postsaambhar :Udaykumar Jagtap
सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छ. शिवाजी महाराजांनी २६ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली.
बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. सिंहाची छाती असणार्या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची आण घेतली.
या शपथ सोहळयाला गोदाजी जगताप व सूर्यराव काकडे हजर निश्चित असणार
. शिरवळ जवळचा सुभानमंगळ किल्ला फत्तेखान बरोबर आलेल्या बाळाजी हैबतराव याने जिंकला होता . राज्यांनी आज्ञा दिली" .शिरवळवर चालून जा हैबतराववास गिरफ्तार करा. फत्तेखानाशी पुरंदर अथवा बेलसरजवळ् झुंज घालू ." शिरवळ जिंकायला कोण जातो ? "म्हणून विचारता सर्वजण मी मी म्हणू लागले .
राज्यांनी योजना केली . याचे सुंदर वर्णन कवींद्र परमानंदानी केले आहे. कवींद्र परमानंद हा शिवाजी महाराजांचा समकालीन होता . त्याने जे वर्णन केलेले आहे ते सत्य आहे कारण बखरी प्रमाणे ते सांगीव माहितीवर आधारित नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर तो काशीस निघून गेला . त्याचे आडनाव नेवासकर होते . तेथे गेल्यावर त्याला तेथील लोक शिवाजी महाराजांनविषयी त्याला विचारले त्या वेळेस त्याने संस्कृत मध्ये लिहिलेले" शिव भारत" कथा करून सांगितले
. बऱ्याच लढाया त्याने स्वतः बघितलेल्या होत्या आणि लगेच त्याचे वर्णन लिहून काढले होते . सन १६६४ मध्ये राजापूरला धर्मनिर्णयार्थ वैशाख मासात तो महाराष्ट्रात आला होता असे दिसते आहे तो राज्याभिषेकासही हजर होता.
गोदाजी जगताप यांचा उल्लेख विशेषतः खालील लढायांमध्ये आढळून येतो (१) शिरवळच्या किल्ला घेण्यासाठी सर्वच शिरवलळ कडे दौडत निघाले कावजी ,भिमाजी वाघ,भैरोजी चोर गोदाजी जगताप संभाजी काटे यांच्या युद्धवेशापुढे हैबतरावाची फौज भेदरून गेली. .कावजीने बाळाजी हैबतराववास पडले त्याच्या सैन्याची दाणादाण उडाली . सुभानमंगळ फत्ते झाला. हि लढाई ८ ऑगस्ट १६४८ मध्ये झाली .
(२) खानाची छावणी बेलसर येथे पडली होती . .स्वराज्यावर आलेले हे पहिले संकट महारांजवळ अवघे १२०० साथीदार महाराजांनी खानाच्या छावणीवर रात्री छापा टाकण्याची योजना बनवली रात्री छापा टाकून राज्यांनी खानाच्या सैन्याची दाणादाण उडवली
फतेखानाने पुरंदरवर हल्ला केला. गडावरून मावळ्यांनी धुळीचा लोट पाहून फत्तरांचा मारा केला खानाचा एक नामवंत सरदार मुसेखान मोठा योद्धा इर्षेने फौज गडावर चढवू लागला .
.गोदाजी जगताप याचे वर्णन कवींद्र परमानंद असे करतो कि," शत्रूंचा विध्वंस करणारा, हाडे (घुसळणारा ) व निकराच्या युद्धात आनंद मानणारा महायोद्धा गोदाजी जगताप ".
कवींद्र आपल्या शिवभारत या ग्रंथांमधील १३ अध्यायात म्हणतो " गोदाजीने आपला घोडा उंच उडवीत व शस्त्र परजत अतिशय त्वेषाने प्रहार करू लागला , गोदाजी जगताप याने सरळ मुसेखानाचाच वेध घेतला . घनघोर युद्ध सुरु झाले . गड रक्ताने न्हाऊ लागला"
. कवींद्र परमानंद पुढे म्हणतो "क्रोधाने बेफाम झालेल्या गोदाजीने जोराने चाल करून मुसेखानाच्या छातीत तीक्ष्ण भाला खुपसला
. पण मुसेखानाने त्याच्या छातीत खुपसलेल्या भाला कवच भेदून जाणाऱ्या तीक्ष्ण भाल्याला उपटून काढून क्रोधाने दात ओठ चावून लगेचच त्याचे दोनतुकडे करून टाकले"
. मग कवींद्र म्हणतो ," आहो व्दिजनांनो, त्या समई गोदाजी जगताप याने मुसेखानास कसे मारले हे मी सर्व आता सांगतो . ते आपण ऐकावे
'" बलवान मुसेखानाने गोदाजीचा भाला मोडल्यावर तो क्रुद्ध होऊन त्याने तलवार हाती घेतली . .गोदाजीने त्याच्या विजेसारख्या तलवारीने शेकडो पठाणांचे तुकडे तुकडे करून भूमीवर पडले
. मुसेखानाने त्याचे ते अतिमानवाचे कृत्य पाहून त्याच्या डाव्या बहुवर आपल्या तलवारीने वा र केला .
वेगवान मुसेखानाने डाव्या बाहूंवर वर केला असताही गोदाजी जसा वाऱ्याने वनवृक्ष कंप पावत नाही .त्या प्रमाणे कंप गोदाजी पावला नाही .
कपाळास खूप आठ्या घातलेले , व क्रोधानें क्रूर झालेले ते दोघेही हातात भयंकर तलवारी घेऊन पुढे जात मागे येत . हत्ती प्रमाणे गर्जना करत .
परस्परांना प्रहार करत त्यांची शिरसस्राणे व कवचे विदीर्ण होऊन त्यांना शोभू लागले . मग एकमेकांच्या शास्त्रप्रहाराने जखमी झालेले हे दोघेहि एकदम रक्ताच्या धरणी पृथ्वीला अभिषेक करू लागले
आहो, क्षणमात्र मुसेखान व गोदाजीचे बरोबरीचे युद्ध झाले समसमान झाले . मग या युद्धामुळे होणाऱ्या वेदना होत असतानाही गोदाजीने मुसेखानावर वरचढ केली
. मग पुष्कळ प्रहारच्या योगे अत्यंत विव्हळ झालेला असताही त्या बलवान मुसेखानाने गोदाजीच्या मस्तकावर तलवार हाणली . जो त्याची तलवार आपल्या डोक्यात पडते ना पडते तोच गोदाजीने आपल्या तलवारीने मुसेखानास मारले
.त्या वेळी तेथे क्रुद्ध गोदाजीने प्रहार केलेला तो मुसेखान खांद्यापासून मध्यभागापर्यंत चिरला जाऊन त्याचे दोन तुकडे झाले
.तेंव्हा दोन तुकडे झालेले त्याचे शरीर पाडण्यात आले आणि त्यामुळे रक्तप्रवाहाच्या योगे पृथ्वीतल तांबडे लाल झाले . गोदाजी जगताप याने मुसेखानास पाडले असता तेथे शेकडो यवन यमराजाचे पाहुणे झाले ."
अशा प्रकारे कवींद्र परमानंदाने यतार्थ युद्धाचे वर्णन केलेले आहे. यावरून गोदाजी जगताप यांच्या पराक्क्रमाचा अंदाज येतो व त्यांचे इतिहासातील स्थान लक्षात येते .
स्वराज्य निर्मितीसाठी सुरवातीच्या मूठभर मावळ्यांमध्ये महापराक्क्रमी गोदाजी जगताप यांचा उल्लेख आणखी काही लढायांमध्ये येतो .
(३) अफजलखानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराजांचे मावळे २५ नोव्हेंबर १६५९ मध्ये कोल्हापुरात शिरले . त्यानी २८ नोव्हेम्बर१६५९मध्ये रात्री पन्हाळा सर केला . रुस्तुमेजमान आणि फाजलखान विजापुराहून महाराजांवर चाल करण्यासाठी निघाला. महाराजांनी रायबागेकडे पाठवलेली फौज पुन्हा मागे बोलावली
. त्यात गोदाजी जगताप,वाघोजी तुपे,हिरोजी इंगळे ,भिमाजी वाघ,सिधोजी पवार महाडिक ,जाधव ,पांढरे खराटे सिद्दी हलाल हे साथीदार महाराजांबरोबर होते
. महाराज त्यांना म्हणाले" हिराजी, तू मलिक इतबारावर हल्ला चढ व्हायचा. महाडिक, तुम्ही फत्तेखानाशी लढायचे , सिधोजी , तू सादतखानशी .गोदाजी, तू सर्जेराव घाडगे आणि घोरपड्याना घेरायचेस ."
विजापुरी फौजेवर चहुबाजूने मराठ्यांचा गराडा पडला रुस्तुमेजमान आणि फाजलखान दोघेही विजापुरास पासून गेले मराठ्यांचा विजय झाला . तो दिवस होता २८ डिसेंबर १६५९.
(४) " मराठ्यांवरील मोहिमेसाठी तुम्ही दक्खनवर कुच करा "असा हुकूम औरंगजेबाने बहादुरखानास सोडल्यावर त्यांनी साल्हेर किल्ल्यास वेढा दिला १६७१ मध्ये वर्षाच्या शेवटीमहाराजांनी प्रतापराव याना सालेरीस जाऊन खानावर छापा टाकण्यास आज्ञा केली.
मोरोपंत व प्रतापराव साल्हेरच्या वेढ्यावर अस्कामात जाऊन तुटून पडले . त्यांच्या फौजेत आनंदराव मकाजी ,व्यन्कोजी दत्तो ,रुपाजी भोसले ,शिदोजी निंबाळकर ,खंडोजी जगताप,गोदाजी जगताप,संताजी जगताप मानाजी मोरे, विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ ,मुकुंद बल्लाळ, सूर्यराव काकडे हे सर्व कडवे सरदार होते
. बखरकार म्हणतो "सरदारांनी व मावळ्यांनी शिकस्त केली सूर्यराव काकडे पंचहजारी ,मोठा लष्कर धारकरी याने युद्ध थोर केले परंतु जंबुरीयाचा गोळा लागून सूर्यराव पडिला असे युद्ध झाले मराठ्यांचे फत्ते झाली" फेब्रुवारी १६७२.
(५) या व्यतिरिक्त संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर म्हणजे ११मार्च १६८९ नंतर एका लढाईमध्ये गोदाजी जगताप यांचा उल्लेख आढळतो तो म्हणजे कवल्याबावल्याची खिंड संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर औरंगजेबाने रायगडाचे पाश आवळायला सुरवात केली
इतिकद खानाच्या हाती सर्व सूत्रे देण्यात आली महाराणी येसूबाई,शंभू पुत्र शिवाजी नंतरचे शाहू राजाराम महाराज त्यांच्या पत्नी ताराराणी शिवाजी महाराजांची पत्नी सकवारबाई एकगठ्ठा रायगडावर होते .
कावल्या बावल्याच्या खिंडीतून शहाबुद्दीन उतरून रायगडास वेढा देणार असे कळल्या नंतर गोदाजी जगताप आणि सांदोशी या गावचे सर्कले नाईकांनी रायगडाचा धोका ओळखला .
दोघे मर्द कावल्या बावल्याच्या खिंडीत उभे ठाकले त्या दोघांनी खिंड लाढवायचे ठरवले . घोड खिंड पावनखिंड या सारखाच प्रताप गोदाजीने केला .
शहाबुद्दीनचा सेना सागर मूठभर मावळ्यांच्या संगतीने थोपवून धरला शहाबुद्दीनचे ३०० सैनिक त्यांनी कापून काढले बाकीचे शहाबुद्दीनचे सैन्य पळत सुटले . रायगडाच्या भवानीकड्यावरून राजाराम महाराज मोगलांच्या तावडीतून सटकले .
सगळ्यांनी एकत्र राहणे गैरसोयीचे होईल महाराणी येसूबाई यांनी योग्य निर्णय घेतला ." तुम्ही गडाबाहेर जा 'आम्ही गड भांडवितो . तुम्ही परमुलखीं राहून शिकस्त करा .
शिवपत्नी सकवारबाई शिवस्नुषा येसूबाई,बालशिवाजी (शाहू )हे सारे इतिकादखानाच्या हाती पडले . पण गोदाजी जगताप व सर्कले यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे राजाराम महाराज व ताराराणी सुखरूप बाहेर पडल्या .
पुढे राजाराम महाराजांनी महाराष्ट्रापासून जिंजीपावेतो युद्ध मांडले ताराराणीच्या हल्लकल्होळ उडवला डेक्कन जिंकायला आलेला औरंगजेब म्हातारा होऊन नगर मध्ये वारला व अन खुल्ताबादला कबरीत निद्रिस्थ झाला. मग शाहूंची सुटका हे सारं पुढच झालं नसत . ह्यातलं काहीही पुढे घडलं नसत
. गोदाजी जगताप व सर्कल नसते तर हे कधीच घडला नसत. गोदाजी जगताप याच्या पराक्रमाची साक्ष देत" कोकणदिवा" (कोकणदिवा नावाच्या डोंगरातून कावल्या बावल्याची खिंड रायगडाकडे जाते ) आजही रायगडासमोर उभा आहे .
शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या पागा शिलेदार यांच्या यादी मध्ये राज्याभिषेकाच्या वेळी शिलेदारांच्या २९ शिलेदारांपैकी ३ शिलेदार सासवड चे होते.
त्यांची नावे (१) गोदाजी जगताप (२) खंडोजी जगताप (३) संताजी जगताप
" शिलेदार" म्हणजे जो आपल्या सत्तेच्या घोड्यावर बसून धन्याची चाकरी करतो तो शिलेदार
व जो धन्याच्या घोड्यावर बसून चाकरी धन्याची करतो" बारगीर"
. माझ्या सासवड मधील शिवाजी महाराजांच्या चाकरी मध्ये ३ शिलेदार होते हे आठवले तरी माझी छाती गर्वाने फुलून जाते
.
या सासवड मधील गोदाजी ,संताजी , खंडोजी जगताप या तीनही सरदारांनी स्वराज्याच्या सुरवातीपासून शिवाजी महाराजांची इमाने इतबारे सेवा केली होती व आपले स्वराज्यासाठी रक्त सांडले........ त्यांचे जीवन कृतार्थ झाले ........
उदयकुमार जगताप
.



No comments:
Post a Comment