postsaambhar :Udaykumar Jagtap
सासवड मधील तहसीलदार कचेरी हा" पेशवे यांचा वाडा "म्हणून ओळखला जात होता . हा वाडा बाजीराव पेशवे यांनी बांधला असावा
असा अंदाज काही इतिहासकारांनी बांधला आहे ,हा वाडा १७३२ पूर्वी बांधला असावा असे वाटते .
पेशवाईचा कारभार पूर्वी सासवड मधून चालत असे ." बाळाजी विश्वनाथ" याना पेशवाईची वस्त्रे मिळाल्या नंतर म्हणजे १६ नोव्हेंम्बर १७१३ नंतर त्यांचे वास्तव्य बराचकाळ सासवड मध्ये म्हणजे त्यांच्या मृत्यू पर्यंत १२ एप्रिल १७२० पर्यंत होते .
१७३२ मध्ये शनिवारवाडा बांधण्यापूर्वी पेशव्यांचे वास्तव्य सासवडलाच असावे असे कागदोपत्री दिसते आहे .
१८०५ या १८२६ दरम्यानच्या मधील नोंदीमध्ये "' सासवड गावाबाहेर नदीच्या पलीकडे पेशवांच्या जुना राजवाडा आहे. ह्या वाड्यावर इंग्रजांच्या गोळ्यांच्या बाढीमाराचे व्रण दिसत आहेत . आता मात्र या वास्तूचा उपयोग हा कलेक्टर यांचा बंगला व ऑफिस म्हणून करण्यात येतो . "
हा वाडा भक्कम व मजबूत आहे या वाड्याच्या भिंती ५ फूट जाडीच्या असून तो दुमजली होता .
इंग्रजांनी त्यांच्या शिरस्त्या प्रमाणे वरील मजला पडून टाकला. त्याचा थोडा भाग तसाच शिल्लक ठेवला पूर्वी तो "डाक बंगला" म्हणून ओळखला जात होता . या इमारती मध्ये पूर्वी तुरुंग व कचेरी हलवण्यात आलेली होती
. सिंध च्या अमिराना कैदेत या पेशवेवाड्यात सन १८४० मध्ये ठेवण्यात आले होते . या अमिराना जरी कैदेत ठेवले तरी त्यांना त्यांच्या आवडीच्या शिकारीसाठी बंधन घालण्यात आले न्हवते .
सासवडच्या आसपास असलेल्या लांडग्यांना, रानडुक्करांना मारण्याची मुभा दिलेली होती व सासवडच्या आसपासचा परिसर लांडग्यांपासून मुक्त करण्यात आला होता .
वाड्याच्या आसपासची जागा हि" सरकार बाग" म्हणून ओळखली जात होती . या बागेची मालकी पेशव्यांनकडे असल्याने शनिवारवाड्यात देवपूजेसाठी या बागेतील फुले पुण्यास रवाना होत असत .
या बागेसाठी पेशव्यांनी सुपे येथील धरणावरून पाणी आणले होते . धरणाचे पाणी खाली आले की प्रथम सरकारी बागेसाठी त्या बागेचे भिजवणे झाले नंतर इतरांना ते वापरण्याचा हक्क असे .
सन १७६९ मध्ये पाणी वाटपा वरून वाद निर्माण झाल्याने हा वाद "सखाराम बापू बोकीलांकडे "गेला होता .
चिमणाजी गोविंद पुरंदरे " व इतरांमध्ये हे प्रकरण खूप वादावादी नंतर तडजोड करण्यासाठी आलेले होते सखाराम बापू बोकीलांनी शेवटी त्याचे हक्क चिमणाजी गोविंद यांच्याकडे परंपरेने कायम ठेवले होते काळाच्या ओघात आता तो पाण्याचा पाट दिसत नाही. काही पाटाच्या खुणा अजूनही तहसीलदार कचेरी जवळील शेतांमध्ये आजही पाहावयास मिळतात













No comments:
Post a Comment