विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 July 2020

#सरलष्कर_उमदेतुलमुलुक_धनाजी_जाधवराव

इस 1698 ते 1708 या काळात हा मराठ्यांचा मुख्य सेनापती राहिले होते. संताजी घोरपडे यांचा दुर्दैवी म्रूत्यु नंतर महाराणी ताराराणी ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी आपला स्वातंत्र्याचा लढा आणखी नेटाने चालु ठेवला ह्यात मुख्य साथ मिळाली ती धनाजी जाधवराव , नेमाजी शिंदे , संताजी पांढरे , दमाजी थोरात , पदाजी बंडगर , पंतप्रतिनिधी , हिंमत बहाद्दर चव्हाण यासारख्या मातब्बर सेनानायकांची.
संताजी घोरपडे यांच्या मृत्यु नंतर त्यांचा जफ्तनमुलुक हा किताब देखील धनाजी जाधवराव यांना देण्यात आला. तर #जयसिंगराव हा त्यांचा मानाचा किताब शेवट पर्यंत त्याच्या कडे चालु राहिला. अश्या या धनाजी जाधवराव यांच्या सैन्यात असलेल्या सरदार व लष्कर यांची यादी पुढील प्रमाणे ..
1) सुभा संताजीराव जाधवराव
2) सुभा चंद्रसेन जाधवराव
3) सुभा रामाजी घाटगे
4) सिवाजी जाधवराव
5) विठोजी खताळ
6) भुजबळराव काकाजी
7) गणुजी कोळेकर
8) जोगोजी रुपनवर
9) सेटयाजी व जोगोजी रुपणवर व येमाजी महार्णवर
10) सुभा पदाजी बंडगर
11)सिदोजी रुपणवर
12)रामोजी बेलदार
13)सयाजी जगताप
14)कासोजी मोरोजी जगताप
15)वंणगपाळ निंबाळकर
16)साबाजी भोसले
17)पिराजी वाघमोडे
18)खाणाजी व मुधोजी बंडगर
19)शितोळे
20)मोरे
21)वाळके
22)संभाजी व खाणाजी बंडगर
23)मुधोजी बेलदार
24)भिवजी चव्हाण
25)रामराव खराडे
27)राणोजी माने
28)संताजी पवार
29)संभाजी नलवडे
30)संताजी बिन बाजी भोसले
31)तूळाजी घाटगे
32)राणोजी यादव
33) सुकूमाजी यादव
34)दत्ताजी भौसले
35)भिकाजी कोकरे
36)फत्तेखान भोसले
37)सिवाजी साळोंखी
38)माधवराव कृष्णाजी घाटगे
39)जानोजी गिरजोजी भोसले !
40)रायजी मल्हार
41)मिताजी शेंडगे
42)वाघोजी कदम
43)सिवाजी धुळोजी ठवरे
44)संताजी ढमढेरे
45)माणाजी दरेकर
46)बहिर्जि गौड
47)देवजी संताजी खांडेकर !
48)सर्ज्याराव पवार
49)राणोजी शिंदे
50)धुकोजी वाघमोडे
51)शाहाजी शिंदे
52)मेसजी कोळी
53)हीरोजी सोनवलकर
54)आम्ब्रोजी व बाळोजी पांढरे
55)गुणाजी अविचार
56)रामाजी बाजी
57)त्र्यंबकजी ढमढेरे
58)आबा दाजी शेंडगे
59)शंकराजी फर्जंद
60)आप्पाजी आश्रोजी सोनवलकर
61)तुळाजी गिरजोजी सोनवलकर
असे असंख्य मराठावीर मराठ्यांचा स्वातंत्रसंग्रामात लढले. आणि या महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या कार्य कर्तुत्वाचा एक ठसा उमटवून गेले.
होळकर रियासत समूहाच्या वतीने सरलष्कर जयसिंगराव धनाजी जाधवराव यांना विनम्र आदरांजली ...
संदर्भ : सरंजामी मरहट्टे
मधुकर हक्के. सदस्य ,
मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ


No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...