विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 July 2020

## सरदार बळवंत मेहेंदळे ##





## सरदार बळवंत मेहेंदळे ##
postsaambhar :Udaykumar Jagtap
#सरदार बळवंतराव मेहेंदळे यांचा जन्म चत्पावन ब्राह्मण कुटुंबात. रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथे झाला, गणपतीपुळ्यापासून जवळ असलेल्या' मालगुंड , मध्ये यांच्या स्मरणार्थ पेशव्यांनी हेमाडपंथी मंदिरांप्रमाणे १७६५ ला स्मृतिमंदिर बांधले . बळवंतराव मेहेंदळे हे सदाशिवरावभाऊ यांचा उजवा हात समजले जात होते . बळवंतरावनी लक्ष्मीबाई हिच्याशी लग्न केले कि ज्या बळवंतराववांबरोबर पानिपतच्या युद्धात बरोबर होत्या . बाळाजीराव पेशव्यांच्या काळात मेहेंदळ्यांचा उत्कर्ष झालेला दिसतो . सासवड मधील भैरवनाथ या ग्रामदैवत मंदिराची व्यवस्था व खर्चाबाबत निरंतर सोय व्हावी म्हणून न्हावी व भोंगवली या भोर तालुक्यातील गावांचे उत्त्पन्न वतन म्हणून दिले होते . .भैरवनाथाच्या मंदिरातील चौघडा हा मेहेंदळेंनी दिलेला आहे . मेहेंदळे यांचा वाडा सासवड मध्ये ब्राम्हण आळी आहे . पेशव्यांच्या तोफखान्यावरील "गोलंदाज सरदार" बळवंतराव मेहेंदळे यांच्या वाड्यावरून चौघडा वादन होत असे . श्रीमंत पेशवे एकदा सासवडी आल्यानंतर मेहेंदळेंच्या विरोधकांनी पेशव्यांचे कान भरले "मेहेंदळे शिरजोर झाले दारी चौघडा वाजवितात " पेशव्यांनी मेहेंदळ्यांना जाबसाल केला . त्यावेळी सरदार मेहेंदळ्यानी आपल्या वाड्यातील चौघडा भैरवनाथाच्या मंदिरास अर्पण केला . त्यावेळेपासून चौघडा नाथद्वारी झडतो आहे .बळवंतरावांनी २४सप्टेंबर १७५७ मध्ये कर्नाटकातील कडाप्पा मधील मजीद खान यांचा पराभव करून आपला मोर्चा बेदनूर व चित्रदूर्गला वळवला . अतुलनीय पराक्रम करून येथेही विजय मिळवला. सरदार मेहेंदळेंबरोबर गोपाळराव पटवर्धन व विसाजी कृष्णा बिनीवाले या सरदारा बरोबर उदगीरच्या लढाईत विजय मिळाल्यामुळे पूर्वेकडील किनारपट्टी बरोबरच दक्षिणेत मराठ्यांचा दबदाबा वाढला . भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये मेहेंदळेंबद्दल लिहिले आहे कि ते अत्यंत तापट स्वभावाचे ,रागीट होते ,प्रसंगी शिव्या शापही देत असत, म्हाताऱ्या झालेल्या मल्हारराव होळकरांची व जनकोजी शिंद्यांची टिंगल टवाळी करत .प्रत्यक्षात मात्र ते अत्यंत बुद्धिमान आणि चतुर होते . सदाशिराव भाऊंच्या सोबत असणाऱ्या फौजांबरोबर कुंजपुरा व नंतर पानिपतकडे जाणाऱ्या सैन्याचे नेतृत्व मेहेंदळे करीत होते . नजीब खानचा भाऊ सुल्तानखान याच्या फौजेस मराठ्यांच्या फौज भिडल्या. नजीब खानचा काका खली- उल- रहिमान याला मराठ्यांनी कापून काढले . रोहिल्याना मराठ्यांनी सरसकट कापून काढले जे बचावले ते घायाळ झाले . मराठ्यांचा विजय होत होता .. पण विजयाला गालबोट लागले . ७ डिसेंबर १७६० नजीब खानाच्या सैन्याची गोळी मेहेंदळ्यांना लागली वेळ होती संध्याकाळी ७ वाजताची . मेहेंदळे सरदार आपल्या घोड्यावरून छातीत गोळी लागल्याने धारातीर्थी पडले . खंडेराव निंबाळकराने त्यांचे पार्थिव रणांगणातून दुश्मनांकडून विटंबना होऊ नये म्हणून सुखरूप आणले . सदाशिवराव भाऊंना अतीव दुःख झाले . बाळाजी विश्वनाथ पेशव्यांची बहीण हि मेहंदळ्यांची बायको लक्ष्मीबाई . लक्ष्मीबाई या बळवंतराव मेहेंदळेंबरोबर सती गेल्या . त्यांच्या मागे त्यांचा १४ वर्षाचा मुलगा कृष्णराव भाऊंच्या हातात सोपवण्यात आला . पानिपताहून पुण्यात कृष्णराव बळवंत मेहेंदळे सुखरूप आले . पुढे ते अप्पासाहेब बळवंत मेहेंदळे या नावाने प्रसिद्धीस पावले . शनिवारवाड्या जवळील चौकास बळवंतराव मेहेंदळे यांचा स्मरणार्थ कायमस्वरूपी ''आप्पा बळवंत चौक ''या नावाने नाव देण्यात आले. मेहेंदळ्यांचा सासवड मधील वाडा त्यांच्या कर्तृत्वाची माहिती सांगत दिमाखाने उभा आहे हा वाडा आज पासून कधीच बघायला मिळणार नाही कारण तो आज पाडण्यात आला आहे . . माझं सासवड "बावन्न सरदारांचं ,बावन्न वाड्याचं " आहे . एक एक वाडा ओलांडताना एका एकाच इतिहास डोळ्यासोमोर उभा राहतो. आजही त्या वाड्यातून बाहेर पडणाऱ्या त्यांच्या वंशज असलेल्या व्यक्तींमध्ये मला कधी सरदार पुरंदरे दिसतो,कधी बाळाजी पेशवा दिसतो, कधी सखाराम बोकील , तर कधी गोदाजी व त्याचे पुतणे संताजी ,खंडोजी जगताप दिसतो, बाजी पासलकर दिसतो. दाणी विचूरकर भेटतो . सरदार बापू गोखले भेटतो, कधी सरदार पानसे भेटतो . सरदार पवार सरदार जाधव,सरदार कानडे रोज मला खुणावतात पालखी मैदानावर होनाजीची भूपाळी ऐकू येते . बाळा करंजकर दिसतो . कधी कधी क्रांतिकारांच्या घोषणा ऐकू येतात .
पडलेले वाडे आणि त्यांचे निखळले चिरे पाहून हृदय पिळवटले जाते . त्या चिऱ्यांना खूप सांगायचे आहे पण त्यांचे ऐकायला कोणालाच वेळ राहिला नाही . अंतरीचे शल्य उरात ठेऊन काळाच्या ओघात कोणीतरी त्यांचा इतिहास ऐकेल या आशेपायी ऊन वर पाऊस सोसत विदीर्ण झालेले शरीर घेऊन वाडे येणाऱ्या जाणाऱ्याला खुणावत आहेत . . खूप सरदार भेटतात . चांगदेवांपासून,भुतोजी तेली, सोपानदेवांपर्यंत संत ऋषी मुनी भेटतात समाजसुधारक ज्योतिबा फुले , उमाजी नाईक ,नारायणराव पेशव्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात शरीराच्या खांडोळ्या झालेला एखतपूरचा स्वामीभक्त चाफजी टिळेकर, पट्ठे बापूराव ,सगनभाऊ किती नवे घ्यावीत . सरदार पिलाजीराव जाधवराव, पानिपतच्या लढाईतून पार्वतीबाईंना सुखरूप आणणारा जानू भिंताडे (भिवंडी) , माळी सामाज्याचा न्याय निवडा करणारे न्यायाधीश म्हणजे " म्हेतरा "वरून झालेले म्हेत्रे . घोड्यांच्या देखरेखीसाठी नेमलेले व नंतर घोडेस्वार झाले त्याचे पुढे लढाईचे वेड(पिसे) लागलेले रणपिसे "याना रंणा चे लागले पिसे "ते रणपिसे काय काय म्हणून लिहावे माझ्या माणसांबद्दल आणि इतिहासाबद्दल .
सासवड करांचे या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासाची पाने स्वराज्यापासून स्वातंत्र्यापर्यंत लिहिताना सासवड चे व सासवडकरांचे नाव लिहिल्या शिवाय इतिहास पूर्णच होऊ शकणार नाही .....

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...