विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 February 2021

महादजी शिंदे यांचे निधन !

 



महादजी शिंदे यांचे निधन !
शके १७१५ च्या माघ शु. १३ रोजी प्रसिद्ध मराठा वीर आणि मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे निधन झाले. मरणसमयीं महादजी शिदे वानवडी येथील छावणीत होते. आठदहा महिने पाटिल बोवांना ज्वरबाधा झाली होती.
महादजी हे राणोजी शिंद्यांचे चिरंजीव. त्यांनी प्रथम तळेगांव-उंबरीच्या लढाईत शौर्य गाजवून नांव मिळविले. औरंगाबाद, साखरखर्डा, पंजाब इत्यादि मोहिमांतूनहि त्यांनी मोठा पराक्रम केला. पानपतच्या लढाईत एका पठाणाने यांच्या डाव्या पायावर वार करून महादजीस कायमचे लंगड़ें केले होते. पानिपतच्या लढाईनंतर महादजींनीे उत्तरेतील कारस्थाने व भानगडी यांची चांगली माहिती करून घेतली. उत्तर हिंदुस्थान जिंकून पानपतचे अपयश धुवून काढण्यांत महादजीची बरीच कर्तबगारी दिसून येते. लढाया, कारस्थाने, राज्यव्यवस्था, फौजेची उभारणी इत्यादि गोष्टीतील तपशील पाहिला म्हणजे असे वाटते की, “हिंदुपदपातशाही सिद्धीस नेण्याचा मराठेशाहीच्या आद्यचालकांचा प्रधान हेतु जर कोणी सफल केला असेल तर तो महादजींनीेच. यांनीच पानपतचे अपयश धुऊन काढले, आणि अटकेपावेतों नेलेल्या झेंड्याचे सार्थक केले. फांद्या तोडीत बसण्यापेक्षां मूळच उपटून काढावे ही कल्पना खरी करून दाखविणारा पुरुष मराठेशाहीत एकच झाला आणि तो म्हणजे महादजी शिंदा होय"
महादजींचा वर्ण काळा असूनही, त्यांचे चेहऱ्यावर बुद्धीची व औदार्याची चमक होती. त्यांचे वर्तन साधे व अकृत्रिम असून तत्कालीन मराठी बाणा महादजींच्या ठिकाणी मूर्तिमंत होता. ते चांगले बहुश्रुत असून धर्मनिष्ठ होते. हे रणवीर एक प्रेमळ भगवद्भक्त म्हणूनहि प्रसिद्ध आहते. ते पंढरीचे वारकरी होते. त्यांनी मल्लाप्पा वासकरांकडून वारकरी माळा धारण केली होती. स्वतः भक्तिपर पदें रचून ते म्हणत असत. 'माधव विलास' या संज्ञेने त्यांची पद्ये प्रसिद्ध झाली आहेत. साधुसंतांवर त्यांचा विश्वास होता. त्यांचे चरित्र्य धुतल्या तांदुळाप्रमाणे होते. "उत्तरेत विदुर नामाभिधान पावलेले महादजी धन, सत्ता, लौकिक, ऐश्वर्य यांच्या परमावधीस पोंचूनही अंतर्बाह्य वर्तनाने सर्वथा निर्मळ राहिले. शत्रूला त्यांनी आदराने व औदार्याने वागविले."
-१२ फेब्रुवारी १७९४

No comments:

Post a Comment

महाराजांची युद्धनीती (Guerrilla Warfare) आणि लष्करी शिस्त

  छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य मोगल, आदिलशाही आणि परकीय सत्तांना केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे, तर आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने आणि अनोख्...