विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 July 2020

मालेराव होळकर

मालेराव होळकर
postsaambhar :मयुर हनुमंतराव सुळ
संदर्भ: ज्ञात- अज्ञात अहिल्याबाई- विनया खडपेकर
:
मल्हाररावांच्या मृत्यूनंतर राजमंडळाने रीतसर मल्हाररावांच्या जागी मालेरावांची नेमणूक केली.या संदर्भात दोन पत्रे जारी करण्यात आली.एक पत्र मल्हाररावांच्या मृत्यूनंतर ताबडतोब आले होते.2 जून 1766 च्या पत्रात त्यांना सनद दिली होती. ' नूतन इनाम दरोबस्त कुलबाब कुलकानु ' हे अधिकार दिल्याची सनद होती.यात मल्हारनगर मध्ये मल्हाररावांची छत्री बांधणे आणि सदावर्त चालवणे यासाठी मालेरावांना 15 गावे दिली असे जाहीर केले होते. सनद आली.अहिल्याबाई सावध होत्या.होळकरांच्या राज्याचा कारभार अधिकृतपणे मालेरावांवर सोपवला असला तरी अहिल्याबाईंच्या खांद्यावर भार जाणवत होता.हा भर आज घटकेला तरी मुलगा पेलू शकत नाही याची त्यांना पूर्ण कल्पना होती. पेशवे ही हे जाणून आहेत,त्यांची भिस्त आपल्यावरच आहे हे त्या जाणून होत्या.या परिस्थितीसंबंधी कोणाकडेही तक्रार करता येणार नव्हती.ही जबाबदारी त्या परमेश्वराला स्मरून आपणच पार पाडणे आहे,ही त्यांची ठाम धारणा होती. प्रत्यक्ष सनद मल्हाररावांच्या नावे आल्यामुळे,मालेराव कामकाजात काही प्रमाणात लक्ष घालू लागले.त्यांनी जबाबदारीने मल्हाररावांच्या मृत्यूची वार्ता सावेर परगण्यात कमाविसदाराला कळविली. मालेरावांना कारभाराला लावण्याच्या प्रयत्नांना यश येत असतानाच मल्हाररावांचा मृत्यू ओढवला होता.आता मल्हाररावांच्या निधनोत्तर कमाविसदार, मामलतदार येऊन मालेरावांशी सन्मानाने बोलू लागले.आपापल्या महालातील बऱ्यावाईट हकीकती सांगू लागले.त्यावरील कारवाई अहिल्याबाईच पार पाडत होत्या.पण आता मालेराव निदान त्यांचे एकूण घेऊ लागले.काही पत्रांना उत्तर देऊ लागले. परंतु मध्येच एक भयंकर घटना घडली.वाड्यातील आपल्या एका दासिशी जरिकाम करणाऱ्या कोण्या विणकराचे संबंध आहेत असा संशय मालेरावांना येऊ लागला.त्यांचे संबंध कोणते त्याचा स्पष्ट उल्लेख नाही.पण विणकराशी तिचे संबंध कळल्यावर मालेराव त्याचा पिछा करू लागले त्यावरती नजर ठेऊ लागले. अहिल्याबाई घाबरल्या.आपला मुलगा केव्हा काय करेल त्याचा भरवसा वाटत नव्हता.त्यांनी त्यांना जाणवणार नाही अशा बेताने नजरकैद केले.त्यांच्याभोवती चांगली श्रीमंत माणसे खेळ-करमणुकीसाठी ठेवली.नंतर अहिल्याबाईंनी या विणकर दासी प्रकरणाची रीतसर चौकशी सुरू केली. पण चौकशी पूर्ण होण्याच्या अगोदर मालेराव यांनी त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली. न्यायप्रिय अहिल्याबाईंनी या प्रकरणाची चालू असलेली चौकशी थांबवली नाही.ती सुरूच ठेवली.तो विणकर निरपराध होता असे सिद्ध झाले. मालेराव भेदारून गेले.त्यांचे मन त्यांना खाऊ लागले.त्यांना वाटू लागले,तो विणकर त्यांच्यापुढ उभा आणि म्हणतो "मी तुझा सूड उगविन."हे भास वाढू लागले.विणकर मागे उभा आणि म्हणतो,"मी भयंकर सुड_" मालेरावांच्या ओठांतून हेच शब्द पुनः पुन्हा येऊ लागले. त्यांची तब्बेत खालावू लागली.अहिल्याबाई चींताचुर झाल्या. ‌त्या काळात हे उद्गार भुताचे समजले गेले.परंतु हे मालेरावांच्या अंतर्मनाचेच उद्गार होते.हे त्यांच्या व्यक्तिमत्वातील निराळ्या पैलूवर प्रकाश टाकतात.याचा अर्थ, आतआत खोल कुठेतरी त्याचा या हत्येबद्दल कमालीचे अपराधी वाटत होते. आईच्या व्यक्तिमत्त्वाचा सात्विक अंश त्याच्यातील उतरलेला होता.ही सत्विकताच त्याची छळणुक करीत होती.एरवी एका सत्ताधारी सरदाराला,रागाच्या भरात हातून झालेल्या,एका सामान्य विनाकराच्या खुनामुळे इतके अस्वस्थ वाटण्याचे कारण नव्हते. या काळात अहिल्याबाई सतत मालेरावांच्या उशा पायथ्याशी बसून औषधपाणी करीत होत्या.पण मालेरावांची तब्बेत ढासळत च गेली.अखेर 27 मार्च 1767 या दिवशी मालेरावांचा मृत्यू झाला. साध्वी अहिल्याबाईंच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजकारण करण्यास असमर्थ असलेला मुलगा भक्तिभावी चारित्राकडून दुर्वर्तनी ठरवले गेले.एखादी व्यक्ती पशुप्रेमी असणे हे काही दुर्गुनी किंवा पाशवी मानसिकतेचे लक्षण नव्हे.पशुप्रेम काही प्रमाणात वडील आणि अजोबांमध्येही असावेच.म्हणून तर मल्हारराव आपल्या कुत्र्याला घेऊन बाजीराव पेशव्याच्या श्राद्ध ला भोजनाला गेले होते.तोफा वाहून नेणाऱ्या बैलांच्या चारापाण्याची चांगली व्यवस्था करा,असे मल्हारराव अहिल्याबाईंना पुनः पुन्हा कळवत असत.खंडेराव यांच्या चितेत त्यांची आवडती कुत्री गुलबदन हिनेही उडी घेतली.याचा अर्थ हा धनी त्या जीवाला कमालीचे ममत्व,जिव्हाळा देत होते.हेच पशिप्रेम मालेराव यांच्यात शतगुनित होऊन आले असावे.परंतु तत्कालीन राजघराण्यातील वारसाला असा आगळावेगळा छंद तत्कालीन समाजरचनेचा मंजुरच नव्हता.मालेराव दृष्ट प्रवृत्ती मध्ये गणले जाण्या मागचे कारण म्हणजे ब्राम्हणाच्या दान दिलेल्या वस्तूमध्ये विंचू किंवा तत्सम प्राणी घालणे.त्या काळात सगळे ब्राम्हण प्रामाणिक आणि विद्याप्रेमी नव्हते. ब्रम्हणात,साधुंमध्ये लबाड,ढोंगी कित्तेक असत.म्हणूनच विद्यावंत ब्राम्हणास पारखून घेतले पाहिजे हे शंभर वर्षांपूर्वी रामदासांनी सांगितले होते. वयाच्या बाविसाव्या वर्षी मालेराव गेले.होळकर घराण्यातील तिसऱ्या पुरुषाचा अंत झाला.होळकरांचे राज्य निर्वारस झाले.भोवतालची जनता,राजे,सरदार, कमाविसदार, मामलतदार,अहिल्याबाईंनकडे पाहू लागले__आता पुढे काय?

#अहिल्यापर्व
#जागर_इतिहासाचा
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...