विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 15 June 2021

पानिपतकर शिंदे वाडे- कोपर्डे खंडाळा जि. सातारा

 पानिपतकर शिंदे वाडे- कोपर्डे

खंडाळा जि. सातारा

सातारा-लोणंद मार्गावर कोपर्डे फाटा लागतो. या फाट्यापासून दोन किमी आत कोपर्डे गाव आहे. या गावात प्रवेश करताना एका मोठ्या भक्कम घडीव दगडाच्या वेशीतून प्रवेश करावा लागतो. या संपूर्ण गावाला तटबंदी असल्याच्या खूणा दिसून येतात. आणि आत शिंदे या मातब्बर पुरुषांच्या वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात.
वेशीतून आत प्रवेश करताच डाव्या हातास एका भव्य वाड्याचा बुरुज आणि त्यास जोडणारी तटबंदी आजही वाड्याच्या विशाल रुपाची आठवण करुन देते. वाड्याच्या दरवाजावरील पूर्वी असलेल्या नगारखान्याचा किंचित अंश दिसतो. आत गेल्यावर जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात. नगारखान्याचा जिना याशिवाय जुन्या वास्तू आता काही उरल्या नाही.
या वाड्याच्या प्रवेशद्वारास जोडलेले दोन बुरुज आजही भक्कम स्थितीत उभे आहेत. बुरुजांचे निम्मे बांधकाम घडीव दगडांचे असून वरील निम्मे बांधकाम रेखीव अशा भाजक्या विटांचे आहे. त्यांच्या दर्जांमधील चुना बांधकामास घट्ट धरुन ठेवलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो.
पानिपतकर शिंदे वाडे- कोपर्डे
खंडाळा, जि. सातारा
तिसऱ्या वाड्याचा फक्त एक बुरुज त्या वाड्याच्या भव्यतेची साक्ष देत उभा आहे.
पानिपतकर शिंदे वाडे- कोपर्डे
खंडाळा जि. सातारा
पानिपतच्या संग्रामानंतर ज्या शिंदे मंडळींचे वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य झाले त्यात येथील मंडळी फलटणकर नाईक निंबाळकरांच्या आश्रयाने कोपर्डे येथे स्थायिक झाल्या. जवळपासची गावे त्यांना इनाम म्हणून मिळाली. त्यांनी हे वाडे बांधून कोपर्डे या ठिकाणी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. या शिंदेमंडळींना 'पानिपतकर शिंदे' म्हणून संबोधले जाते.
खंडाळा जि. सातारा






No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...