर खूप खर्च होतो हे लक्ष्यात आल्यावर सरदार पानसे याना हिशोब मागितला . याचे पानसें याना वाईट वाटले दरबारातील सरदारांसह पेशव्यांना पानसे सरदारांनी सोनोरी येथे भोजनाचे आमंत्रण दिले . मेजवानीचा मोठा थाट केला . घरातील विधवा बायका वाढावयास लावल्या .
पेशव्यांनी विचारले "आज वाढण्यास अशा बाया लावल्या हा काय प्रकार आहे?" पानसे हात जोडून उभे राहिले "माजघरातून येताना आपण ज्या स्त्रिया पहिल्या त्या सर्व माझ्या भावजया चुलत्या वगैरे असून त्यांचे पती स्वामीकार्याकरिता युद्धात पडल्याने आज वैधव्यदशेत आयुष्य कंठात आहेत . सर्वांच्या पतींनी देह झिजवलेला आहे व शत्रूवर चढाई करताना रणभूमीवर शिरे अर्पण केली आहेत. हा आमच्या स्वाऱ्या आणि शिरांचा हिशोब. तो स्वामींनी ध्यानी आणावा. व जमाखर्चाची तोंड मिळवणी करून घ्यावी . "
पेशव्यांचे डोळ्यास पाणी आले .पेशव्यांना खूप गहिवरून आले त्यांनी पानशांचे हात घट्ट पकडले . त्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला . पुन्हा पानसे याना पेशव्यांनी हिशेब विचारला नाही .
सरदार पानसे यांनी मौजे सोनोरीस "मल्हारगड " ,गावात सहा बुरजी वाडा बांधला वाड्यात लक्ष्मी नारायणाचे मंदिर बांधले. श्री लक्ष्मी नारायणाची मूर्ती कर्नाटकातून आणली आहे मूर्ती शुभ्र संगमरोवरात गरुडावर बसून लक्ष्मी वामांगी कडेवर घेऊन चतुर्भुज शंख ,चक्र ,गदा,धारण केलेली साधारण मनुष्याएव्हडी मूर्ती बघून माधवराव पेशवे खुश झाले नंतर पेशव्यांनी श्री च्या खर्चासाठी वनपुरी इनामकरून दिला .
,श्री विठोबा,रामचंद्रजी , गणपती , यांची देवालये बांधून तिचे नाव" रामतीर्थ "दिले . वाड्याचा पूर्वेस मोठा तलाव बांधला .दिवे गावातही एक तलाव बांधला वनपुरीस गावाला पिण्यासाठी बारव बांधली .
सांगवी,नेवासे वैराग् येथेही लोकसेवार्थ मंदिरे घाट, तळी बांधली .
सरदार पानसेंनी या मराठी स्वराज्यासाठी आपल्या पिढ्यान पिढ्या शिवरायांपासून पेशवाईपर्यंत खर्ची घातल्या आहेत . अशा सरदारांबद्दल लिहिताना डोळे पाणवल्याशिवाय राहत नाहीत .... शब्द तोंडातून फुटेनासे होतात .....
## समजाई मंदिर ##
सासवड मधील या देवळाची कथा मोठी उल्लेखनीय आहे . पूर्वी सरदार पुरंदरे आणि सरदार पानसेंचा मोठा वाद होता तो काही केल्या मिटेना . शेवटी या मंदिरात त्यांचा समेट घडवून आणला गेला . हा समझोता या देवळात झाला म्हणून या देवळास' समजाईचे देऊळ 'असे म्हणतात ..

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...