रवि पार्वती शिवाजी मोरे
Visual storyteller ·
औरंगजेब बादशहाची छावणी ब्रम्हपुरी या गावी 1699 पर्यंत होती . या काळात ब्रम्हपुरी चे नाव बदलून ते इस्लामपुरी करण्यात आले . या गावास त्यावेळी परगण्याचा दर्जा देण्यात आला होता .
औरंगजेब व थोरले शाहू महाराज , महाराणी येसुबाई , जोत्याजी केसकर , सकवारबाई साहेब व भोसले कुटुंब कबीला ब्रम्हपुरी मध्ये
4 - 5 वर्षे मुक्कामी होता .
तसेच औरंगजेब शुक्रवार च्या नमाजाच्या प्रार्थनेसाठी मंगळवेढ्याच्या किल्ल्यात येत असे ,
त्या वेळी तो नेहमी शाहू महाराज व इतर भोसले कुटुंबाच्या सदस्यांना सोबत घेत असे . याच ब्रम्हपुरी च्या तळावर आपल्या धन्याचा म्हणजेच थोरल्या शाहू महाराजांच्या बचावासाठी खंडेराव व जगजीवन हे दोघे गुजर बंधु मुसलमान होण्यास तयार झाले . औरंगजेबाने त्यांना मुसलमान करुन त्यांची नावे अब्दुर्रहीम व अब्दुर्रहीमान अशी ठेवली . गुजर बंधुंचा हा उपकार थोरले शाहू महाराज कधीच विसरले नाहीत .
छत्रपती राजाराम महाराज व सरसेनापती धनाजी जाधवांनी औरंगजेब बादशहाच्या ब्रम्हपुरी च्या छावणी वर महाराणी येसुबाई , बाल शाहूराजे व इतर लोकांना सोडवण्यासाठी हल्ला केला होता . यावेळी मोगलांच्या वर मराठ्यांनी मोठा बाका प्रसंग आणला होता . औरंगजेब बादशहाची बायको उदेपुरी बेगम , मुलगी झिनतउन्निसा बेगम आणि बादशहाच्या अंत : पुरातील इतर स्त्रिया यांच्या सह संपूर्ण कुटुंब कबीलाच मराठ्यांच्या ताब्यात येण्याची भिती निर्माण झाली होती .
परंतु ऐनवेळी एका रजपुत सरदारा मुळे ही घटना टळली होती .
फोटो - 1. ब्रम्हपुरी गावची वेस
2 . मराठ्यांच्या हल्ल्याच्या भितीने औरंगजेबाने बांधलेला माचणूर चा किल्ला
3. रावजगदेवराव जाधवराव यांची समाधी ब्रम्हपुरी
4 , 5, 6 मंगळवेढ्याचा किल्ला
#शाहुपर्व
#जागर_इतिहासाचा







No comments:
Post a Comment