postsaambhar :Udaykumar Jagtap
थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म १८ ऑगस्ट १७०० मध्ये झाला. त्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे वास्तव्य सुरवातीच्या काळात सासवड मधील " पेटीच्या वाड्यामध्ये "म्हणजे श्री . सागर दत्तात्रय जगताप यांच्या घराशेजारील वाड्यात होते .
.त्यांचे व सरदार" अंबाजीपंत पुरंदऱ्यांचे "संबंध अत्यंत घरोब्याचे होते . ते एकमेकास बंधुतुल्य मनात असत . बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी ३० ऑगस्ट मध्ये लिहिलेल्या पत्रात पुरंदरेंना म्हणतात
",अंबाजी पंत यासी सेवक बाळाजी विश्वनाथ यांचा नमस्कार ,विनंती उपर कृष्णा मृत्तिकेचे (तोफेची दारू )राजर्षी सेनापतीस फार जरूर लागले आहे . यास ये प्रसंगी भगीरथ प्रयत्न करून पक्के २। कृष्ण मृतीका मिळवून देणें ... मऱ्हाटी आज कुल रक्षिता तरच तुमचे राहणे या मुलखात होऊन सर्वही अनुकूल होते हि विनंती " या वरून बाळाजी पेशवे व सरदार पुरंदऱ्यांचे संबंध खूप जवळचे व पुरंदर घराणे हे पेशव्यांच्या बरोबरीचे होते हे मान्यच करावे लागेल .
बाळाजी विश्वनाथ पेशव्यांना बाजीराव चिमणाजी आप्पा ,भिऊबाई (हि लग्नानंतर भिऊबाई जोशी झाल्याचे दिसते . व अनुबाई हि अपत्ये झाली सर्वांचे बालपण येथेच सासवड मध्येच गेले .
बाळाजी पेशवे यांच्या मृत्यू नंतर पेशवे पदाची वस्त्रे थोरले बाजीराव पेशवे यांच्याकडे आली . पण शाहू महाराजांना बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी प्रामाणिक केलेल्या मदतीची परतफेड शाहू महाराजांनी कट्यार ,वस्त्रे ,शिक्के बाजीराव पेशवे यांनाच दिली .
सन १७२० मध्ये वयाच्या २० व्या वर्षी पेशवा झाला . बाजीराव पेशवा दिसावयास खूप सुंदर होता . बाजीराव याची बोलण्याची व कार्य करण्याची ढब हि शिपायाप्रमाणे दिसे आणि तो लष्कराबरोबर असताना आपल्याबरोबर तो आपल्या ऐश्वर्याच्या उपभोगासाठी जास्त माणसे बाळगीत नसे . आपल्या शिपायास जे दुःख ते तो अंगे अनुभवीत असे .
.जेंव्हा बाजीराव पेशव्याची आणि निजामाची गाठ पडली न्हवती त्यावेळेस त्याने एक चित्रकारास सांगितले कि तू "बाजीराव पेशवे याची गाठ घे व तुला तो जे काम करताना दृष्टीस पडेल तसे त्याचे चित्र काढ ."
मग त्याने बाजीराव पेशव्याचे चित्र काढले बाजीराव पेशवा घोड्यावर बसून भाला अंगाशी धरून हातावर जोंधळ्याची कणसे हातावर चोळून खात होता . तो जातीधर्मास विशेष मानीत नसे व तो शिपाई पणात विशेष प्रीती ठेऊन होता . राज्यादी कामे तो तुच्छ मानी . तो राज्य मिळवण्यासाठी लोभी खरा परंतु मराठे एकचित्त वागवणे व निझामाचा मानसोबा समजून त्याच्या निवारण करणे या कामात तो दक्ष होता . यास्तव त्याने मराठ्यांचे फार हित केले.
पुरंदरे दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते.
त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता
. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजन्तमोक्षाचा" हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली
. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंझावातापुढे मोगल हैराण झाले.
या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक राण्यांपैकी एकीची मुलगी "मस्तानी" बाजीरावास दिली. छत्रसाल राज्याने आपल्या मुलीचा हिस्साच तिला दिलेला दिसतो . त्यामुळे मस्तानी हि राजकन्याच होती यात दुमत नाही. . त्याला मुस्लीम राणीपासून झालेली मस्तानी ही कन्या. छत्रसाल हा" प्रणामी "पंथाचा. प्रणामी हा पंथ हिंदू आणि मुस्लिम या दोघांची शिकवण असलेला पंथ होता. तो धर्म मस्तानीच्या आईने स्वीकारला होता .
काही जणांच्या मते मस्तानीची आई हि पर्शियन होती. काही इतिहासकारांच्या मते ती मुस्लिम होती व काही काळ ती हैद्राबादच्या निजामाकडे नर्तकी म्हणून काहीकाळ राहिली होती .
मस्तानीचा जन्म छात्रपूर या जिल्यातील एका गावी झालेला दिसतो . त्या प्रभावाखाली मस्तानी मोठी झाली.. त्यामुळेच ती नमाजही पढत होती आणि कृष्णाची पूजाही करत होती . उत्तर हिंदुस्थानी संस्कृतीनुसार ती नृत्यकुश व कृष्णाची भजने गात होती .
दिसायला अत्यंत सुंदर होती . तिची त्वचा इतकी पातळ होती की विड्याच्या पानाचा रस गिळताना तो तिच्या गळ्यातून ओघळताना दिसे. मस्तानी युद्ध कलेत निपुण होती . म्हणजे तिला छत्रसालाने आपल्या मुलीचा दर्जा देऊन तिला राजकन्ये प्रमाणे शिक्षण दिले होते .
परंतु तिने आईचाच धर्म स्वीकारला ती मुस्लिम म्हणूनच राहिली . बाजीराव पेशवे यांनी तिच्या बरोबर लग्न केले. त्यामुळे ती मस्तानी बाजीराव पेशवा झाली होती . बाजीराव पेशवे यांच्या बरोबर तिचे लग्न १७२८ मध्ये झाले होते .
तिला पत्नीचा दर्जा बाजीराव पेशव्याने दिलेला होता बाजीराव पेशवे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव" काशीबाई"" होते .पुण्याजवळील "चासकमान" येथील "महादजी कृष्णाजी जोशी" व आई "शिऊबाई" यांची मुलगी वयाच्या ८ व्या वर्षी ११ वर्षाच्या बाजीराव पेशवे यांच्या बरोबर लग्न झाले होते
तिच्या पासून बाजीराव पेशव्यांना बाळाजी ,रामचंद्र ,रघुनाथ जनार्दन अशी अपत्ये झाली . शनिवारवाडा बांधण्या अगोदर म्हणजे १७३२ पूर्वी मस्तानी सासवड मध्ये पेशवेवाड्यात(तहसीलदार कार्यालयात ) राहत असावी असे दिसते .
. शनिवारवाड्यात आल्यानंतर मस्तानीस बाजीराव यांचे बंधू चिमाजी आप्पा व आई राधाबाई यांनी त्रास देण्यास सुरवात केली . त्या वेळेस कोथरूड येथे मस्तानीसाठी वाडा १७३४ मध्ये बांधण्यापूर्वी मस्तानीचा मुक्काम सासवड मधील पेशवे वाड्यात असावा असे दिसते .
सन १७३४ मध्ये मस्तानीस अपत्य झाले मुलाचे नाव कृष्णराव ठेवण्यात आले पण शनिवारवाड्यातून प्रचंड विरोध व धर्माचा प्रश्न निर्माण झाल्यावर मस्तानीने तिचा मुस्लिम धर्मच स्वीकारला . त्याचे नाव अली बहादूर ठेवण्यात आले . मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता,
पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीच्या मुलाच्या उपनयन विधीस तत्कालीन ब्राह्मणानी विरोध केला. त्याने मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला होता. . बाजीराव पेशवे यांनी १७३४ मध्ये" कोथरूड पुणे "येथे वाडा बांधला. आता तो वाडा राहिला नाही त्या वाड्याचा काही भाग" राजा दिनकर केळकर "या वस्तू संग्रहालयात जतन करून ठेवला आहे .
ती नृत्य, गायन, तलवार, तिरंदाजी यात मस्तानी प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, संत मीराबाई, मस्ताना, केशवदास, तुलसीदास या संतांचे साहित्य तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्याचा, कुराणाचाही तिने अभ्यास केला होता
बाजीराव पेशवे यांनी मस्तानीसाठी पाबळ येथे वाडा बांधण्यापूर्वी पाटस येथे काही काळ राहिल्याचा उल्लेख आढळतो आहे . बाजीराव पेशवे यांनी मस्तानीसाठी पाटस मध्ये वाडा बांधला होता त्यास मस्तानी वाडा असे आजही म्हणले जाते.
पाण्यासाठी बारव आहे तिला" मस्तानी बारव " व तिच्यासाठी बांधलेल्या तलावास" मस्तानी तलाव" आजही म्हणाले जाते .मस्तानीवर असलेल्या प्रेमापोटी त्याने पाबळ येथेही ८ गढी असलेला वाडा बांधला होता. परंतु आता तो भुई सपाट झाला आहे .
नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले.
संपूर्ण २० वर्षाच्या कारकिर्दीत एकही लढाई ना हरलेला व ४१ लढाया जिंकलेल्या या वीर बद्दल जदुनाथ सरकार लिहितो, "अखंड हिंदुस्थानात हा एक अलौकिक पुरुष झालेला दिसतो "
. बाजीराव पेशवा याने काशीबाई व मस्तानीवर खूप प्रेम केले काशीबाई यांचे चिमाजी आप्पा व राधाबाई यांच्या पुढे काही चालत नसल्यामुळे त्यांचाही बऱ्याचवेळा नायलाज झालेला दिसतो.
.बाजीराव युद्धावर गेल्या नंतर चिमाजी आप्पा व राधाबाई यांनी मस्तानीस कैदेत ठेवले होते . बाजीराव पेशव्यांचा मृत्यू झाल्याने मस्तानीने कट्यारीने आत्महत्या केली ,असे तर काहीजण तिने अंगठी मधील विष प्रश्न करून आत्महत्या केली असे म्हणतात तर काही जण तिने अंगठीतील हिरकणी खाऊन आत्महत्या केली काही जण बाजीराव यांच्या मृत्यूने झटका बसून तिचा मृत्यू झाला असे म्हणतात .खरे खोटे इतिहासालाच माहित .१७४०मध्ये तिने आपली जीवन यात्रा संपवली .
.मस्तानीची कबर पाबळ येथे बांधण्यात आली . मस्तानीच्या पुत्राला काशीबाईने आपल्या मुलांच्या प्रमाणे सांभाळ केला व सर्व शिक्षण दिले . मस्तानीचा पुत्र समशेर बहादर याला पेशवे घराण्यात व राजकारणात मानाचे स्थान लाभले. १७६१ साली पानिपतावर तो प्राण पणाला लावून लढला व धारातीर्थी पडला.
. पेशवे कुटुंबाला त्याचे अतीव दु:ख झाले. त्याचा पुत्र अलिबहादूरसुद्धा शूर होता. १७८८ साली मध्य प्रदेशातील बांदा येथे मस्तानीच्या शाखेला जहागिरी देण्यात आली.
प्रसिद्ध उर्दू शायर" मिर्झा गालिब" हा मस्तानीच्या नात्याचा होता.
भारत इतिहास संशोधक मंडळात सुमारे २५० वर्षांपू्र्वीच्या नोंदींचा एक कागद सांगतो की 'मौजे वडकी येथील घाटाखाली तळे व बाग बाजीराव बल्लाळ प्रधान यांनी करून मस्तानी कळवातीण इजकडे ठेविला' . यावरून मस्तानी येथे रहात असल्याने या तलावाला मस्तानी हे नाव पडले असे दिसते आहे.सासवड मध्ये मस्तानी राहत होती व ती मस्तानी तलावात पोहोण्यासाठी जात होती यास दुजोरा मिळतो .परंतु काही इतिहासकार मस्तानीच्या स्मरणार्थ हा तलाव बांधला असावा असे म्हणतात .
. या तलावाच्या जवळ शिवमंदिर व तटावर गणेशमंदिर आहे. गणेशमंदिर माधवराव पेशव्यांनी बांधले आहे.
मात्र, शिव मंदिराची नोंद उपलब्ध नाही. नोंदीत लिहिलेली बाग आता अस्तित्वात नाही.
अशा या अमर प्रेम कहाणीचा साक्षीदार वाडा सासवड मध्ये पेशवे वाडा (तहसीलदार कचेरी )या नावाने दिमाखात उभा आहे .










No comments:
Post a Comment