विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 June 2021

ऐतिहासिक नगरी श्रीगोंदा मधला ऐतिहासिक “शिंदे वाडा”..

 


ऐतिहासिक नगरी श्रीगोंदा मधला ऐतिहासिक “शिंदे वाडा”...
श्रीगोंदा हे नगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील एक ऐतिहासिक व पौराणिक सुवर्णसंपन्न वारसा लाभलेले नगर आहे श्रीगोंदा नगरीला प्राचीनकाळी 'श्रीपूर' असे नाव होते या श्रीपुरचे ‘मध्ययुगात चाम्भारगोंदे’ झाले हे आजचे श्रीगोंदे होते श्रीगोंदा या नगरीला दक्षिण काशी म्हटले जाते कारण या ठिकाणी प्राचीन असंख्य मंदिरे आहेत या ठिकाणची प्राचीन, पूर्वयादव, यादवकालीन, मराठाकालीन मंदिरे पहिली कि श्रीगोंदा शहराच्या वैभवाची साक्ष...मंदिरांबरोबरच शिंद्यांच्या राजवटीतील ऐतिहासिक व भव्य वाडे हेही श्रीगोंद्याचे एक वैशिष्ट्यच....
सेनानी महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज बाजीराव यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जात पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले “श्रीगोंदा आणि शिंदे घराणे” याचा अतूट बंद आहेत...
➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : @safar_marathi ♥️

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...